कुतूहल अर्थशास्त्र

नोटांवर केवळ गांधीजींचा फोटो का असतो?

1 उत्तर
1 answers

नोटांवर केवळ गांधीजींचा फोटो का असतो?

5
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात.

भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. जगातील निवडक देशांच्या चलनावर विश्वास ठेवला जातो, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. जवळपास प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचं प्रतिनिधीत्व करतो.

मात्र भारतीय नोटांवर पहिल्यापासून गांधीजींचाच फोटो होता असं नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. 1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं.

त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.

नोटांवरील गांधीजींचा फोटो नेमका कुठला?
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.

स्वातंत्र्यापूर्वी भारतीय नोटांवर कोणत्याही भारतीय व्यक्तींचा फोटो नव्हता. भारत पारतंत्र्यात असल्याने कोणाचाही फोटो नव्हता. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो होता. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो छापणं बंद झालं.

भारतीय नोटेवर देशातील विविधतेचं दर्शन आहे. प्रत्येक मैलावर बदलणाऱ्या भाषांना नोटांवर स्थान देण्यात आलं आहे. देशातील 15 भाषांमध्ये त्या त्या नोटेचं मूल्य लिहिलेलं असतं.
उत्तर लिहिले · 2/10/2021
कर्म · 740

Related Questions

तोंडाला पाणी का सुटते?
पैसा गल्ल्यांमध्ये लिंबू का ठेवतात?
तृतीयपंथीयांची प्रेतयात्रा रात्री का निघते?
सूर्याचा नक्की रंग कोणता? तो पिवळा का दिसतो?
पान खाताना त्याचा रस गिळला पाहिजे की थुंकून टाकला पाहिजे?
जांभळी का येते?
नवीन चपला किंवा जोडे का चावतात?