अंधश्रद्धा प्राणी पाळीव प्राणी

धावत्या घोड्याचे चित्र का लावावे?

1 उत्तर
1 answers

धावत्या घोड्याचे चित्र का लावावे?

2
वास्तुशास्त्र टिप्स 
 शुभ समजले जाते ‘धावत्या घोड्यांचे चित्र’ 

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते.
        कोणतीही शक्ती मोजताना ती हॉर्स पावर मध्ये मोजली जाते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. विशेष म्हणजे गाड्यांच्या इंजिनाची शक्ती किती आहे . पाण्याची मोटर किती हॉर्स पावरची आहे हे आपण असे व्यवहार करताना बघतो. मग ही अश्व शक्ती नक्की कसं आणि कुठे कामाला येते हे कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही. 
अश्व हा शक्तीवान प्राणी म्हणून ओळखला जातो ,मग ही शक्ती जर माणसाच्या अंगात आली तर माणूस सगळ्यात शक्तीवान ठरेल. 
सूर्य हा सगळ्यात ऊर्जावान म्हणून त्याच्या ऊर्जेवर अनेक गोष्टी चालतात. सूर्याचं ऊन लागलं नाही तरी नुसत्या त्याच्या प्रकाशामुळे सावलीत सुद्धा झाडं उगवतात, मोठी होतात. सौर ऊर्जेवर घरातले पंखे, लाईट ,चालतात. त्यामुळे अशा शक्तीवान गोष्टींपासून आपल्याला ऊर्जा मिळते. ग्रहण लागते त्यावेळी चंद्र सूर्य पृथ्वी एका रेषेत येतात त्यामुळे ही ऊर्जा कोणामुळे तरी अडली जाते आणि ती ऊर्जा काहीकाळ न मिळाल्यामुळे त्या ठराविक जागेवर परिणाम होतो , त्याला आपण हवा दूषित झाली असं म्हणतो. आणि ग्रहण सुटल्यावर ऊर्जा मिळते आणि पुन्हा सगळे व्यवस्थित होते.

आता वातावरणामध्ये अशा ऊर्जा असतात की त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. मग त्या ऊर्जेचा नाश करण्यासाठी दुसरी ताकतवान ऊर्जा तिथे आली तर पहिली ऊर्जा निकामी होते, मग ह्या अशाच काही सकारात्मक ऊर्जा असतात, त्या आपल्या जवळपासच्या नकारात्मक ऊर्जा पळवून लावतात.
कुठून मिळतात ह्या सकारात्मक ऊर्जा ? तर घरात भरपूर सूर्यप्रकाश, काही मनाला आनंद देतील आशा गोष्टी, काही शक्ती देतील अशा गोष्टी जर घरात आणल्या तर ह्या नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव नष्ट होतो घरातलं वातावरणच बदलून जातं. सगळं काही ‘परफेक्ट’ होऊन जातं.
मग असले सकारात्मक बदल कोणाला आवडणार नाहीत? काय करायचं त्याच्यासाठी?
 काही नाही ह्या हॉर्स पावर ला घरात ठेवायचं. अगदी टाच मारल्यावर धावतात तशा धावणाऱ्या घोड्यांचं एक मस्त चित्र, किंवा फ्रेम, घरात लावायची.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आता तुम्हाला नक्की काय त्रास होतोय हे घराच्या दिशेवरून ठरवतात आणि कोणत्या दिशेला हे चित्र लावलं की त्याचा चांगला परिणाम साधला जातो हे जाणकार दिशा निश्चित करून सांगतात. आपलं काय काम तर असं मस्तीत धावणाऱ्या घोड्यांचं चित्र आणायचं. कुठल्याही गिफ्ट स्टोअरमध्ये हे चित्र मिळतं. आता ह्याच्यात सात घोडे असणारे चित्र पण असतं बरं का, ते जास्त चांगलं समजलं जातं, कारण सात आकडा बऱ्याच गोष्टीत असतो म्हणून सात आकड्याला महत्व ,सप्तरंगी, सप्तपदी, सप्तर्षी, सात नद्या.
आता आपल्याला काय हवं आहे ते आपण ठरवायचं, नुसता घोडा पळताना पहिला तरी आपल्या अंगात एक प्रकारची शक्ती आल्यासारखे होते. मग ही चित्ररूपात शक्ती असली तरी सगळ्या घरात ही शक्ती राहील आणि सगळ्या नकारात्मक ऊर्जा पळून जातील. मग नुसतं हे काम करून तर बघायला काय हरकत आहे? फायदा आपलाच होणार. कारण शुभ शक्तीकडून अशुभ शक्तीचा नाश होणार असेल आणि घरात आनंदी वातावरण तयार होणार असेल तर नक्कीच करू. घरातच काय, आपल्या ऑफिस मध्ये, दुकान असेल तर त्या दुकानात, इतर कामाच्या ठिकाणी सुद्धा जाणकारांचा सल्ला घेऊन लावायला हरकत नाही. ♍
༺━━━━━━━━━━━━━━━༻
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
    _*🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_🎈
༺━━━━━━━━━━━━━━━༻
.

Related Questions

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे योगदान कोणते आहे?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
विज्ञान युगातील अंधश्रद्धा निबंध?
'कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी'या भक्तीगीतामध्ये समाजातील अंधश्रद्धा कशा दाखवून दिल्या आहेत?
फरक लिहा श्रध्दा व अंधश्रद्धा?
हडळ ही कोण असते ? मुंजा कोण असतो ?
तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?