1 उत्तर
1
answers
हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे १२ वी नंतर तर त्याची तयारी कशी करु?
4
Answer link
कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कुठल्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही हॉटेल व्यवस्थापन पदवी करण्यास तयारी करू शकता.
हॉटेल व्यवस्थापन विषयासाठी देशभरात महाविद्यालये आहेत. यात सरकारी व खाजगी महाविद्यालये येतात.
या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करा. http://nchm.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा.
खाजगी महाविद्यालये स्वतःची वेगळी प्रवेश परीक्षा घेत असतात. ज्यात तुम्हाला प्रवेश हवा आहे त्या महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा द्या.
प्रवेशपरिक्षेसाठी अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो.
या परीक्षेनंतर अंतिम निवड करण्यासाठी सामूहिक चर्चा(ग्रुप डिस्कशन) व योग्यता परीक्षा(ऍपटिट्यूड) घेतली जाते. त्यानंतर तुमचा प्रवेश निश्चित होतो.
R Gupta या प्रकाशनाचे NCHMCT JEE पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करायला सुरवात करा. तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा 💐