दात

दातांचे प्रकार सांगा?

1 उत्तर
1 answers

दातांचे प्रकार सांगा?

2
मुखातील कठीण व सामान्यत: अन्नाचे तुकडे तसेच चर्वण करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या भागास दात असे म्हणतात. अन्न चावण्याबरोबरच शब्द उच्चारणात देखील दात महत्त्वाची भूमिका बजावतात. 

मानवाचे दात असमदंती असून त्यांच्या दाताचे तीन भाग पडतात :

(१) किरीट म्हणजे बाहेरील भाग;

(२) दंतमूळ, हे जबड्याच्या हाडात रुतून बसलेले असते;

(३) मान म्हणजे हिरडीलगतचा आकुंचलेला भाग.

दात तीन स्तरांनी बनलेले असतात : दंतिन, ज्यापासून पूर्ण दात बनलेला असतो; कठीण एनॅमल म्हणजे किरिटाच्या दंतिनावरील आवरण; दंतमज्जा, ही संयोजी ऊतींनी बनलेली असून तीत चेता आणि रक्तवाहिन्या असतात. दातांमध्ये या रक्तवाहिन्या आणि चेता दंतमुळाच्या टोकाशी असलेल्या रंध्रांवाटे आत शिरतात.

दातांच्या किरिटावरील आवरण (म्हणजेच एनॅमल) अत्यंत कठीण असते. दंतमूळ हाडासारख्या भासणाऱ्यापदार्थाने बनलेले असून या पदार्थाला संधानक म्हणतात. दंतमूळ जबड्याच्या हाडाच्या खोबणीत रुतून बसलेले असते, येथे संधानकालगत परिदंत आवरण (हे तलम संयोजी ऊतींच्या तंतूंनी बनलेले असते) असते. त्याने दात हिरड्यांना जोडलेले असतात.

मानवी दात भ्रूणाच्या मध्यजनस्तर आणि बहिर्जनस्तरापासून उत्पन्न होतात. एनॅमल हे तोंडातील अभिस्तरापासून उगम पावलेल्या खास एनॅमल जनकपेशींमार्फत तयार होते. दाताचे एनॅमल हायड्रॉक्सिअपेटिटच्या कॅल्शियम फॉस्फेटयुक्त स्फटिकाने बनलेले असल्यामुळे ते अत्यंत कठीण असते.
उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 25790

Related Questions

माझा दात अर्धा तुटला आहे मला अर्धा दात जुळवता येईल का, जर जुळवता येत असेल तर किती खर्च येईल?
कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे?
,लहान मुलांचे दात काढल्यानंतर काय करावे?
दात निरोगी राहण्यासाठी काय करावे?
दात घासण्यासाठी कशा कशाचा वापर करतात?
वयानुसार माणसाचे दातही मोठे होतात का? होतात, तर वयाच्या किती वर्षापर्यंत मोठे होत राहतात?
दात दुखत आहे कोणती गोळी घेऊ?