शेअर बाजार
खरेदी
ऑनलाईन खरेदी
मी एंजल ब्रोकींगवरून ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडून थेट ब्रोकर शिवाय share's खरेदी-विक्री करू शकतो का?
1 उत्तर
1
answers
मी एंजल ब्रोकींगवरून ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडून थेट ब्रोकर शिवाय share's खरेदी-विक्री करू शकतो का?
6
Answer link
ब्रोकर म्हणजेच दलाल किंवा मध्यस्थी, हा असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही कंपनीचा समभाग(शेयर) खरेदी करू शकत नाही. हा एक नियम आहे जो सगळ्यांना पाळावा लागतो.
कंपन्या थेट दलालाशी संपर्क साधतात, जेणेकरून त्यांना एक विश्वास असतो, की होणारे व्यवहार एका भरवशाचा ठिकाणी होत आहेत. आणि अशाने कंपनी एका जबाबदारीतून मुक्त होते आणि आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करते.
डिमॅट खात्याव्यतिरिक्त तुम्हाला वेगळा दलाल शोधायची गरज नसते. जेव्हा तुम्ही डिमॅट खाते उघडता त्यावेळेस तुमचा दलाल निश्चित झालेला असतो. जसे की एंजल ब्रोकर्स कंपनीमार्फत जर तुम्ही खाते उघडले तर एंजल ब्रोकर्स हा तुमचा दलाल होतो.