झोप

अश्वगंधा पावडर खाण्यामुळे झोप येते का? (मी आज सकाळी जराशी अश्वगंधा पावडर पाण्यातून घेतल्यावर मला दिवसभर झोप येत होती).

1 उत्तर
1 answers

अश्वगंधा पावडर खाण्यामुळे झोप येते का? (मी आज सकाळी जराशी अश्वगंधा पावडर पाण्यातून घेतल्यावर मला दिवसभर झोप येत होती).

2
आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतो, अश्वगंधा मध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स आणि विट्यांमिंसमुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. अश्वगंधा च्या सेवनाने ६९% झोप न येण्याची समस्या आणि ताण तणाव या सारख्या समस्या दूर होतात. अश्वगंधा टेस्टोस्टेरोन लेवल वाढवते, तसेच वीर्य ची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.अश्वगंधा एक गुणकारी औषधी आयुर्वेदिक वनस्पती आहे यामुळे ही खुप उपयोगी आहे. अश्वगंधामुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत होते, पण याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. जर याचा जास्त प्रमाणात वापर केलात तर नुकसानदायक ठरू शकते. अश्वगंधा एक बलवर्धक रसायन मानले जाते. प्राचीन काळापासून आत्तापर्यंत अनेक विद्वानांनी या वनस्पतीची एक गुणकारी औषध म्हणून प्रशंसा केली आहे. प्राचीन काळापासून याला एक शरीरातील शक्तिवर्धक परम पौष्टिक व सर्वांग शक्ती देणारा, क्षय रोगनाशक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा, वृधावस्थेला जास्त काळासाठी दूर ठेवणारा सर्व्वोत्तम वन औषधी मानले जाते. हे खोकला, खाज, व्रण, आमवात इत्यादी नाशक आहे.अश्वगंधाचे सर्वात जास्त रसायने त्याच्या मुळांमध्ये आढळते. बऱ्याच ठिकाणी अश्वगंधाची शेती केली जाते. अश्वगंधा ची मुळी जवळ जवळ ६००० रु प्रती क्विंटल तसेच याच्या बिया ५० रु. प्रती किलो या किमतीने विकल्या जातात. याची उंची १७० सेंटीमीटर असते.

अश्वगंधा ची पाने व याचे मूळ उकळून चहा बनवला जातो, जे आरोग्यासाठी लाभदायक असते. अजून हि अश्वगंधा चे फायदे आहेत. अश्वगंधा ची पाने त्वचा रोगावर लाभदायक असतात. यामुळे शरीरावरील सूज कमी होते, शरीरावरील घाव तसेच जखम अश्वगंधाच्या वापरण्याने लवकर बरी होते, अश्वगंधाचा चूर्ण कोणत्याही तेलात मिसळवून ते शरीरावर लावल्याने चर्मरोग होत नाही. अजून अनेक रोग बरे करण्यासाठी अश्वगंधा चा वापर केला जातो.

अश्वगंधा चे चूर्ण दुधात मिसळवून त्याचे सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो, अश्वगंधा चे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि याच्या सेवनाने आपली स्मरणशक्ती वाढते, यामुळे आपल्याला डोकेदुखी व अर्धशिशी(Migraine) सारखे आजार होत नाहीत. याच्या सेवनाने शरीर मजबूत होते, आपली हाड मजबूत होतात. अश्वगंधा चा औषध म्हणून वापर अनेक वर्षान पासून होत आहे.

याच्या सेवनाने उंची वाढण्यास मदत होते, अश्वगंधाच्या सेवनाने कर्करोग सारख्या आजारांचा धोका कमी होतो. याच्या सेवनाने आपले मन शांत राहते, जे लोक संभोग करताना लवकर थकतात त्याच्या साठी खूप प्रभावशाली औषध आहे. आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतो, अश्वगंधा मध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स आणि विट्यांमिंसमुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. अश्वगंधा च्या सेवनाने ६९% झोप न येण्याची समस्या आणि ताण तणाव या सारख्या समस्या दूर होतात.

अश्वगंधा टेस्टोस्टेरोन लेवल वाढवते, तसेच वीर्य ची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते. परंतु अश्वगंधा जास्त प्रमाणात खाल्याने याचे नुकसान देखील होतात. जास्त सेवन केल्याने झोप येऊ लागते, आपण आळशी होतो, अश्वगंधा च्या जास्त सेवनाने आपल्याला इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते उदा. पोटा संबंधी, डोक्या संबंधी, शरीरा संबंधी समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते, अश्वगंधा च्या जास्त सेवनाने पोटाचे रोग, आपले शरीर कमजोर होते, गर्भवती महिलांनी याचे जास्त सेवन केल्याने त्यांना हे नुकसानदायक ठरते, डॉक्टरही सल्ला देतात कि अश्वगंधा वापर ठराविक वेळे पर्यंत केला पाहिजे तसेच योग्य सल्ला घेऊन याचा वापर केला पाहिजे.


उत्तर लिहिले · 19/8/2021
कर्म · 121725

Related Questions

रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप लागू नये अधून मधून जाग यायला पाहिजे काय करावे?
जेवल्यानंतर झोप का येते? जेवल्यानंतर झोपणे योग्य की अयोग्य ?
30 ते 40 वयातील पुरुषांनी किती वेळ झोप ghvi?
तुम्ही दररोज किती तास झोप घेता?
अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?
मेलाटोनिन म्हणजे काय?
झोप येण्यासाठी काही उपाय आहेत का?