कुतूहल
2
Answer link
तोंडाला पाणी
चिकन, मटण, मासे अशी नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पावसाळ्यातल्या पिकनिकमध्ये तर गरमागरम नॉनव्हेज हवंच. पण ते खाताना त्याचे फायदे-तोटेही लक्षात घ्यायला हवेत.
चिकन, मटण, मासे अशी नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पावसाळ्यातल्या पिकनिकमध्ये तर गरमागरम नॉनव्हेज हवंच. पण ते खाताना त्याचे फायदे-तोटेही लक्षात घ्यायला हवेत.
पावसाळा आला म्हणजे मस्त गरमागरम भजीसोबतच पावसाळी पिकनिक आणि झक्क मांसाहाराचे बेत शिजू लागतात. शाकाहार तसा पचायला हलका. पण त्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त नसतं. मांसाहार पचायला जड असला तरी त्यातून आपल्याला प्रथिनं, लोह, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व मिळतात. पण त्यात चोथा अर्थात फायबर नसतं. मांसाहारात प्रथिनं असल्यामुळे लहान मुलं, आजारी माणसं यांना पचेल त्या प्रमाणातच तो द्यावा लागतो. त्यामुळे तब्येत सुधारायला खूप मदत होते. जखमा भरणं, शक्ती येणं, झीज भरून निघणं हे मांसाहारामुळे सहज शक्य होतं; पण त्यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. अंडी, मासे, मांस हे ताजे आणि स्वच्छ असावेत. मांसाहारात किडनी, लिव्हर, ब्रेन शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे अंड्यातील पिवळ्या भागात चरबीचं प्रमाण जास्त असतं, तेही घेणं टाळावं. कोंबडीची कातडी, कलेजी, भेजा यांत स्निग्धांश जास्त असतो. त्यामुळे त्यावरही लगाम असू द्यावा.
त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी; गावठी कट्टा, काडतुसे जप्त
मासे जरुर घ्या. माशांपासून उत्तम प्रथिनं आणि कमी स्निग्धांश मिळतो. माशांचं तेल स्मरणशक्ती वाढवतं, त्वचेला तजेलदारपणा आणणं, हृदयरोग कमी करणं यासाठी उपयोगी पडतं. बांगडा, ट्यूना या माशांतील ‘ओमेगा ३’ हे फॅटिअॅसिड अत्यंत उपयुक्त आहे; पण मासा तळून खाऊ नये. भाजून, ग्रिल करून, बेक करून घ्यावा. कोळंबी, खेकडे, तिसऱ्या या प्रकारच्या माशांत ‘ओमेगा ३’ कमी असतं. कोलेस्टेरॉल जास्त असतं. म्हणून हे मासे वरचेवर घेणं टाळावं.
मांसाहारासाठी रस्सा करताना खोबरं, तीळ, शेंगदाणे, तेल, मसाल्यांचा भरपूर वापर केला जातो. पण त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. मांसाहाराबरोबर नेहमी कच्चं सॅलड भरपूर खावं किंवा पालेभाजी घ्यावी. उदा. मटण पालक. रेडमीट, अंड्याचा पिवळा भाग, सॉसेजेस सलामी, चिकन स्कीन यांत सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असणाऱ्यांनी, स्थूल व्यक्तींनी ते अजिबात घेऊ नये.
वाढीच्या वयातील मुलं, आजारातून बरं होण्यासाठी रुग्णांना, खेळाडूंना मांसाहार निश्चितपणे द्यावा; पण त्यातली सर्व पथ्य सांभाळूनच! अंड्याचा पांढरा भाग, चिकन, स्कीन काढलेले मासे याला शाकाहारातील पर्याय म्हणजे दूध, कडधान्यं, डाळी, तेलबिया, वेगवेगळी तेलं, काळे चणे, राजमा, गडद हिरव्या रंगांच्या पालेभाज्या इ. आहे. मांसाहार शक्यतो दिवसा करावा. रात्रीच्या जेवणात फार मसालेदार आणि जड पदार्थ घेणं टाळावं.
2
Answer link
पैसाच्या गल्यात लिंबू ठेवण्याचे कारण पैशाला पैसा जोडत जावा आणि रोज पैसा येत राहो आणि कोणाची नजर लागु नये म्हणून नकारात्मक उर्जा प्रवेश करु नये म्हणून असं म्हणतात लिंबू नकारात्मक उर्जा बाहेर काढण्यासाठी उपयोग होतो नजर भूतबाधा वगैरे काही असेल लिंबू चा वापर करतात
म्हणून दुकानदार दर शनिवारी लिंबू पाण्यात टाकून ठेवतात तर काही गल्यात ठेवतात दर शनिवारी बदली करतात आणि तो पहिला लिंबू रस्त्यावर फेकून दिला जातो किंवा काही पाण्यात विसर्जन करतात
लिंबू चा वापर करतात तेव्हा ते लिंबू कधी कधी लिंबू सुकुन लाल होते किंवा काळा पडतो तेव्हा समजावं कि नकारात्मक उर्जा आहे.वाईट नजर आहे म्हणून लिंबू तसे झाले
आणि लिंबू आठ दिवस जसाचा जसा हिरवाच असेल तर तर समजावे नजरबाधा वगैरे काही नाही सर्व काही व्यवस्थित आहे
4
Answer link
रात्रीच्या अंधारात किन्नरांवर अंत्यसंस्कार का केले जातात शूज आणि चप्पलने देखील मृतदेहाला मारहाण करतातमागीलपुढे
नपुंसकांवर रात्रीच्या अंधारातच अंत्यसंस्कार का केले जातात, शूज चप्पलनेही मृतदेह मारतात,
किन्नरांच्या अंत्यसंस्काराची माहिती
असे म्हटले जाते की जर नपुंसकाने नपुंसकाचा मृतदेह पाहिला तर तो उशीरा झालेला नपुंसक दुसऱ्या जन्मात पुन्हा नपुंसक होईल.मथळेट्रान्सजेंडर समुदाय मृतदेह घेऊन जाताना चप्पलने मारहाण करतात.रात्रीच्या अंधारात षंढांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.काही षंढांना मृत्यूची आधीच माहिती असते, असे सांगितले जाते.
घरात कोणतेही शुभ कार्य करत असताना षंढ नक्कीच येतात, फक्त कोणत्याही सणासाठीच नाही तर कुणाचे लग्न झाले किंवा एखादे शुभ कार्य असेल किंवा अपत्य जन्माला आले तरी हे षंढ तिथे येतात.आणि त्यानुसार उत्सव साजरा करतात. स्वतःच्या मर्जीने आणि दक्षिणा मागतात, बरेच लोक त्यांची मागणी पूर्ण करतात तर बरेच लोक त्यांना पळवून लावतात. आपल्या समाजात किन्नरांना तृतीय लिंगाचा दर्जा देण्यात आला आहे.
षंढांच्या राहणीमानापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्व काही वेगळ्या पद्धतीने घडते, षंढांच्या अंत्यसंस्काराची माहिती मोजक्याच लोकांना आहे.
नपुंसकांवर अंत्यसंस्कार कसे केले जातात, कोणते विधी केले जातात ते आम्ही तुम्हाला सांगतो-
असे म्हटले जाते की अनेक षंढांमध्ये अध्यात्मिक शक्ती असते, ज्यामुळे त्यांना मृत्यूची आधीच जाणीव असते.आणि या काळात ते फक्त पाणी पितात आणि स्वतःसाठी आणि इतर षंढांसाठी देवाकडे प्रार्थना करतात की त्यांनी पुढच्या जन्मात षंढ होऊ नये.
असेही म्हटले जाते की, अनेक लोक मरणासन्न षंढासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात, असे मानले जाते की मरणासन्न षंढाची प्रार्थना खूप प्रभावी असते, षंढांमध्ये मृतदेह जाळण्याऐवजी त्याचे दफन केले जाते. ट्रान्सजेंडर समाजात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याला मुक्त करण्याची प्रक्रिया प्रथम केली जाते. यासाठी मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळला जातो. तसेच मृतदेहावर काहीही बांधले जाणार नाही याची काळजी घेतली जाते. मृतांच्या आत्म्याला मुक्तता मिळावी म्हणून हे केले जाते.
3
Answer link
जे
सूर्याचं चित्र काढायचं असेल तर आपण हमखास पिवळा रंग हातात घेतो. त्यात नारंगी आणि लाल रंग सुद्धा वापरतो. परंतु आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी असलेला हा तारा खरं तर पिवळा नाही, ना तो नारंगी किंवा लाल रंगाचा आहे.
हे सर्व रंग मिळून आणखी काही रंग आहेत. सूर्य निरंतर रंगांमध्ये प्रकाश उत्सर्जित करतो.
तुम्ही जर प्रिझमच्या माध्यमातून (लोलक) सूर्यप्रकाश पाहिला तर तो लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, नीळा, आणि जांभळ्या रंगाचा आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
इंद्रधनुष्याप्रमाणे हे रंग डोळ्यांना दिसतात. खरं तर इंद्रधनुष्य म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा वातावरणातील पाण्याच्या थेंबांमधून जातो तेव्हा तो आपल्या डोळ्याला कसा दिसतो ते दृश्य. हे पाण्याचे थेंब छोट्या प्रिझमसारखे कार्य करतात.
बहुरंगी सूर्य हा लख्ख प्रकाशामुळं ऊर्जेनं भरलेला दिसत असला तरी ते, पूर्णत: बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. कारण सूर्याकडून उत्सर्जित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचा रंग संमिश्र असतो, मात्र आपल्याला केवळ एक रंग दिसतो.
याविषयी जाणून घ्यायचं असेल तर आकाशात एक संकेत मिळतो. आकाशात असलेले ढग जे सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतात ते ना पिवळे आहेत ना इतर कोणत्या रंगाचे आहेत.
ते पांढऱ्या रंगाचे आहेत कारण सूर्य जो प्रकाश उत्सर्जित करतो त्याचा खरा रंग हाच आहे.
पिवळा का दिसतो?
सूर्यमालेतील प्रत्येक रंगाची वेगळी तरंगलांबी (एका लहरीच्या शिखेपासून दुसर्या लहरीच्या शिखेपर्यंतचे अंतर) असते.
एका टोकाला लाल रंग आहे ज्याची तरंगलांबी सर्वाधिक आहे. रंग तरंगलांबीमध्ये कमी होत जातात. लाल ते नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो, जांभळा या पद्धतीने.
कमी तरंगलांबी असलेल्या रंगाचे प्रकाशकण अधिक तरंगलांबी असलेल्या प्रकाशकणांपेक्षा अधिक विखुरलेले आणि उत्तेजित असतात.
अंतराळात प्रकाश कोणत्याही अडथळ्याविना प्रवास करत असतो त्याठिकाणी प्रकाशकणांना बदलणारं असं काहीही नाही. त्यामुळं सूर्य का एखाद्या पांढल्या चेंडूसारखा असतो. हा या ताऱ्याचा 'खरा रंग' आहे.
मात्र, जेव्हा सूर्यकिरणं पृथ्वीच्या वातावरणाच्या माध्यमातून प्रवास करतात, हवेतील रेणू हे कमी तरंगलांबी असलेल्या प्रकाशकणांमध्ये बदल घडवून आणतात.
अधिक तरंगलांबी असलेल्या स्पेक्ट्रम (लोलकातून बाहेर पडणारे रंग) मधील रंग हे आपल्या डोळ्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकतात.
"निळ्या आणि अतिनील भागाशी संबंधीत असेल्या प्रकाशाच्या स्पेक्ट्रमच्या सर्वात ऊर्जावान भागात वातावरामुळं अडथळा निर्माण होतो, अशी माहिती अॅस्ट्रॉनॉमर डायरी नावाची बेवसाईट चालवणाऱ्या एंजर मोलिना यांनी दिली.
"त्यामुळं सूर्य हा पृथ्वीवर शीत रंगाचा न दिसता एखाद्या लाईटच्या बल्बसारखा दिसतो. कारण शीत रंग वातावरणामुळं नष्ट होतात आणि पिवळ्या रंगाकडं झुकणारा असा उष्म रंग त्याला मिळतो."
मात्र, मग लाल किंवा केशरी रंगाची तरंगलांबी अधिक असूनदेखील तो तसा न दिसता पिवळ्या रंगाचाच का दिसतो?
हिरव्यापासून ते जांभळ्या रंगापर्यंतच्या कमी तरंगलांबीचे रंग शोषल्यानंतर सूर्यप्रकाश हा कलर स्पेक्ट्रमच्या मध्यभागी स्थिर होत असतो, अशी माहिती युनिव्हर्सिटी ऑफ द रिपब्लिक इन उरुग्वेमधील खगोलशास्त्राचे प्राध्यापक गोंझालो टँक्रेडी यांनी दिली.
हिरवा सूर्य?
तुम्ही कदाचित काही अशीही संकेतस्थळं किंवा सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्या असतील, ज्यात सूर्य प्रत्यक्षात हिरवा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.
आपण जर सूर्याच्या स्पेक्ट्रममधील रंगांची मांडणी केली तर सर्वात वरच्या शिखरावर हिरवा भाग असलेल्या रंगाच्या डोंगरासारखी आकृती तयार होते. या वस्तुस्थितातून हा दावा समोर आल्याचं टँक्रेडी सांगतात.
मानवी डोळ्यांनी सूर्यकिरणांच्या रंगामध्ये असलेला फरक जाणवत नाही, मात्र हा फरक पाहता येतील अशी काही उपकरणं उपलब्ध असून, त्यातून बहुतांश वेळा हिरवा रंगच प्रामुख्यानं पाहायला मिळतो.
"मात्र जेव्हा आपण यातून निळ्यासारखे कमी तरंगलांबीचे रंग दूर करतो, त्यावेळी यातील प्रमुख रंग हा हिरव्याऐवजी पिवळा होतो," असं ट्रँकेडी म्हणाले.
"त्यामुळं पृथ्वीवर आल्याला सूर्य पिवळा का दिसतो, हे समजून घेण्यासाठी संबंधित माहिती उपयोगी ठरते."
मावळतीचा लाल रंग?
सूर्य जेव्हा उगवत असतो किंवा मावळत असतो तेव्हा तो क्षितीजापासून सर्वात जवळच्या बिंदूवर असतो. त्यामुळं सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणात हवामानाच्या रेणूंमधून प्रवास करतात.
त्यामुळं निळ्या छटा असलेल्या रंगामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात आणि त्यामुळं मोठ्या तरंगलांबीतील लाल आणि केशरी रंगाचं सूर्याच्या प्रतिमेवर प्रभाव पाहायला मिळतो.
विशेष म्हणजे या संपूर्ण क्रियेला एक नावही आहे. त्याला रेलेघ स्कॅटरिंग असं म्हणतात. 19 व्या शतकातील ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ लॉर्ड रेलेघ यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे.
सूर्य आकाशामध्ये प्रवास करत असताना, पृथ्वीशी त्याचा कोन सातत्यानं बदलत असतो. त्यामुळं सूर्यास्ताच्या वेळी असलेल्या लाल रंगासह दिवसातील वेगवेगळ्या वेळांनाही सूर्याचा रंग काहीसा बदलतो.
आपल्या सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या सूर्य या ताऱ्याबद्दल आपल्याला या लेखातून रंजक माहिती मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे. मात्र सूर्याकडे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये, अथवा दुर्बिणीच्या माध्यमातूनही थेट सूर्याकडे पाहू नये. त्यामुळं आपल्या डोळ्यांना गंभीर इजा होऊन अंधत्वासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
2
Answer link
पान खाताना रस गिळला तर चालतो पण तंबाखू न घालता
बिना तंबाखू चा पान केव्हाही खाणे योग्य आहे
आणि तंबाखू घातलेला पान असेल तर रस गिळता येणार नाही तो थुंकून च टाकला तंबाखू हा हानीकारक
पानाचा वापर फक्त विडा म्हणून नाही तर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही केला जातो .
तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचे हे पान . या पानाला इंग्रजी मध्ये बीटल लीफ ,हिंदी मध्ये पानाचं पान ,तेलगूमध्ये तमालपाकु , तर मराठीत याला तांबूल किंवा खायचे पान ,विड्याचे पान ,नागवेलीचे पान असे म्हटले जाते .
स्वादानुसार पानाचे चार प्रकार असतात . पानाची चव कडू आंबट तिखट आणि गोड . पानाचा औषधी गुणांचा उल्लेख चरक संहिता पुराण ग्रंथात केलेला आढळतो .
पानामध्ये बाष्पशील तेलासोबतच अमिनो असिड ,कार्बोहाड्रेड आणि अनेक प्रकारची विटॅमिन्स तसेच विड्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आढळतात .
प्रत्येक लग्नसमारंभात, किंवा घरगुती मेजवानीमधील भोजन पार पडले, की त्यानंतर विडा असतोच. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण या शिवाय विड्याच्या पानाचे इतरही अनेक फायदे आहेत.
विड्याच्या पानाचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ केल्यास घामामुळे किंवा अन्य काही कारणाने शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. तसेच विड्याची पाने पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकली जाण्यास मदत होते.
चेहऱ्यासाठी उपयोगी पाने - विड्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्याने याच्या वापराने चेहऱ्यावरील मुरुमे पुटकुळ्या दूर होण्यास मदत होते. यासाठी विड्याची काही पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी थंड झाले की याचा वापर चेहरा धुण्यासाठी करावा. तसेच विड्याच्या पानाची पेस्ट थोडी हळद घालून चेहऱ्यावर लावावी आणि पाच मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. विशेषतः बाहेरून उन्हातून आल्यानंतर या उपायाचा अवलंब करावा. त्याने कांती सुधारण्यास मदत होते.
पान शरीरातील अनेक व्याधींपासून आपलं संरक्षण करू शकतं.
दातांच्या आजारापासून तर सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि थकवा सुद्धा पान खाल्ल्यानं बरा होतो. याशिवाय पानात अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. पानाचा वापर प्राचीन काळापासूनच औषधांसाठी केला गेलाय.
गुघडेदुखी किंवा पायाचं दुखणं – जर आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल किंवा आपल्याला पायाला काही लागलं असेल, तर विड्याच्या पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करावं. असं गरम-गरम पान त्रास होत असलेल्या ठिकाणी लावावं. त्यानं आपला गुघडा शेकला जातो आणि तिथलं दुखणंही कमी होतं.
तोंड आलं तर विड्याचं पान अवश्य खावं – जर आपलं तोंड आलं असेल तर पान खाल्ल पाहिजे. मात्र पान विडा बनवून नाही तर फक्त त्यावर तूप लावून खावं. त्यावर दुसरं काही लावू नये. आपल्या तोंड्यातील अल्सर यानं बरे होतील.
श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत होणाऱ्या जळजळीवर उपयुक्त - श्वास घेण्यात आपल्याला त्रास होत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर आपण पानावर तूप किंवा तेल लावून तव्यावर पान ठेवून त्यानं छाती शेकावी. असं केल्यानं कफ पण सुटतो आणि जळजळही कमी होते.
थकवा, आळस आणि अनिद्रा – विड्याच्या पानात विलायची, पेपरमिंट, लवंग, गुलकंद किंवा मध टाकून बनवलेला विडा खावा. असा विडा खाल्ल्यानं आपल्या शरीरातील आळस, थकवा दूर होतो आणि निद्रानाशाची समस्या सुद्धा पळून जाते.
हिरड्यामधुन रक्त येत असल्यास विड्याची पाने पाण्यात उकळून मॅश करुन घ्या. हे हिरड्यांवर लावल्याने रक्त येणे कमी होईल.
पानाच्या रसात मध मिळवुन प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊ शकतो.
बध्दकोष्ट झाल्यावर पानाचे सेवन करणे खुप फायदेशीर असेत. रोज पान चावल्याने डायबिटीज नियंत्रित केले जाऊ शकते.
किडनी खराब झाल्यावर पानाचे सेवन करने फायदेशीर असते. यावेळी तिखट मसाले, दारु किंवा मांसाहारी पदार्थांपासुन दूर रहावे.
सूज आलेल्या ठिकाणी किंवा पाय मुरगळला तर, तेथे पान गरम करुन बांधले पाहीजे. यामुळे वेदनेपासुन आराम मिळतो.
काही जण कधी तरी पान खातात, तर काहींची ती सवय आहे. पान खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे आयुर्वेदात नमुद आहे. पण त्याचे सेवन प्रमाणात हवे. अतिशयोक्ती, मग ती कशाचीही असो. ती वाईटच.
पानाचे होणारे नुकसान
विड्याच्या पानाला जर्द्याबरोबर (तंबाखू) खाल्ल्यास पानातील गुण नष्ट होतात.
विडा नेहमी जेवण झाल्यानंतरच खायला पाहिजे. रिकाम्या पोटी पान खाणे चांगले नसते.
जास्त पान खाल्ल्यास वा त्याची सवय असल्यास त्रास होतो. तोंड किंवा डोळ्यांसंबंधी रोग होण्याची शक्यता असते.
पानासोबत जास्त कात टाकल्यास श्वसनाचा विकार होण्याची शक्यता असते.
ज्यांना ताप, दातांचे विकार असतील त्यांनी पान खाणे शक्यतो टाळावे.
पान खाणं ही वाईट सवय नसून विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पान खाल्ल्यानं अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.
5
Answer link
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात.
भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. जगातील निवडक देशांच्या चलनावर विश्वास ठेवला जातो, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. जवळपास प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचं प्रतिनिधीत्व करतो.
मात्र भारतीय नोटांवर पहिल्यापासून गांधीजींचाच फोटो होता असं नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. 1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं.
त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.
नोटांवरील गांधीजींचा फोटो नेमका कुठला?
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय नोटांवर कोणत्याही भारतीय व्यक्तींचा फोटो नव्हता. भारत पारतंत्र्यात असल्याने कोणाचाही फोटो नव्हता. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो होता. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो छापणं बंद झालं.
भारतीय नोटेवर देशातील विविधतेचं दर्शन आहे. प्रत्येक मैलावर बदलणाऱ्या भाषांना नोटांवर स्थान देण्यात आलं आहे. देशातील 15 भाषांमध्ये त्या त्या नोटेचं मूल्य लिहिलेलं असतं.
2
Answer link
धावपळीचे दिवस, बदलती जीवनशैली, सतत वाढणारा तणाव, थकवा इत्यादी कारणांमुळे जांभई येते. व्यस्त वेळापत्रकामुळे शरीराला आराम मिळत नाही, त्यामुळे जांभई येते. पण सतत जांभई येणे आरोग्यास घातक सुद्धा ठरू शकते. शिवाय काही लोकांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभई देण्याची सवय असते.
जांभळी येण्याचे कारण :-
★ थकवा किंवा अपूर्ण झोपे★ काही औषधांमुळे
★ शरीराचे तापमान कमी होणे
★ मेंदूच्या कार्यांमध्ये बिघाड
★ शरीरात ऑक्सिजनची कमतरता
★ लिव्हर निकामी होण्याचा अंतिम टप्पा
थकवा नसतानाही जांभई येणे, हे हृदय विकाराचे लक्षणही असू शकते.
★ मेंदूचे कार्य मंदावल्यास जांभईचे प्रमाण वाढते