2 उत्तरे
2
answers
पैसा गल्ल्यांमध्ये लिंबू का ठेवतात?
2
Answer link
पैसाच्या गल्यात लिंबू ठेवण्याचे कारण पैशाला पैसा जोडत जावा आणि रोज पैसा येत राहो आणि कोणाची नजर लागु नये म्हणून नकारात्मक उर्जा प्रवेश करु नये म्हणून असं म्हणतात लिंबू नकारात्मक उर्जा बाहेर काढण्यासाठी उपयोग होतो नजर भूतबाधा वगैरे काही असेल लिंबू चा वापर करतात
म्हणून दुकानदार दर शनिवारी लिंबू पाण्यात टाकून ठेवतात तर काही गल्यात ठेवतात दर शनिवारी बदली करतात आणि तो पहिला लिंबू रस्त्यावर फेकून दिला जातो किंवा काही पाण्यात विसर्जन करतात
लिंबू चा वापर करतात तेव्हा ते लिंबू कधी कधी लिंबू सुकुन लाल होते किंवा काळा पडतो तेव्हा समजावं कि नकारात्मक उर्जा आहे.वाईट नजर आहे म्हणून लिंबू तसे झाले
आणि लिंबू आठ दिवस जसाचा जसा हिरवाच असेल तर तर समजावे नजरबाधा वगैरे काही नाही सर्व काही व्यवस्थित आहे
0
Answer link
पैसा गल्ल्यांमध्ये लिंबू ठेवण्यामागे अनेक कारणं दिली जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- नकारात्मक ऊर्जा दूर करणे: लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, असं मानलं जातं. त्यामुळे, गल्ल्यात लिंबू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
- लक्ष्मी आकर्षित करणे: लिंबू देवी लक्ष्मीला प्रिय आहे, असं मानलं जातं. त्यामुळे, गल्ल्यात लिंबू ठेवल्याने देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि व्यवसायात भरभराट होते.
- वाईट नजरेपासून बचाव: लिंबू वाईट नजरेपासून बचाव करतो, असं मानलं जातं. त्यामुळे, गल्ल्यात लिंबू ठेवल्याने व्यवसायाला वाईट नजर लागत नाही.
- कीटक आणि जंतू दूर ठेवणे: लिंबामध्ये नैसर्गिकरित्या कीटकनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे, गल्ल्यात लिंबू ठेवल्याने कीटक आणि जंतू दूर राहतात.