पाळीव प्राणी
मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती मिळेल का?
2 उत्तरे
2
answers
मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती मिळेल का?
0
Answer link

कडकनाथमध्ये औषधी गुण आहेत, असा प्रचार प्रसार केला जातो. परंतु, त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी ही कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडांवरील फूल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने मातीतील वेगवेगळे कीटक ही कोंबडी खाते.
: आजच्या घडीला सर्वच लोक मांस खातात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुणाला कोंबडी खायला आवडते तर कुणाला मटण, कुणाला मच्छी तर कुणाला दुसर काही. रविवार हा मांसाहार करण्याच्या दिवस अशी शैकिनांची समज झाली आहे. सद्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी कोंबडी आणि अंड्याची मागणी चांगलीच वाढली आहे. चला तर जाणून घेऊया ‘कडकनाथ कोंबडी’बद्दल... साधारण कोंबडी आणि कडकनाथ कोंबडीत काय फरक आहे, तिचे फायदे काय याची माहिती खास आपल्यासाठी...
कडकनाथ हा कोंबडी मधला एक प्रकार किंवा जात आहे. कडकनाथ कोंबडीचा रंग पूर्णपणे काळा असतो. रक्त आणि मांस पण काळेच असतात. त्यामुळे या कोंबडीचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालले आहे. सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या डोक्यावरील तुरे हे लाल असतात. शिवाय पिसांचा रंगही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. परंतु, कडकनाथ कोंबड्यांमध्ये मात्र तुरे हे काळेच असतात, हे विशेष...अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्लाकडकनाथमध्ये औषधी गुण आहेत, असा प्रचार प्रसार केला जातो. परंतु, त्यात औषधी गुण का आहेत यावर विचार करणे गरजेचे आहे. जंगलाच्या ठिकाणी ही कोंबडी मिळत असल्याने तेथे ती विविध प्रकारचे औषधी वनस्पती, झाडांवरील फूल खाते आणि तेथील माती अजूनही रसायनमुक्त असल्याने मातीतील वेगवेगळे कीटक ही कोंबडी खाते. हे सगळ खाल्ल्याने तिच्यात औषधी गुण येतात.कोंबडीची जोऱ्यात जाहिरात
साधारण कोंबडीच्या तुलनेत कडकनाथ कोंबड्या आरोग्यपूरक असतात. त्यांचे मांसही रुचकर असते. त्यांची अंडीही पौष्टिक असतात. परंतु, काही लोक त्या कोंबडीला आणून बंदिस्त जागेत ठेवत आहेत. त्यांना खायला फॅक्टरीमधील अन्न देत आहेत. औषधी गुणांच्या नावाखाली विकून लोकांची फसवणूक करीत आहेत. अनेक वर्षांपासून सगळीकडे या कोंबडीची जोऱ्यात जाहिरात सुरू आहे. मध्यप्रदेशातच नव्हे तर भारतात सगळीकडे या कोंबडीची सध्या धूम आहे.
0
Answer link
मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती खालीलप्रमाणे:
कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये:
- कडकनाथ कोंबडी पूर्णपणे काळ्या रंगाची असते. तिची त्वचा, मांस आणि हाडे देखील काळी असतात.
- या कोंबडीमध्ये लोह (iron) आणि प्रथिने (protein) भरपूर प्रमाणात असतात.
- कडकनाथ कोंबडी इतर कोंबड्यांच्या तुलनेत कमी चरबीयुक्त (fat) असते.
कडकनाथ कोंबडीचे फायदे:
- हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी कडकनाथ कोंबडीचे मांस फायदेशीर आहे.
- मधुमेह (diabetes) असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हे मांस उत्तम आहे.
- कडकनाथ कोंबडी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
कडकनाथ कोंबडीची किंमत:
- कडकनाथ कोंबडीची किंमत साधारणतः इतर कोंबड्यांपेक्षा जास्त असते.
- तिच्या मांसामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे (nutrients) तिची मागणी जास्त असते.
कडकनाथ कोंबडी पालन:
- कडकनाथ कोंबडीचे पालन करणे इतर कोंबड्यांच्या तुलनेत थोडे कठीण आहे.
- त्यासाठी योग्य वातावरण आणि आहार देणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:
- ॲग्रोवनमधील कडकनाथ कुक्कुटपालन विषयी माहिती (agrowon.com)
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.