दात

कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे?

1 उत्तर
1 answers

कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे?

2
हिरड्या मजबूत बनवते :- कडुलिंबाची काडी दात घासण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. यामागे हे कारण आहे कि कडुलिंबाच्या काडीपासून नियमित दात साफ केल्यास हिरड्यांमध्ये मजबूत येते आणि दात साफ राहतात. दातांची समस्या दूर होते :- आजच्या बदलत्या लाईफस्टा‍ईलमध्ये काहीही आणि केव्हाही खाणे दातांसाठी नुकसानकारक असते.


 

कडूलिंबाची नव्हे तर या ‘काडी’ ने सकाळी दात करा स्वच्छ, दगडासारखे होतील मजबूत होतील दात

 
पूर्वीच्या काळी लोक आपले दात स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही टूथब्रश वापर करत नसायचे. पूर्वीच्या काळी लोकांकडे हाताने तोंड धूने या शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे हाताच्या बोटांनी ते आपले दात स्वच्छ करायचे. तरीदेखील त्या लोकांचे दात हे अतिशय स्वच्छ राहायचे. त्यानंतर अनेक जण कडू लिंबाच्या काडीने दात स्वच्छ करायचे.

कडू लिंबाची काडी ही औषधी गुणधर्म भरलेली वनस्पती आहे. कडू लिंबाच्या काडीने जर आपण दात घसले तर आपल्याला दातांना कसल्याही प्रकारची कीड लागणार नाही. तसेच आपले दात देखील मोठ्या प्रमाणात मजबूत होतात. मात्र, कालांतराने काळ असा बदलत गेला तसे दात स्वच्छ करण्याच्या पद्धती देखील बदलल्या. कालांतराने टूथब्रश मोठ्या प्रमाणात बाजारात आले.


 
पेस्ट देखील मोठ्या प्रमाणात बाजारात आली. त्यानंतर ब्रश आणि पेस्टने अनेक जण दातही स्वच्छ करू लागले. मात्र, काही जण त्यानंतरही हातानेच दात स्वच्छ करत होते. ते दंतमंजन वापरायचे. तसेच कोळशाचा चुरा करून देखील ते दात घासायचे. तसेच अनेक जण राखपासून दात घासायचे. काहीजण मिठापासून दात घासायचे.

आज देखील आपण परगावी जर गेलो असेल आणि आपल्याला सोबत ब्रश नसेल तर आपण हात किंवा मीठ याने आपले दात स्वच्छ करतो.मात्र, असे केल्याने आपले दात हे स्वच्छ निघत नाहीत, असा समज अनेकांचा असतो. मात्र, दात स्वच्छ निघतात. मात्र, दातावरील घाण ही निघत नाही. त्यामुळे काहीतरी आपल्याला दाताला लागेल असे घावे लागते. त्याला आपले दात हे स्वच्छ होत असतात.




अनेक जणांचे दात हे मोठ्या प्रमाणात दुखत असतात. त्याचप्रमाणे त्याच्या दातामध्ये कीड देखील लागलेली असते. याचे कारण देखील तसेच असते. जेवण केल्यानंतर दात स्वच्छ न करणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. दात व्यवस्थित स्वच्छ नाही केले तर आपल्या दातांमध्ये मोठ्याप्रमाणात अन्नकण अडकून बसतात. त्यामुळे आपले दात खराब होत असतात.

त्याचबरोबर चॉकलेट बिस्कीट खाऊन देखील आपले दात हे खराब होत असतात. त्यामुळे दात किडल्यावर आपल्याला रूट कॅनल सारख्या प्रक्रियादेखील करावी लागते. त्यामुळे आपले दात निरोगी ठेवायचे असल्यास त्याची काळजी घेणे हे नित्य क्रमप्राप्त आहे. अनेक लहान मुलं चॉकलेट खातात. त्यामुळे त्यांचे दात लहानपणी खराब होतात.त्यामुळे अशा मुलांना खूप त्रास होत असतो.


 
त्यामुळे लहान मुलांनी चॉकलेट बिस्कीट अजिबात खाऊ नये.आज कडुनिंबाच्या  वनस्पतीच्या काडीने जर आपण आपले दात घासले तर आपल्याला कसल्याही प्रकारची दात दुखी, दात कि डणार नाहीत आणि आपले दात दगडासारखे मजबूत होतील. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बाबत..या वनस्पतीचे नाव आघाडा असे आहे.







जर आपले दात दुखत असतील, दात किडलेले असतील दात ठणकत असतील तर आपण आघाड्याच्या झाडाची काडी घ्यावी आणि या काडीने आपले तोंड घासावे म्हणजेच दात घासावेत. त्यानंतर आपल्याला कसल्याही प्रकारची दात दुखी होणार नाही. दात कीडणार नाहीत आणि आपले दात हे दगडासारखे होतील. हा प्रयोग आपण आवर्जून करावा.


 
 

उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121725

Related Questions

माझा दात अर्धा तुटला आहे मला अर्धा दात जुळवता येईल का, जर जुळवता येत असेल तर किती खर्च येईल?
,लहान मुलांचे दात काढल्यानंतर काय करावे?
दात निरोगी राहण्यासाठी काय करावे?
दात घासण्यासाठी कशा कशाचा वापर करतात?
दातांचे प्रकार सांगा?
वयानुसार माणसाचे दातही मोठे होतात का? होतात, तर वयाच्या किती वर्षापर्यंत मोठे होत राहतात?
दात दुखत आहे कोणती गोळी घेऊ?