2 उत्तरे
2
answers
वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का ? २ वारस आहेत?
1
Answer link
तुमच्या वडीलांना वडिलोपार्जित जमीन वीकण्यासाठी त्या 2वारसांची संमती लागेल
जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर केवळ तुमचाच अधिकार आहे तर थोडं थांबा! खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे.
वडिलोपार्जित संपत्तीच्या अधिकारासंदर्भात अनेक नियम आणि कायदे अस्तित्वात आहेत. प्रकरण इतकं साधं-सरळ नाही.
वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क?
तसं पाहायला गेलं तर समाजात वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो. 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली, त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे, असं निश्चित झालं.
हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे 2005 आधी कायदा तसा होता.
जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क नाही. कारण या प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतील. ही वाटणी रद्द करता येणार नाही.
हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला लागू होतो.
वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?
संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित.
कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कुणाकुणाचा वाटा असतो?
वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो. जर कुणाच्या कुटुंबात तीन मुलं असतील तर पहिली वाटणी तीन मुलांमध्ये होईल. आणि तिसऱ्या पिढीच्या मुलांना (त्या व्यक्तीची नातवंडे) ती संपत्ती आपल्या वडिलांच्या हिश्शातून मिळेल, .
तिन्ही मुलांना आपल्या वारसाहक्काप्रमाणे एक तृतियांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल.
मुस्लीम समाजात ही संपत्तीच्या वाटणीची पद्धत वेगळी आहे. जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही.
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे काय नियम आहेत?
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम कडक आहेत, कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात. त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात.
वाटणी झाली नसेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती ती स्वतःच्या मर्जीने विकू शकत नाही.
दुसरी पत्नी असेल तर...?
हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते. जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं.
अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्या व्यक्तीला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो.
वडिलोपार्जित संपत्ती नसेल तर त्यावर कुणाचा हक्क?
जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजे ती तुम्हीच कमावलेली असेल, तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची, याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे. तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता.
जर मृत्युपत्र नसेल तर...
सौम्या सांगतात, "वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगळता, जी तुम्ही कमवलेली आहे, त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. जर त्या व्यक्तीचे आई-वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजिविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो."
"जर माता-पितांना हिस्सा नको असेल तर त्यांची जबाबदारी उचलून कोणताही वारसदार ती संपत्ती घेऊ शकतो. दिवाणी कायद्याच्या कलम 125मध्ये देखभालीचा उल्लेख आहे. यानुसार त्या व्यक्तीवर अवलंबून असलेली पत्नी, आईवडील आणि मुलं त्या व्यक्तीच्या संपत्तीवर आपल्या उपजीविकेसाठी कायदेशीररीत्या दावा करू शकतात,"