खरेदी ऑनलाईन खरेदी

कांद्याचे भाव वाढतील का ?

1 उत्तर
1 answers

कांद्याचे भाव वाढतील का ?

5
दक्षिण भारत असो की उत्तर भारत, लासलगाव बाजारपेठेतून देशभरातल्या कांद्याचे भाव ठरवले जातात.देशात बाराही महिने कांदा खाल्ला जातो. कांद्याचं पीक बाजारात येण्याचं एक मोठं वर्तुळ आहे जे 12 महिन्यांचं आहे. जून ते ऑगस्ट-सप्टेंबर या काळात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांदा बाजारात येतो. ऑक्टोबरमध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातली खरीप पीक म्हणजे लाल कांदा बाजारात येतो. तीन महिन्यांनंतर राजस्थान आणि महाराष्ट्रातून खरिपाच्या उशिराचं कांद्याचं पीक बाजारात येतं. त्यानंतर काही दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कांदे बाजारात असतात. एप्रिल-मे पर्यंत हाच कांदा ग्राहकांची भूक शमवतो.पावसाचा फटका बसला तर कांद्याच्या साखळीचं नुकसान होतं. यामुळे कांद्याच्या किमती कमी जास्त होतात.
पावसाचा फटका बसला तर कांद्याच्या साखळीचं नुकसान होतं. यामुळे कांद्याच्या किमती कमी जास्त होतात.
अडीशचे रुपये प्रतिदिन यानुसार तीन शेतकऱ्यांची 18 दिवसांच्या मजुरीचा खर्च 13,500 रुपये, कांद्याचं बियाणं आणि नर्सरीवर 9,000 रुपये तर कीटकनाशक आणि अन्य गोष्टींवर 9,000 रुपये खर्च येतो.(अंदाजे)एक एकर शेतीत कांद्याच्या उत्पादनासाठी वीजेचं बिल 5,000च्या आसपास येतं. शेतातून कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी 2,400 ते 3,000 एवढा खर्च येतो.
कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा आणि कुटुंबीयांच्या खर्चाचा यात समावेश नाही. सगळं नीट जुळून आलं तर एका एकरात साधारण 60 क्विंटल म्हणजे साधारण 6000 किलो कांद्याचं उत्पादन होतं.
मात्र कटू सत्य हे की शेतकऱ्यांच्या शेतात तयार झालेल्या कांद्याला कोणी विचारत नाही आणि त्याच्या किमती घसरणीला लागतात तेव्हा त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही
यामुळे कांदयाचेे दर वाढतील का? हे कोणीही सांगु शकत नाही.

Related Questions

ऑनलाईन क्लास अधिक आकर्षक होण्यासाठी आणि संपुर्ण मुलांना ते उपलब्ध करुन देता यावे यासाठी पाच सुचना कोणत्या कराल?
एखाद्या व्यक्तीस आपल्याकडून GPay ने पेमेंट हवे असेल, तर आपल्याकडे त्याची कोणती माहिती असायला हवी?
Phone pe किवा GPay ने पेमेंट केल्यावर आपल्याला हवी असलेली वस्तू विक्रेत्याकडून मिळेलच ही शाश्वती असते का? की त्याला पेमेंट मिळाल्यावर तो आपल्याला वस्तू न पाठवून फसवू शकतो?
ऑनलाईन प्रेम करणे बरोबर आहे का किंवा ऑनलाईन खर प्रेम होऊ शकते का?
वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का ? २ वारस आहेत?
मी एंजल ब्रोकींगवरून ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडून थेट ब्रोकर शिवाय share's खरेदी-विक्री करू शकतो का?
CCTV तून रेकॉर्ड होण्यासाठी इंटरनेट, वायफायची आवश्यकता असते का इंटरनेट शिवाय हि आपण विडिओ रेकॉर्ड करू शकतो ? MI चा CCTV पाहिला मी फ्लिपकार्ट वर ३००० रुपयात