संशोधन वैद्यकीय शास्त्र

रक्तगटाचा शोध कोणी लावला?

1 उत्तर
1 answers

रक्तगटाचा शोध कोणी लावला?

9
रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.
उत्तर लिहिले · 19/9/2021
कर्म · 34195

Related Questions

खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद कोण ठेवतो एक्झिट बनाने का?
अटॅक कशामुळे येतो?
विद्यार्थी वैयक्तिक माहिती व वैद्यकीय तपासणी?
एंजोप्लाॅस्टी म्हणजे काय?
अंगावरून पांढरे जाणे म्हणजे काय?
चिकित्सा म्हणजे काय?
लहान आतड्याचे कार्य कोणते?