आयात निर्यात व्यापारी अर्थशास्त्र

आयात व्यापाराचा अर्थ काय?

3 उत्तरे
3 answers

आयात व्यापाराचा अर्थ काय?

1
आयात व्यापाऱ्यांचा अर्थ आयात हा व्यापाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये इतर देशांकडून मायदेशी जाण्यासाठी

वस्तू आणि सेवा खरेदी करणे

१. एका देशाने

दुसऱ्या देशाकडून

केलेली वस्तू व

सेवांची खरेदी

म्हणजे आयात

व्यापार होय.

२. स्वदेशाकडे

परदेशातील वस्तू

व सेवांचा

अंत:प्रवाह म्हणजे

आयात होय.३. आयातीमुळे

विदेशी चलनाचा

बहिर्प्रवाह होतो.

४. उदा. भारत हा

इराक, कुवेत

| अरेबिया इत्यादी

|आणि सौदी देशांकडून पेट्रोलिअमची आयात करतो.
आयात व्यापार कार्यपद्धती : आयातीसाठी सर्वसाधारण किंवा विशेष परवाना आयातदाराला मिळवावा लागतो. नंतर परकीय चलन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परदेशातील निर्यात व्यापारी किंवा उत्पादक यांच्याकडे आयातीसाठी मागणी नोंदवावी लागते. असे मागणीपत्र (इंडेंट) आयातदार स्वतंत्रपणे किंवा मध्यस्थ मागणीगृहामार्फत (इंडेट हाउस) देऊ शकतो. त्या गृहामार्फत मागणीपत्रके त्या त्या निर्यातदाराकडे किंवा उत्पादकाकडे पाठविण्यात येतात. आर्थिक स्थितीचा पुरावा म्हणून आयातदाराची बँक निर्यातदाराला उद्देशून पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट) पाठविण्याची व्यवस्था करू शकते. निर्यातदार माल वाहतूक कंपनीकडे पाठवितो व त्याबाबतची तपशीलवार सूचना आयातदाराकडे किंवा मध्यस्थ मागणीगृहाकडे पाठवितो. त्यानंतर निर्यातदार आयातदारावर मालाच्या किमतीइतकी व खर्चाइतकी हुंडी काढतो. त्या हुंडीसोबत सागरी विमापत्र, बोटीचे भरणपत्र (बिल ऑफ लेडींग), उत्पत्तीचा दाखला (सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन) व आवश्यकता वाटल्यास राजप्रतिनिधीचे शिफारसपत्र (कॉन्सुलर इन्व्हाइस) हे दस्तऐवज पाठवितो. या सर्व दस्तऐवजांसह पाठविलेल्या हुंडीस विपत्रहुंडी (डॉक्युमेंटरी बिल ऑफ एक्स्चेंज) असे संबोधतात. माल पोचल्याची सूचना मिळताच व वरील सर्व दस्तऐवज आयातदार किंवा मध्यस्थगृह यांच्याकडे आल्यावर प्रत्यक्ष माल सोडविण्याचे कार्य केले जाते. आयातीची कार्यपद्धती अत्यंत किचकट व दीर्घसूत्री असल्याने बहुतेक आयातदार त्यासाठी निष्कासन अभिकर्त्यांची (क्लिअरिंग एजंट) मदत घेतात.
उत्तर लिहिले · 1/12/2021
कर्म · 121765
0
राष्ट्रची आथिक स्थिती कोणत्या घटकावर अवलंबून असते
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 0
0
{html}

आयात व्यापार:

आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशातून वस्तू व सेवा आपल्या देशात मागवणे किंवा खरेदी करणे.

जेव्हा एखादा देश आपल्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा विदेशातून विकत घेतो, तेव्हा त्याला आयात व्यापार म्हणतात.

हा व्यापार अनेक कारणांमुळे केला जातो, जसे की:

  • देशात काही वस्तूंची कमतरता असणे.
  • विदेशी वस्तूंची गुणवत्ता चांगली असणे.
  • देशांतर्गत वस्तूंपेक्षा विदेशी वस्तू स्वस्त असणे.

आयात व्यापारामुळे देशातील ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध होतात आणि स्पर्धा वाढते.

```
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220

Related Questions

व्यक्तिगत व्यापारी संस्थेची व्याख्या सांगून व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
एकमवे व्यापारी आणि भागीदारीचे अंतिम खाते यांच्यातील भिन्नता लिहा?
एकमैव व्यापारी आणि भागीदारीचे अंतिम खाते यांच्यातील भिन्नता लिहा?
एकमेव व्यापारी आणि भागीदारीचे अंतिम खाते यांच्यातील भिन्नता लिहा?
एकमेव व्यापारी आणि भागीदारी अंतिम खाते यांच्यातील भिन्नता काय आहे?
सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला का?
व्यक्तिगत व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था काय आहेत?