शेअर बाजार
नाणेबाजाराची संरचना कशी स्पष्ट कराल?
1 उत्तर
1
answers
नाणेबाजाराची संरचना कशी स्पष्ट कराल?
0
Answer link
भारतातील नाणे बाजाराची संरचना :
भारतातील नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा आहे. यामध्ये संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र यांचा समावेश होतो. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, गुंतवणूक संस्था, भारतीय सवलत व वित्त गृह (DFHI) यांचा समावेश होतो. तसेच असंघटित क्षेत्रात सावकार, स्थानिक वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था (बँकर्स) व अनियंत्रित बिगर बँक वित्त पुरवठा, मध्यस्थ संस्था यांचा समावेश होतो.
भारतातील नाणे बाजाराचे केंद्र, मुंबई, दिल्ली व कोलकता या शहरांमध्ये एकवटले आहे. त्यामध्ये मुंबई हे एकमेव प्रभावी नाणे बाजाराचे केंद्र आहे. ज्यामध्ये भारतातील सर्व भागांमधून पैशाचा ओघ येतो.
पुढील तक्त्यावरून भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्राची कल्पना येऊ शकते.
भारतीय रिझर्व्ह बँक
व्यापारी बँका
सहकारी बँका
विकास वित्तीय संस्था
भारतीय सवलत व वित्तीय गृह
स्थानिक बँकर्स
सावकार
संघटित क्षेत्र
असंघटित क्षेत्र
अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था