महाभारत
'वयम् पंचाधिकम् शतम्' महाभारतातील या वाक्याचा अर्थ काय आहे?
1 उत्तर
1
answers
'वयम् पंचाधिकम् शतम्' महाभारतातील या वाक्याचा अर्थ काय आहे?
0
Answer link
आम्ही एकशे पांच आहोत.असा या वाक्याचा साधा सरळ सोपा अर्थ आहे.
हा महाभारतातील युधिष्ठिराच्या म्हणजे धर्मराजाच्या तोंडी असलेला श्लोक आहे. पांडवांना वनवासात पाठवल्यानंतर दुर्योधनाला समजले की पांडव हस्तिनापूरच्या जवळच्याच एका वनात राहात आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना खिजवायला धृतराष्ट्राला आपला खरा हेतू न सांगता दुर्योधन वनामध्ये पांडवांना शोधत-शोधत एका सरोवरापाशी येतो तेव्हा चित्रसेन गंधर्व तिथे स्नान करीत असल्यामुळे दुर्योधनाला गंधर्वाचे रक्षक सरोवरात स्नानासाठी प्रवेश करण्यापासून रोखतात त्यावर अर्थातच संतप्त होऊन दुर्योधन गंधर्व सेने सोबत युद्ध करतो त्यात चित्रसेन त्याचा पराभव करतो. दुर्योधनाचे पराभूत झालेले पळपुटे सैनिक पांडवांच्या वनातील निवासाकडे पोचतात आणि धर्मराजाला ही हकीकत सांगतात. त्यावेळी अर्जुन आणि भीम यांना धर्मराज आज्ञा करतो की त्यांनी जाऊन गंधर्व सेनेने बंदी केलेल्या दुर्योधनाला सोडवावे. अर्जुन आणि भीमा ला दुर्योधनाचा झालेला हा अपमान सुखावून जातो याप्रसंगी धर्मराज त्यांना आठवण करून देतो की जरी शंभर कौरव आणि पाच पांडव असे आपण वेगळे असलो आणि आपली परिस्थिती कौरवांना मुळेच ओढवलेली असली तरी संकटाच्या समयी आपण 105 एकत्रच आहोत आणि असायला पाहिजे.
त्याप्रसंगी धर्मराजाने काढलेले हे उद्गार, भाऊबंदकी, हेवेदावे, आपापसातील मत्सर, यामुळे वेगवेगळे झालेल्या सर्वांनी संकटसमयी एकत्र आले पाहिजे आणि शत्रूचा या एकी मुळेच पराभव करता येऊ शकतो याची जाणीव ठेवली पाहिजे, असा उत्तम संदेश देतात. म्हणून हा श्लोक महत्वाचा आहे.