Topic icon

पाळीव प्राणी

0





मस्त कडकनाथ कोंबडी


कडकनाथमध्ये औषधी गुण आहेत, असा प्रचार प्रसार केला जातो. परंतु, त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी ही कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडांवरील फूल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने मातीतील वेगवेगळे कीटक ही कोंबडी खाते.





 : आजच्या घडीला सर्वच लोक मांस खातात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुणाला कोंबडी खायला आवडते तर कुणाला मटण, कुणाला मच्छी तर कुणाला दुसर काही. रविवार हा मांसाहार करण्याच्या दिवस अशी शैकिनांची समज झाली आहे. सद्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी कोंबडी आणि अंड्याची मागणी चांगलीच वाढली आहे. चला तर जाणून घेऊया ‘कडकनाथ कोंबडी’बद्दल... साधारण कोंबडी आणि कडकनाथ कोंबडीत काय फरक आहे, तिचे फायदे काय याची माहिती खास आपल्यासाठी...

कडकनाथ हा कोंबडी मधला एक प्रकार किंवा जात आहे. कडकनाथ कोंबडीचा रंग पूर्णपणे काळा असतो. रक्त आणि मांस पण काळेच असतात. त्यामुळे या कोंबडीचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालले आहे. सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या डोक्यावरील तुरे हे लाल असतात. शिवाय पिसांचा रंगही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. परंतु, कडकनाथ कोंबड्यांमध्ये मात्र तुरे हे काळेच असतात, हे विशेष...अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्लाकडकनाथमध्ये औषधी गुण आहेत, असा प्रचार प्रसार केला जातो. परंतु, त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी ही कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडांवरील फूल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने मातीतील वेगवेगळे कीटक ही कोंबडी खाते. हे सगळ खाल्ल्याने तिच्यात औषधी गुण येतात.कोंबडीची जोऱ्यात जाहिरात

साधारण कोंबडीच्या तुलनेत कडकनाथ कोंबड्या आरोग्यपूरक असतात. त्यांचे मांसही रुचकर असते. त्यांची अंडीही पौष्टिक असतात. परंतु, काही लोक त्या कोंबडीला आणून बंदिस्त जागेत ठेवत आहेत. त्यांना खायला फॅक्टरीमधील अन्न देत आहेत. औषधी गुणांच्या नावाखाली विकून लोकांची फसवणूक करीत आहेत. अनेक वर्षांपासून सगळीकडे या कोंबडीची जोऱ्यात जाहिरात सुरू आहे. मध्यप्रदेशातच नव्हे तर भारतात सगळीकडे या कोंबडीची सध्या धूम आहे.


उत्तर लिहिले · 18/5/2022
कर्म · 48555
5
दोन पाळीव प्राण्यांची नावे: १. गाय. २. कुत्रा.

१. गाय 🐄
उपयोग:- गाय हे पाळीव प्राणी आहे. हे आपल्याला दुध देते. दुधापासून साय, ताक, दही, तूप, लोणी इत्यादी पदार्थ बनतात. गाईचे शेण हे नैसर्गिक खत म्हणून शेतीसाठी वापरतात. तिचे गोमूत्र अनेक रोगांवर एक रामबाण उपाय आहे. 

२. कुत्रा 🐕
उपयोग:- कुत्रा हा खूप प्रामाणिक प्राणी आहे. तो चोरांपासून घराचे रक्षण करतो. अनोळखी माणसाला घरात येऊ देत नाही. हा खूप हुशार प्राणी आहे.
उत्तर लिहिले · 6/4/2022
कर्म · 44215
2
जंगली प्राणी हे जंगलात राहतात..
उदा = वाघ, सिहं, चित्ता, हरीण 
पाळीव प्राणी हे आपण पाळतो..
उदा = गाय, बैल, शेळ्या 
उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 1500
2
पाळीव प्राणी हे हिंसक नसतात. त्याच्या पासून मानवाला फायदा होतो. ते मानवाची मदत करतात. पाळीव प्राणी हे मानसाळलेले असतात. 

जंगली प्राणी हिंसक असतात. त्याच्यापासून मानवाच्या जिवाला धोका असतो. त्यांच्या पासून मानवाला कहीही फायदा होत नाही. 
उत्तर लिहिले · 15/7/2021
कर्म · 25790
1
कुक्कुट पालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.




कुक्कुट पालनाच्या सध्या तीन पद्धती प्रचलीत आहेत:

१. अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
२. अर्ध-नियंत्रित पद्धती
३. नियंत्रित पद्धती

यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.

परसातील कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेकरीता उत्तम पर्याय आहे. ह्यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो.


घार, मुंगूस, कुत्रा, मांजर आदि प्राणी कोंबड्याची शिकार करतात त्यामुळे व चोरीमुळे आर्थिक नुकसान होते.

गुजरात आणि महाराष्ट्र येथे प्रामुख्याने बुसरा जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात. 

उत्तर लिहिले · 8/8/2021
कर्म · 25790