कुतूहल
तोंडाला पाणी का सुटते?
2 उत्तरे
2
answers
तोंडाला पाणी का सुटते?
2
Answer link
तोंडाला पाणी
चिकन, मटण, मासे अशी नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पावसाळ्यातल्या पिकनिकमध्ये तर गरमागरम नॉनव्हेज हवंच. पण ते खाताना त्याचे फायदे-तोटेही लक्षात घ्यायला हवेत.
चिकन, मटण, मासे अशी नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पावसाळ्यातल्या पिकनिकमध्ये तर गरमागरम नॉनव्हेज हवंच. पण ते खाताना त्याचे फायदे-तोटेही लक्षात घ्यायला हवेत.
पावसाळा आला म्हणजे मस्त गरमागरम भजीसोबतच पावसाळी पिकनिक आणि झक्क मांसाहाराचे बेत शिजू लागतात. शाकाहार तसा पचायला हलका. पण त्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त नसतं. मांसाहार पचायला जड असला तरी त्यातून आपल्याला प्रथिनं, लोह, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व मिळतात. पण त्यात चोथा अर्थात फायबर नसतं. मांसाहारात प्रथिनं असल्यामुळे लहान मुलं, आजारी माणसं यांना पचेल त्या प्रमाणातच तो द्यावा लागतो. त्यामुळे तब्येत सुधारायला खूप मदत होते. जखमा भरणं, शक्ती येणं, झीज भरून निघणं हे मांसाहारामुळे सहज शक्य होतं; पण त्यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. अंडी, मासे, मांस हे ताजे आणि स्वच्छ असावेत. मांसाहारात किडनी, लिव्हर, ब्रेन शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे अंड्यातील पिवळ्या भागात चरबीचं प्रमाण जास्त असतं, तेही घेणं टाळावं. कोंबडीची कातडी, कलेजी, भेजा यांत स्निग्धांश जास्त असतो. त्यामुळे त्यावरही लगाम असू द्यावा.
त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी; गावठी कट्टा, काडतुसे जप्त
मासे जरुर घ्या. माशांपासून उत्तम प्रथिनं आणि कमी स्निग्धांश मिळतो. माशांचं तेल स्मरणशक्ती वाढवतं, त्वचेला तजेलदारपणा आणणं, हृदयरोग कमी करणं यासाठी उपयोगी पडतं. बांगडा, ट्यूना या माशांतील ‘ओमेगा ३’ हे फॅटिअॅसिड अत्यंत उपयुक्त आहे; पण मासा तळून खाऊ नये. भाजून, ग्रिल करून, बेक करून घ्यावा. कोळंबी, खेकडे, तिसऱ्या या प्रकारच्या माशांत ‘ओमेगा ३’ कमी असतं. कोलेस्टेरॉल जास्त असतं. म्हणून हे मासे वरचेवर घेणं टाळावं.
मांसाहारासाठी रस्सा करताना खोबरं, तीळ, शेंगदाणे, तेल, मसाल्यांचा भरपूर वापर केला जातो. पण त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. मांसाहाराबरोबर नेहमी कच्चं सॅलड भरपूर खावं किंवा पालेभाजी घ्यावी. उदा. मटण पालक. रेडमीट, अंड्याचा पिवळा भाग, सॉसेजेस सलामी, चिकन स्कीन यांत सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असणाऱ्यांनी, स्थूल व्यक्तींनी ते अजिबात घेऊ नये.
वाढीच्या वयातील मुलं, आजारातून बरं होण्यासाठी रुग्णांना, खेळाडूंना मांसाहार निश्चितपणे द्यावा; पण त्यातली सर्व पथ्य सांभाळूनच! अंड्याचा पांढरा भाग, चिकन, स्कीन काढलेले मासे याला शाकाहारातील पर्याय म्हणजे दूध, कडधान्यं, डाळी, तेलबिया, वेगवेगळी तेलं, काळे चणे, राजमा, गडद हिरव्या रंगांच्या पालेभाज्या इ. आहे. मांसाहार शक्यतो दिवसा करावा. रात्रीच्या जेवणात फार मसालेदार आणि जड पदार्थ घेणं टाळावं.
0
Answer link
तोंडाला पाणी सुटण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- भूक लागणे: जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा शरीर अन्नाची तयारी करते. लाळAnnotations on केमुळे अन्न गिळणे आणि पचन करणे सोपे होते.
- वास: चांगल्या अन्नाचा वास घेतल्याने तोंडाला पाणी सुटते. वासामुळे मेंदूतील लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी सक्रिय होतात.
- विचार: आवडत्या पदार्थांचा विचार केल्याने देखील तोंडाला पाणी सुटते.
- आजार: काहीवेळा काही आजारांमुळे देखील तोंडाला जास्त पाणी सुटते.
- औषधे: काही औषधांमुळे लाळ तयार होण्याची प्रक्रिया वाढते.