Topic icon

तांत्रिक समस्या

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
5
ज्या क्रमांकाने लसीकरणासाठी नोंदणी केली असेल तोच क्रमांक तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र घेण्यासाठी लागेल. याव्यतिरिक्त तुम्ही डिजीलॉकरवरून तुमचे लसीकरण प्रमाणपत्र घेऊ शकता. त्यासाठी डिजीलॉकरचा तेरा अंकी खाते क्रमांक तुम्हाला माहीत पाहिजे.
सध्यातरी दुसरा पर्याय कुठल्याही ऍपमध्ये नाही.

शेवटचा पर्याय म्हणून कोविड लसीकरण आणि CoWIN ऍप संबंधित प्रश्नांविषयी माहिती आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही राष्ट्रीय हेल्पलाइन 1075 वर संपर्क करू शकता. त्यांना फोन करून तुमची समस्या सांगा. ते तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र मिळवून देतील.
उत्तर लिहिले · 11/9/2021
कर्म · 282765
5
तुम्हाला जर बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर तो आयडिया मधून वोडाफोन मध्ये होणार नाही परंतु जर तुम्हाला तुमच्या आयडिया कार्डमधून वडाफोन कार्ड मध्ये सेव्ह केलेले नंबर आणि नाव टाकायचे असेल तर ते होतील यासाठी कॉन्टॅक्ट सेटिंग मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑप्शन आहेत त्यामध्ये जाऊन करावे किंवा ई-मेल आयडी वर सेव करावे व कोणत्याही डिवाइस मध्ये ईमेल आयडी ओपन केल्यावर तुमचे सर्व कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिक येथील
धन्यवाद
उत्तर लिहिले · 13/7/2018
कर्म · 4160
13
●मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा●

आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास फोन पावसात ओला झाला किंवा त्यावर पाणी पडलं तर हे सोपे उपाय करून बघा-

★सर्वात आधी करा स्विच ऑफ

पाण्यात ओला झाल्यावर सर्वात आधी मोबाइल लगेच स्विच ऑफ करून द्यावा. ऑफ होऊन गेला असेल तर ऑन करण्याची चूक मुळीच करू नका. पाण्याचा एक थेंब आतापर्यंत पोहचला असेल तर चिपमध्ये लागलेल्या सर्किंट्सला आपसात जोडून त्याला खराब करू शकतो. आपल्या फोनमध्ये स्पार्किंग देखील होऊ शकतं. फोनमध्ये लावलेली ऍक्सेसरीज लगेच हटवून द्या.

★लगेच बॅटरी काढा

पाण्यात फोन पडल्यावर लगेच बॅटरी काढा. बॅटरी काढल्यावर हँडसेटमध्ये बॅटरीखाली लहान स्टिकर चिकटलेलं असतं, अनेक फोनमध्ये स्टिकरचा रंग पांढरा असतो. फोनच्या आत पाणी गेल्यास स्टिकर गुलाबी किंवा लाल रंगात बदलून जातं. या स्टिकरचा रंग परिवर्तित असल्यास फोनमध्ये मॉइस्चर आहे समजून घ्या.

★फोन वाळवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा मायक्रोवेव्ह वापरू नये

फोन वाळवण्यासाठी कधीही मायक्रोवेव्ह किंवा हेअर ड्रायर वापरू नका. याने फोनला हानी होऊ शकते. फोन पंख्याखाली ठेवून वाळवण्याचा प्रयत्न करा. फोन वाळवण्यासाठी थेट सूर्य प्रकाशात ठेवू नका.

◆मॉइस्चरायझर हटवा

हार्डवेअर किंवा केमिस्टच्या दुकानातून वॉटर ब्लॉटिंग पेपर खरेदी करा. यात वाळवलेल्या फोनला सिलिका पॅकमध्ये किमान दोन दिवसासाठी ठेवून द्या.

★तांदूळ

एका कंटेनरमध्ये तांदूळ भरून आपल्या फोन एक दिवसासाठी यात ठेवून द्या.

◆पूर्ण ड्राय झाल्यावरच करा रीस्टार्ट

फोन पूर्ण वाळल्यावरच त्यात बॅटरी व सिम टाकून स्टार्ट करा. स्क्रीनवर लाइन येत असल्यास किंवा बटण क्लिक होत नसल्यास किंवा फोन ऑन होत नसल्यास दुरुस्तीसाठी टाकावा लागेल.
उत्तर लिहिले · 22/8/2018
कर्म · 123520
6
हो असे होऊ शकते. पुण्यातील एक घटना मी न्युज पेपर मध्ये वाचली होती. एका लहान मुलाचा हात त्या अपघातात गेला. एक मांजर लिफ्ट मध्ये जाताना त्या मुलाने पाहिले. मांजराला वाचवण्यासाठी त्या ने लिफ्ट मध्ये हात घातला तर त्याचा हात कट झाला.
असे अपघात होऊ शकतात त्यामुळे लिफ्ट चा काळजीपूर्वक वापर करावा.
उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 8750
26
त्यासाठी तुमच्या वेब ब्राउझर मध्ये जावा.option दाबा.clear cashe व cookies व history पूर्ण clear करा.तुम्ही असे ही करू शकता,मोबाईल सेटिंग मध्ये जाऊन storage निवडा.त्यामध्ये clear cashe असेल तर त्याला ही clear करा.
तुमचा मोबाईल बंद करा.त्यामधील सिम काढा.थोडावेळ म्हणजे कमीत-कमी 5 मिनिटे सिम बाहेर राहू द्या.
सिम मोबाईल मध्ये घाला.तुमच्या ज्या ऑपरेटर चे सिम आहे त्याच ऑपरेटर चे सिम असलेले दुसरे मोबाईल घ्या त्यावरून तुमच्या सिम ऑपरेटर च्या कस्टमर केअर ला कॉल करा.त्यांनी सांगितल्या प्रमाणे सेटिंग करा.किंवा तुम्ही कस्टमर केअर कडून GPRS SETTING मागवून घ्या.SETTING ला SAVE(संपादित) करून घ्या.सेटिंग SAVE झाल्यानंतर तुमचा मोबाईल बंद करून चालू करा.नेट चालू करून पहा.नंतर आम्हाला कमेंट मध्ये कळवा नेट चालू झाले अथवा नाही.
उत्तर लिहिले · 5/7/2018
कर्म · 569205
13
सर्व प्रथम मोबाइलचा Hot-spot ऑन करा. व नंतर कम्प्युटर च्या खालच्या कोपर्‍यातील Wi-Fi ऑन करा. मग कम्प्यूटर च्या स्क्रीनवर Wi-Fi सर्च होईल, व आसपास किती Wi-Fi चालू आहे, त्या सर्वांची नावे स्क्रिनवर दिसेल. त्या मधुन तुमच्या मोबाईलचे Hot-spot चे नाव वर क्लीक करा, पण तुमच्या मोबाईलच्या Hot-spot ला पासवर्ड असेलतर, त्या नाव वर क्लिक केले नंतर पासवर्ड इन्टर करा. मग तुमच्या मोबाईलचा Hot-spot कम्प्युटर च्या Wi-Fi ला कनेक्ट होईल.

उत्तर लिहिले · 5/7/2018
कर्म · 10865