शेती पिके शेतकरी लागवड

काळा गहू लागवडीबद्दल माहिती द्यावी. मार्केट रेट किती आहे ते सांगावे?

1 उत्तर
1 answers

काळा गहू लागवडीबद्दल माहिती द्यावी. मार्केट रेट किती आहे ते सांगावे?

3
युवा शेतकरी म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक

नांदगाव वाके (ता. मालेगाव) येथील बाबूलाल पगारे सलून व्यवसाय व वडिलोपार्जित दीड एकर शेतीवर कुटुंबीयांसमवेत उदरनिर्वाह करीत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारे युवा शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी फेसबुकवर नीलेश शेडगे (श्रीरामपूर, जि. नगर) येथील शेतकऱ्याने पेरणी केलेल्या काळ्या गव्हावरील माहिती घेतली

.आपणही शेतीत नवीन प्रयोग करावा म्हणून शेडगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पंजाबमधील मोहाली येथील नॅशनल ॲग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने संशोधित केलेले गहू (NABI MG) काळ्या गव्हाचे वाण आणून दिले.


काळा गहू घेण्यासाठी अनेकांकडून इच्छा

पगारे यांनी ३५ किलो काळ्या गव्हाचे बियाणे घेऊन २ नोव्हेंबर २०२० ला वीस गुंठ्ठ्यात सरी वरबा पद्धतीने पेरणी केली. आज या गव्हाची काढणी सुरू झाली असून, अनेकांनी अगोदरच काळा गहू घेण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचे बाबूलाल पगारे यांनी सांगितले. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, झारखंड व छत्तीसगडला गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.


बहुतांश शेतकऱ्यांकडून पाहणी

सलून दुकान सांभाळून अल्पभूधारक युवा शेतकरी बाबूलाल पगारे यांनी वीस गुंठ्ठ्यात (नाबी एम जी) काळ्या गव्हाची लागवड केली आहे. कसमादे परिसरात प्रथमच काळ्या गव्हावरील लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी बहुतांश शेतकरी पगारे यांच्या शेतात भेट देऊन पाहणी करीत आहेत.

मी दोन वर्षांपासून काळ्या गव्हाची लागवड करीत आहे. पंजाब येथील संशोधन संस्थेने याचे संशोधन केले आहे. पगारे यांनी फेसबुकवर माझ्याकडून माहिती घेतली होती. एकरी ३५ ते ४५ किलो बियाणे लागते. एकरी उत्पादन सुमारे १४ ते १८ क्विंटल मिळते.
- नीलेश शेडगे, शेतकरी, श्रीरामपूर (जि. नगर)

फेसबुक चाळत असताना शेडगे यांनी काळ्या गव्हावरील माहिती टाकलेली पाहिली आणि संपर्क केला. नवीन काहीतरी प्रयोग करावा म्हणून काळ्या गव्हाची लागवड करावी, असे वाटले.
- बाबूलाल पगारे, अल्पभूधारक शेतकरी, नांदगाव वाके

दरम्यान, काळा गहू हा अतिशय पौष्टिक आहे. त्यात मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आदी अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून येते. तसेच भरपूर प्रमाणात अँटी ऑक्‍सिडन्ट, अँथोसायनिन घटक या काळ्या गव्हात असल्यामुळे ताण तणाव, मधुमेह, लठ्ठपणा, इतर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा आहे.

लागवड खर्च ः नांगरणी १५०० रुपये
रोटर ः १००० रुपये
बियाणे खर्च ः ३५ किलो ६० रुपयांप्रमाणे - २१०० रुपये
सरी वरबा मजुरी ः ७०० रुपये
तणनाशक ः ९० रुपये
खत ः ६०० रुपये
संदर्भ:- Dailyhunt

उत्तर लिहिले · 10/3/2021
कर्म · 3965

Related Questions

शेतकरी गटाचे योजना काय आहे?
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?