शेअर बाजार

शेयर मार्केट 50,000 वर गेला म्हणजे काय झालं? ते 50,000 म्हणजे काय असतं?

1 उत्तर
1 answers

शेयर मार्केट 50,000 वर गेला म्हणजे काय झालं? ते 50,000 म्हणजे काय असतं?

13
५०,००० या आकड्याला सेन्सेक्स म्हणतात.
सेन्सेक्स म्हणजे साध्या शब्दांत सांगायचे तर मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये असणाऱ्या ३० विशिष्ट कंपन्यांच्या समभागांचे(शेयर्स) एकत्रित मूल्य आहे. म्हणजे या ३० कंपन्यांचे समभाग मिळून ५०००० रुपये होतात.

सेन्सेक्स हा आकडा शेयर मार्केट मधील गुंतवणुकीसाठी मदत करतो. सेन्सेक्स जितका जास्त तितका शेयर मार्केट मध्ये गुंतवणुकीचा धोका कमी.

शेयर मार्केट मध्ये पैसे हे शेयर धारकांचे असतात. जेव्हा सरकार काही आर्थिक निर्णय(ज्याने कंपन्यांचे नुकसान होईल असा निर्णय) घेते किंवा जागतिक मंदी चे चिन्ह दिसू लागतात तेव्हा शेयर धारक पैसे गुंतवायचे बंद करतात किंवा गुंतवलेले शेयर्स परत घेतात. याचा परिणाम सेन्सेक्स म्हणजेच शेयर मार्केटच्या निर्देशांकावर होतो आणि तो खाली येतो.

याउलट जेव्हा सरकार चांगला निर्णय घेते आणि जागतिक अर्थव्यवस्थादेखील मजबूत चाललेली असते अशावेळेस शेयर धारक आणखी शेयर खरेदी करतात आणि डिमांड मुळे शेयर्स चे भाव देखील वाढतात. याने शेयर निर्देशांक वाढतो.
उत्तर लिहिले · 23/1/2021
कर्म · 282765

Related Questions

स्मॉल कॅप फंड विषयी माहिती मिळेल का?
नाणेबाजाराची संरचना कशी स्पष्ट कराल?
सरकारने एस.टी.महामंडळात शेअर का गुंतवले आहेत,त्याचा फायदा सरकारला मिळतो काय?
नाणेबाजार म्हणजे काय?
नाणेबाजाराचे घटक कोणते?
मी एंजल ब्रोकींगवरून ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडून थेट ब्रोकर शिवाय share's खरेदी-विक्री करू शकतो का?
शेअर बाजार कडे सट्टा म्हणून पाहणारे मध्यमवर्गीय आता इंडेक्स गडगडला की कसा वीस होतात या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा?