घरगुती उपाय वजन-उंची आरोग्य व उपाय लग्न

एक आठवड्यात एक किलो वजन वाढवायचं आहे ... कोणी मदत कराल का? प्रेयसी सोबत लग्न ठरणार आहे! उपाय सांगा.

1 उत्तर
1 answers

एक आठवड्यात एक किलो वजन वाढवायचं आहे ... कोणी मदत कराल का? प्रेयसी सोबत लग्न ठरणार आहे! उपाय सांगा.

6
तुमचं वजन वाढवण्याचं कारण मला समजलं नाही. लग्न करण्यासाठी तुम्हाला उपस्थिती महत्वाची आहे वजन नाही.
असो, एका आठवड्यात एक किलो वजन वाढवण्यासाठी कुठले सूत्र नाही.
आणि इतक्या झपाट्यात वजन वाढवायचे असल्यास तुम्हाला सप्लिमेंट सारखे प्रकार करावे लागतील. ज्यात तुम्हाला कृत्रिम प्रोटीन सेवन करावे लागेल किंवा बाजारातील वजन वाढवण्याचे इतर उत्पादनांचे(इंड्युरा मास सारखे) सेवन करावे लागेल. हे करताना जर तुम्ही प्रमाण पाळले नाही तर याचे दुष्परिणाम होऊन हृदयविकार होऊन शरीराची हानी होऊ शकते.

मी म्हणेल तुम्ही शरीर कसदार बनवण्याकडे लक्ष द्या. दररोज व्यायाम करा. जवळ व्यायामशाळा असेल तर तिथे जा. व्यायामाबरोबर योग्य आहार देखील घ्या. त्यात प्रथिनांचे प्रमाण वाढवा. सकाळी काजू व बदाम खायला सुरवात करा.
पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार जर घेतला तर नक्कीच तुमच्या तब्येतीत सुधारणा होणार.

 
उत्तर लिहिले · 20/1/2021
कर्म · 282915

Related Questions

मासे खाताना घशात काटा अडकल्यास उपाय कोणता करावा?
मुळव्याधावर कोणते उपाय करावेत?
डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात?
Vitamin D घेण्यासाठी तीन ऋतुंमध्ये वेगवेगळी योग्य वेळ असेल तर ती वेळ कोणती?
Fibromigelia हा त्रास पूर्णपणे बरा होतो का?
गुडघेदुखी थांबण्यासाठी कोणत्या गोळ्या मिळतात?
क्षयरोग रोग म्हणजे काय?