संबंध शरीर प्रजनन

गर्भ धारणेनंतर कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावा?

1 उत्तर
1 answers

गर्भ धारणेनंतर कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावा?

3

गरोदरपणात काळजीपूर्वक करण्यात येणारा संभोग हा बाळाला इजा पोहचवत नाही. गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवताना खालील काही मुद्दे लक्षात ठेवा.

जोडप्यापैकी कोणालाही मूळव्याध नसेल तर ते लैंगिक संबंध ठेवू शकतात.

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन टाळण्यासाठी निरोधचा वापर करावा. निरोध जंतुविरहीत व स्वच्छ केल्यानंतरच वापरावे, यामुळे योनीतील कीटाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

शरीरसंबंधांची इच्छा नसेल तर जबरदस्ती करू नये.

योनीचे आजार असतील तर गरोदरपणात शरीरसंबंध टाळावेत, कारण त्यामुळे बाळ आणि आईला धोका होऊ शकतो.

प्रत्यके स्त्रीची शाररिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे संभोगाआधी शाररिक परिस्थिती, बाळाची वाढ याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवताना पूर्वज्ञान असणे महत्त्वाचे आहे. यामुळे मदत होईल आणि बाळ तंदुरुस्त व सुरक्षित राहील.

संभोगामुळे गर्भाला काही हानि पोहचेल या भीतीने बरीच जोडपी या काळात संभोग करण्याचे टाळतात. बाळ बऱ्याच आवाराणमध्ये सुरक्षित असते. त्यामुळे संभोगामुळे बाळाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही. फक्त नेहेमीपेक्षा जास्त जागरूक असावे.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवताना स्त्रीच्या पोटावर दाब येऊन चालत नाही. याबाबतीत जागरूक असावे.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवताना पेटका येणे सामान्य आहे. आहे परंतु जर स्त्रीला योनी मधून रक्तस्त्राव झाल्यास आणि तो तसाच सुरु राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक असते.

सामान्यत: गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत व प्रसूती आधी शेवटच्या चार आठवड्यांमध्ये लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. पहिल्या तिमाहीमध्ये सेक्स न करण्याचा सल्ला देण्यात येतो कारण याकाळामध्ये गर्भनाळ गर्भाशयामध्ये रुजत असते व गर्भाचे अवयव देखील विकसित होत असतात. त्यामुळे या काळात सेक्स केल्यास एखादा तीव्र झटका अथवा एखाद्या चुकीमुळे गर्भाचे नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच या दरम्यान मिसकॅरेज होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व चार आठवडे आधी देखील सेक्स करताना सावध असावे. कारण या दरम्यान सेक्स केल्यामुळे इंटरकोर्स दरम्यान प्रसारित होणा-या हॉर्मोन्समुळे वेळेआधीच प्रसूतीकळा निर्माण होऊ शकतात. तसेच या काळामध्ये असुरक्षित सेक्स केल्यास गर्भजल पिशवी फुटून बाळाला इनफेक्शन होण्याचा धोका असतो.

गर्भधारणे दरम्यान लैंगिक संबंध ठेवताना पोटावर अति ताण व वजन घेणे टाळा. हॉर्मोन्स च्या बदलामुळे योनीमार्ग कोरडा झाल्याने खाज येत असल्यास लुब्रिकंट वापरावे. गरोदर स्त्रियांनी पाठीवर झोपू नये. जर स्त्रीला अस्वस्थ वाटत असेल अथवा त्रास होत असेल तर संभोग टाळावे. गर्भावस्थेत लैंगिक संबंध ठेवताना बाळाला किंवा आईवर कोणता परिणाम होऊ शकतो, हे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. स्त्रीच्या गर्भावस्थेत वाढ होते, तशा स्त्रीच्या समस्या या वाढत जात असतात. त्यामुळे अशा अवस्थेत लैंगिक संबंध ठेवताना मोठी जोखीम स्वीकारावी लागत असते. उदरावर कोणत्याही प्रकारचा दबाब हा भ्रूण व गर्भवती महिला यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. गर्भधारणेच्या सहा ते सात महिन्यापर्यंत लैंगिक संबंध ठेऊ शकतो. परंतु, त्यातही मोठी जोखीम असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन विशिष्ट प्रकारच्या आसनाचा अवलंब करता येऊ शकतो. काही महिला या होणार्या बाळाविषयी अधिक उत्सुक असतात. त्यामुळे पतिची लहर ओळखण्याकडे त्या फारसे लक्ष देत नाहीत. या काळात पुरूषांनी पत्नीला समजून घेणे महत्त्वाचे आहे. 
उत्तर लिहिले · 11/2/2021
कर्म · 2325

Related Questions

शरीर मन वाच्या यांच्यावर नियत्रंण कसे करावे त्यासाठी कोणता पर्याय आहे?
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचा कार्य करते?
माझा शरीरात एकूण किती हाडे असतात?
मानवी शरीरात हाडे असतात?
तंबाखूसेवनामुळे शरीराची हानी होते?
शरीरात योग्य नि?
शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवात मिळते?