तांत्रिक समस्या कोरोना

मी करोनाची लस घेतली आहे पण जो रजिस्टर मोबाईल नंबर होता तो बंद आहे आणि मोबाईल चोरीमुळे मसेज पण गेले सगळे सिम पण माझ्या नावावर नसल्यामुळे ते परत घेऊ शकत नाही, तरी त्याचे सर्टिफिकेट कसे घ्यावे?

1 उत्तर
1 answers

मी करोनाची लस घेतली आहे पण जो रजिस्टर मोबाईल नंबर होता तो बंद आहे आणि मोबाईल चोरीमुळे मसेज पण गेले सगळे सिम पण माझ्या नावावर नसल्यामुळे ते परत घेऊ शकत नाही, तरी त्याचे सर्टिफिकेट कसे घ्यावे?

5
ज्या क्रमांकाने लसीकरणासाठी नोंदणी केली असेल तोच क्रमांक तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र घेण्यासाठी लागेल. याव्यतिरिक्त तुम्ही डिजीलॉकरवरून तुमचे लसीकरण प्रमाणपत्र घेऊ शकता. त्यासाठी डिजीलॉकरचा तेरा अंकी खाते क्रमांक तुम्हाला माहीत पाहिजे.
सध्यातरी दुसरा पर्याय कुठल्याही ऍपमध्ये नाही.

शेवटचा पर्याय म्हणून कोविड लसीकरण आणि CoWIN ऍप संबंधित प्रश्नांविषयी माहिती आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही राष्ट्रीय हेल्पलाइन 1075 वर संपर्क करू शकता. त्यांना फोन करून तुमची समस्या सांगा. ते तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र मिळवून देतील.
उत्तर लिहिले · 11/9/2021
कर्म · 282915

Related Questions

आयडियावरून वोडाफोन वर डेटा कसा ट्रान्सफर करावा ?
मोबाईल पाण्यात भिजला तर काय करावे ?
लिफ्टचा सेन्सर खराब होतो का, काल एक विडिओ आली होती त्यामध्ये एक व्यक्ती हाताने लिफ्ट डोअर थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचा हात त्यामध्ये अडकून अपघात होतो असे होऊ शकते का ?
मोबाईल नेट चालू असताना २४९ असा एरर कोड नंबर, टाईम आऊट सर्व्हर असे अँप इतर काही डाऊनलोड करते वेळी दाखवे ते का, नेटमध्ये समस्या येऊ नये यासाठी काय करावे ?
माझ्याकडे मोबाईल आहे त्यात नेट आहे ते कॉम्पुटर ला वायफाय ने कसे सुरु करावे?
व्हाट्सअँप चालू केल्यापासून सर्व चॅटिंग सेंड केलेले मेसेजेस रिटर्न घेण्यासाठी एखादे अँप आहे का, हि सुविधा देण्यास व्हाट्सअँप असमर्थ आहे का ? अगोदर यावर विचार होणे अपेक्षित होते आणि तसे नसेल तर मग सरकार तर सर्व सोसिअल मीडिया वर नियंत्रण ठेवणार होते मग ते कसे ?
आपल्या मोबाईल वरून दुसऱ्या मोबाईलचे लॉक उघडता येते का व ते कसे ?