घरगुती उपाय फोन आणि सिम तांत्रिक समस्या

मोबाईल पाण्यात भिजला तर काय करावे ?

3 उत्तरे
3 answers

मोबाईल पाण्यात भिजला तर काय करावे ?

13
●मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा●

आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास फोन पावसात ओला झाला किंवा त्यावर पाणी पडलं तर हे सोपे उपाय करून बघा-

★सर्वात आधी करा स्विच ऑफ

पाण्यात ओला झाल्यावर सर्वात आधी मोबाइल लगेच स्विच ऑफ करून द्यावा. ऑफ होऊन गेला असेल तर ऑन करण्याची चूक मुळीच करू नका. पाण्याचा एक थेंब आतापर्यंत पोहचला असेल तर चिपमध्ये लागलेल्या सर्किंट्सला आपसात जोडून त्याला खराब करू शकतो. आपल्या फोनमध्ये स्पार्किंग देखील होऊ शकतं. फोनमध्ये लावलेली ऍक्सेसरीज लगेच हटवून द्या.

★लगेच बॅटरी काढा

पाण्यात फोन पडल्यावर लगेच बॅटरी काढा. बॅटरी काढल्यावर हँडसेटमध्ये बॅटरीखाली लहान स्टिकर चिकटलेलं असतं, अनेक फोनमध्ये स्टिकरचा रंग पांढरा असतो. फोनच्या आत पाणी गेल्यास स्टिकर गुलाबी किंवा लाल रंगात बदलून जातं. या स्टिकरचा रंग परिवर्तित असल्यास फोनमध्ये मॉइस्चर आहे समजून घ्या.

★फोन वाळवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा मायक्रोवेव्ह वापरू नये

फोन वाळवण्यासाठी कधीही मायक्रोवेव्ह किंवा हेअर ड्रायर वापरू नका. याने फोनला हानी होऊ शकते. फोन पंख्याखाली ठेवून वाळवण्याचा प्रयत्न करा. फोन वाळवण्यासाठी थेट सूर्य प्रकाशात ठेवू नका.

◆मॉइस्चरायझर हटवा

हार्डवेअर किंवा केमिस्टच्या दुकानातून वॉटर ब्लॉटिंग पेपर खरेदी करा. यात वाळवलेल्या फोनला सिलिका पॅकमध्ये किमान दोन दिवसासाठी ठेवून द्या.

★तांदूळ

एका कंटेनरमध्ये तांदूळ भरून आपल्या फोन एक दिवसासाठी यात ठेवून द्या.

◆पूर्ण ड्राय झाल्यावरच करा रीस्टार्ट

फोन पूर्ण वाळल्यावरच त्यात बॅटरी व सिम टाकून स्टार्ट करा. स्क्रीनवर लाइन येत असल्यास किंवा बटण क्लिक होत नसल्यास किंवा फोन ऑन होत नसल्यास दुरुस्तीसाठी टाकावा लागेल.
उत्तर लिहिले · 22/8/2018
कर्म · 123520
8
📱 सगळ्यात आधी फोन बंद करा, जर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते

🔋 बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढा, फोनचे सर्व पार्टस्‌ वेगवेगळे केल्यानंतर त्यांना वाळवणे गरजेचे

🍚 मोबाइल तांदळाच्या प्लेटध्ये ठेवा. तांदूळ मोबाइलमधून पाणी शोषून घेते

उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 5605
1
*_🤔मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? वाचा!_*


_मोबाईल पाण्यात पडला की आपल्या हृदयात एकदम धस्स होतं. बोलून चालून यंत्रच हो ते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते जिवंत राहील की नाही याची शाश्वती देणे कठीणच! अश्यावेळी पाण्यात पडलेला मोबाईल जरी सुरु झाला तरी तो अजून किती वेळ नीट काम करेल हे सांगता येत नाही, कारण मोबाईलच्या आता जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो._

अश्यावेळी सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास सर्वप्रथम फोन स्विच ऑफ कराआणि त्याची बॅटरी काढून ठेवा.सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत.बहुतेक पद्धती तुम्ही ऐकून असालच, तर काही पद्धती अजून तुमच्या कानापर्यंत पोचायच्या बाकी असतील. आज आम्ही त्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास आपण मोबाईल वाळवू शकतो.

◼एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.

◼दुसरी एक पद्धत म्हणजे मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.

◼ओला मोबाईल हेअर ड्रायरने कधीही वाळवू नये.ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.

◼मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता.हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

*_📍आता ह्यापुढे जर कधी मोबाईल पाण्यात पडला की घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य व सोप्पी वाटते ती वापरा…_*
उत्तर लिहिले · 7/5/2019
कर्म · 569205

Related Questions

ऍसिडिटी वर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकरणाचे चट्टे उटले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?
कंबरदुखीवर घरगुती उपाय काय आहे? (मेथीचे अर्धा एक चमचा दाणे कपभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी ते पाणी प्यायल्यास कंबरदुखीवर कमी होते का/थांबते का?)