महाभारत

महाभारत कोणी लिहिलं?

1 उत्तर
1 answers

महाभारत कोणी लिहिलं?

1
महाभारत हा ग्रंथ जगामध्ये सर्वात मोठा काव्य ग्रंथ आहे, त्याच बरोबर सर्वात मोठे साहित्य ग्रंथ आहे, हा महाभारत ग्रंथ महर्षी व्यास यांनी सांगितले आणि महादेव पुत्र, गौरीनंदन गजानन यांनी लिहले आहे, हिंदू धर्म ग्रंथ म्हणून प्रसिध्द आहे, प्राचीन वेदांबरोबर याची तुलना केली जाते, म्हणून यास पाचवा वेद म्हटले जाते.

   
महर्षी व्यास. 

महाभारत ग्रंथात १,१०,००० एवढे श्लोक आहेत, या ग्रंथाची रचना सुमारे इसवी सण पूर्व ३१०० - १२०० का काळ मानला जातो. महाभारत हे एक जगातील सर्वांत मोठे महाकाव्य आहे. आणि या काव्यात राग, रंग, सौन्दर्य, क्रोध, अहंकार. मोह, व्देष, मत्सर, इ. अनेक रंगा - ढंगाचा मिलाप या काव्यात मिळतो. महाभारत म्हणजे एक अथांग महासागर आहे, अंत नाही असा तो खोल व लांब आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या नदीला लहान - लहान ओढे, नाले, नद्या येऊन मिळतात, त्या प्रमाणे या महाभारतात अनेक लहान - मोठ्या कथा येऊन मिळतात, त्या महाभारत काव्याला मोठा आकार देऊन एक महान काव्य निर्माण करतात.
जसे प्रत्येक चित्रपटाला एक नायक आणि एक खलनायक असतो असाच या कथेमध्ये श्रीकृष्ण हा सर्व कथेचा अभिनेता आहे. तोच सर्व सामर्थ्य सूत्रधार सुद्धा आहे, तर पाच पांडव व द्रौपदी ही या कथेचे सहकलाकार आहेत.

श्रीकृष्ण व शकुनी या दोघांनी मांडलेला हा बुद्धिबळाचा डाव आहे. त्या मध्ये श्रीकृष्णाकडे पांडव व पांचाळ वीर हेच मुख्य सैन्य आहेत तर शकुनी कडे शंभर कौरव, भिष्म, कर्ण, द्रोण, कृपादि दिग्गज मुख्य सैनिक आहेत, श्रीकृष्ण व शकुनी हे कपाटनीतीतील पारंगत एकमेकांसमोर लढण्यास निघालेत. परंतु शकुनीकडे द्रोणाचार्य व कृपाचार्य या दोन आचार्य व्यतिरिक्त आणखीन एक आचार्य आहे, विदुरनीतीच्या एकदम विरुद्ध अशी नीती, की तो कपटनीतीतील एक महान व क्रुर राजनीतीज्ञ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचे नाव आहे 'कणिकाचार्य.' याच आचार्याने धृतराष्ट्र आणि शकुनी यांना पांडवांचा समुळ नाश करण्याचा सल्ला दिला होता, लाक्षागृह प्रकरनामध्ये शकुनीची साथ,दुर्योधनाचा हट्ट, व धृतराष्ट्र यांचा पुत्रमोह, कर्णाची युद्धपिपासु वृत्ती या धृतराष्ट्राची बाजु बळकट वाटत होती.
परंतु त्रिकालदर्शी भगवान श्रीकृष्णा पुढे त्या कोणाचेच चालणार नव्हते, याची त्यांना जाणीव नव्हती, कृष्णांम वन्दे जगद्गुरुंम l


महाभारत
महाभारत हा धार्मिक ग्रंथ आहे

महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[१]

महाभारत

व्यास
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)
ऋषि वेदव्यास
अनुवादक
गणेश
भाषा
हिंदी आणि मराठी
देश
भारत
साहित्य प्रकार
ग्रंथ
या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते.

महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.

महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.

इतिहासाचा मागोवा संपादन करा
महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. आर्यभट्ट आणि इतर भारतीय गणितज्ञांनुसार महाभारत ई.पू. ३१३९ या वर्षी घडले. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.
'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरुप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे.

कथासार संपादन करा
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.

महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जैथे सांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरुराजा कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.

महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या सातव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते

शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दशराज कोळ्याकडे गेेला. दाशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला.त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.

इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पांडू राज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला.

पुढे धृृृृतराष्ट्राचा गांधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पांडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला.

पांडू राजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पांडूला शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता.त्या पुत्राचे नाव कर्ण असे होते आणि तोच कर्ण होय. पांडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले.

पुढे वनात असतानाच पंडूने माद्रीशी संग केल्याने तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली.

पाच पांडवांसह कुंती हस्तिनापुरास परत आली.

महाभारतातील पांडवांचा वनवास संपादन करा
कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. यादरम्यान पांडव भारतभर फिरले. भीमाला हिडिंबा, अर्जुनाला चित्रांगदा, नकुलला करेणुमती अशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले.

उपकथा / अंतर्भूत ग्रंथ संपादन करा

नळदमयंतीची कथा महाभारताच्या अरण्यकपर्वात येते.
महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे:

भगवद्गीता (भीष्मपर्व): हिंदू धर्म व तत्त्वज्ञानशाखांत मुख्य समजली जाणारी श्रीमद्भगवद्गीता, ही हिंदूंच्या वैदिक, आध्यात्मिक व यौगिक तत्त्वज्ञान आणि तंत्रशास्त्र या गोष्टींचा संगम आहे. गीतेत भक्ती, ज्ञान, ध्यान व कर्म या चारही योगमार्गांचा उपदेश कृष्णाने अर्जुनास केला आहे.
दमयंती (अरण्यपर्व): नळदमयंतीची कथा ही महाभारताच्या प्रसिद्ध उपकथांमध्ये एक आहे. स्वयंवरात इंद्र, वरुण यांना डावलून दमयंती नळास वरते.
कृष्णावतार: कृष्णाची संपूर्ण कथा "कृष्णावतार" पुराणात येते. ही कथा महाभारतातील महत्त्वाचे पात्र असलेल्या कृष्णाच्या लीलांचे वर्णन करते.
विष्णु सहस्रनाम (अनुशासन पर्व): विष्णु सहस्रनाम विष्णुच्या १,००० नावांचे स्तोत्र आहे. हे महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या १४९ व्या अध्यायात येते. युद्धानंतर मरणोन्मुखी भीष्मास युधिष्ठिर अनेक धर्मप्रश्न विचारतो तसेच पुण्यसंपादनाचा मार्गही विचारतो. भीष्म उत्तर म्हणून विष्णु सहस्रनाम सांगतात.
रामायणाची कथा महाभारताच्या अरण्यपर्वात संक्षिप्तपणे येते.
तत्त्वज्ञान संपादन करा

भीष्मोपदेश(व्यासकीय अनुशासन पर्व)
महाभारतातील तत्त्वोपदेश मुख्यत्वे चार ठिकाणी आला आहे.

विदुरनीती
सनत्सुजातीय
भगवद्गीता
अनुगीता
या खेरीज काही तत्त्वचिंतक भीष्मोपदेश व विदुरोपदेश यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनांत स्थान देतात.

महाभारताची पर्वे संपादन करा
पर्व क्र. पर्वाचे नाव उप-पर्व संक्षिप्त ओळख
१ आदि पर्व १-१९ ओळख, राजपुत्रांचा जन्म व शिक्षण
२ सभा पर्व २०-२८ राजसभा, द्यूतक्रीडा व पांडव वनवासाला जातात.
३ अरण्य पर्व २९-४४ पांडवांचा बारा वर्षांचा वनवास
४ विराट पर्व ४५-४८ अज्ञातवासाचे विराट नगरीतील वनवासाचे शेवटचे एक वर्ष
५ उद्योग पर्व ४९-५९ युद्धाची तयारी
६ भीष्म पर्व ६०-६४ महायुद्धाचा पहिला भाग म्हणजेच भीष्म कौरवांचे सेनापती असतानाचे पहिले दहा दिवस
७ द्रोण पर्व ६५-७२ युद्धाचा पुढील भाग जेव्हा द्रोण हे कौरवांचे सेनापती होते
८ कर्ण पर्व ७३ कर्ण कौरवांचा सेनापती असतानाचे युद्धाचे वर्णन
९ शल्य पर्व ७४-७७ युद्धाचा शेवटचा भाग जेव्हा शल्य कौरवांचा सेनापती होते
१० सौप्‍तिक पर्व ७८-८० अश्वत्थामाने रात्रीच्या अंधारात झोपलेल्या (सौप्‍तिक) पांडवपुत्रांवर पांडव समजून केलेले आक्रमण
११ स्त्री पर्व ८१-८५ गांधारी व इतर स्त्रियांनी मृतांसाठी केलेला शोक
१२ शांति पर्व ८६-८८ युधिष्ठिराचा राज्याभिषेक व भीष्मांचा युधिष्ठिराला उपदेश
१३ अनुशासन पर्व ८९-९० भीष्मांचा युधिष्ठिराला अखेरचा उपदेश
१४ अश्वमेध पर्व ९१-९२ युधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ
१५ आश्रमवास पर्व ९३-९५ धृतराष्ट्र, गांधारी, विदुर व कुंती यांचे वनाकडे प्रस्थान व वणव्यात मृत्यू
१६ मुसळ पर्व ९६ मुसळाचा शस्त्राप्रमाणे वापर करून यादवांचे झालेले गृहयुद्ध (यादवी)
१७ महाप्रस्थान पर्व ९७ पांडवांच्या स्वर्गारोहणाचा सुरुवातीचा भाग
१८ स्वर्गारोहण पर्व ९८ युधिष्ठिराचा सदेह स्वर्गात प्रवेश
खिला हरिवंश पर्व ९९-१०० श्रीकृष्णाचे चरित्र
महाभारतामधील व्यक्तिरेखा व स्थाने संपादन करा
मेनका, विश्वामित्र ऋषि दुष्यंत, शकुंतला, भरत शंतनू ,गंगा, मत्स्यगंधा/सत्यवती - देवव्रत/भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य भगवान व्यास, पाराशर, पराशर अंबा, अंबिका, अंबालिका पंडू, कुंती, माद्री - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. पांडव, (यम, वायू, इंद्र अश्विनीकुमार) धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, दुःशासन, दुःशीला, दुर्धर, दुर्जय. युयुत्सु विकर्ण. कौरव, शकुनी कृपाचार्य, विदुर द्रोणाचार्य, कृपी - अश्वत्थामा द्रुपद - द्रौपदी, शिखंडी, धृष्टद्युम्न, धृष्टकेतु विराट - उत्तर, कीचक सुभद्रा - अभिमन्यु उत्तरा - परीक्षित - जनमेजय हिडिंब, बकासुर हिडिंबा - घटोत्कच उलूपी

एकलव्य, कर्ण संजय, सुदामा, सात्यकी

चंद्रवंश ययाती देवयानी शर्मिष्ठा - पुरू यदु यादव शुक्राचार्य कच बृहस्पती उग्रसेन - कंस वसुदेव रोहिणी देवकी -बलराम कृष्ण नंद यशोदा पूतना कालिया नाग राधा रुक्मिणी सत्यभामा जांबवंती भीष्मक रुक्मी सांब प्रद्युम्न अनिरुद्ध जांबवंत

बृहन्नडा सैरंध्री दारूक देवदत्त गांडीव

वसिष्ठ ऋषि अरुंधती धौम्य ऋषि भारद्वाज ऋषि अष्टावक्र दुर्वास ऋषि हनुमान

जरासंध, शिशुपाल जयद्रथ, कालयवन

हस्तिनापुर, ऋषिकेश, इंद्रप्रस्थ, गांधार, मगध, वृंदावन, मथुरा, द्वारिका, द्वारका



कुरु वंशवृक्ष संपादन करा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कुरुक 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गंगा 
 
 
 
 
 
शंतनुक 
 
 
 
 
 
 
 
सत्यवती 
 
 
पराशर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
भीष्म 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
व्यास 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
{{{ साचा:चित्रांगदा विचित्रवीर्य}}}
 
 
 
 
 
 
 
अंबिका 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
विचित्रवीर्य 
 
 
 
अंबालिका 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
धृतराष्ट्रग 
 
गांधारी 
 
शकुनी 
 
 
कुंती 
 
पंडु राजाग 
 
 
माद्री 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कर्णच 
 
युधिष्ठिरड 
 
भीमड 
 
अर्जुनड 
 
नकुलड 
 
सहदेवड 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दुर्योधनत 
 
दु:शीला 
 
दु:शासन 
 
(९८ इतर पुत्र) 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
संकेत सूची:

पुत्र: निळा रंग
पत्‍नी: लाल रंग
पांडव: हिरवा पट्टा
कौरव: गुलाबी पट्टा
टीपा

क: कुरु साम्राज्यापूर्वी कुरुचे शंतनू आदी पूर्वज होते.
ग: विचित्रवीर्याच्या मरणानंतर व्यासांद्वारे धृतराष्ट्र व पांडुराज जन्मला.
च: कुंतीस कर्ण हा पुत्र सूर्याच्या वराने विवाहापूर्वी जन्मला.
ड: पांडव पंडूचे सख्खे पुत्र नव्हेत. ते खालील देवतांचे धर्मपुत्र होत.:
यमधर्म - युधिष्ठिर
वायुदेव - भीम
इंद्र - अर्जुन
आश्विनीकुमार - नकुल व सहदेव हे दोघे माद्रीचे पुत्र होत.
त: दुर्योधन व दुशीला, दुशासन ही गांधारीची अपत्ये आहेत (व इतर ९८ पुत्र इतर दहा राण्यांची संतती आहे.(???)
यार्दीकृत संशोधन 

उत्तर लिहिले · 18/8/2021
कर्म · 121725

Related Questions

शब्दतील आक्षरापासुन दोन शब्द तयार करा महाभारत?
उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
महाभारतात धृतराष्ट्रीय राज्याच्या पत्नीचे नाव काय आहे?
महाभारत रुद्र राष्ट्रीय राज्याचे पत्नीचे नाव काय?
'वयम् पंचाधिकम् शतम्' महाभारतातील या वाक्याचा अर्थ काय आहे?
रामायण व महाभारत या अगोदरचे वाडमय कोणते?
पांडवकालीन २०० ग्रँम वजनाचा गव्हाचा दाणा कोठे आहे?