Topic icon

उपहारगृह

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
 अन्न परवाना म्हणजे काय? तो कसा मिऌवावा 🌀

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे अन्न उत्पादन, वितरण आणि विक्री करण्यासाठी अन्न परवाना बंधनकारक केला आहे.ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे. त्यानुसार फक्त वितरणाच्या संस्थेने अन्न परवाना काढणे पुरेसे नाही; तर वितरण करणाऱ्या प्रत्येकाकडे हा अन्न परवाना असणे आवश्‍यक आहे. याचे शुल्कही कायद्याने निश्‍चित केले आहे.
♨️ FSSAI परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
http://bit.ly/3cKwyv3
ही नोंदणी राज्य सरकार ने आता घरी तयार होऊन विकल्या जाणाऱ्या केक, चॉकलेट्स या खाद्यपदार्थां साठी एक परवाना घेणं बंधनकारक केलं आहे.तसेच डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाणा  मांस प्रक्रिया युनिट, Relabellers  आणि Re-packers, प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट, घाऊक विक्रेता,  किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब /कॅन्टीन, अन्न केटरिंग, हॉटेल, उपहारगृह, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ दूध वाहतूक, मार्केटर, फेरीवाला, निर्यातकार आणि आयातकार, ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन फूड डिलिव्हरी, फास्ट फूड, चायनीज सेंटर.
ही नोंदणी न केल्यास ५ लाख रुपयांचा दंड आणि ६ महिन्याचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते.
*FSSAI परवाना प्रकार FSSAI  नोंदणी :*
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे आणि वीस कोटींपर्यंत आहे त्यांना FSSAI State License आवश्यक आहे.
उत्पादन युनिट दररोज दोन टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50 हजार लिटर
3 स्टार तारांकीत हॉटेल आणि वरील Repackers आणि Relebelling युनिट, क्लब उपहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवानासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
*FSSAI सेंट्रल लायसन*
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना FSSAI सेंट्रल लायसन्स आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे*
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
पत्त्याचा पुरावा( विजेचे बिल किंवा भाड्याचा  करार)
*FSSAI परवान्याची वैधता*
एक ते पाच वर्षासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर नूतनीकरण करणे
  • आपल्या भागातील नगर पालिका, महानगरपालिका सारख्या सरकारी कार्यालयालात लायसन बद्दल चौकशी करावी.माहिती मिऌेल.

0
FSSAI फूड लायसन्स / फूड परवाना / FSSAI नोंदणी
📜FSSAI फूड परवाना/नोंदणी 

FSSAI Food License Registration Portal  Shri Consultant

ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.

♻FSSAI नोंदणी (अन्न परवाना) काय आहे?
FSSAI - भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.
FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

🥘FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
1.डेअरी युनिट  
2.तेल प्रोसेसिंग युनिट 
3.कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट  
4.Relabellers आणि Repackers   
5.प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट
6.स्टोरेज यूनिट
7.घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार
8.ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन,
9.अन्न कॅटरिंग,
10.हॉटेल,उपहारगृह Restaurant
11.खाद्यपदार्थ दुध वाहतुक
12.Marketer
13.फेरीवाला 
14.निर्यातकार आणि आयातकार
15.Ecommerce / Online Food Delivery 
16. फास्ट फूड,चायनीज सेंटर

📌FSSAI नोंदणी/परवाना प्रकार
1⃣.FSSAI नोंदणी
 -ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक

2⃣.FSSAI State License 
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक.
-उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर, 
3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

3⃣.FSSAI Central License
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक
-निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License

📑FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे
1⃣Basic नोंदणी प्रमाणपत्र
  1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो 
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट 

2⃣ FSSAI State/Central License 
   1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो 
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट 
   4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
    5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
    6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
     7.ईतर (व्यवसायानुसार)

🗓FSSAI नोंदणी परवाना वैधता
1 ते 5 वर्षासाठी अर्ज करु शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे.

♻FSSAI नुतनीकरण
FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात.
मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही
मुदत संपल्यानंतर फुड लायसन्स साठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी.

❇FSSAI परवाना फायदे काय आहेत?
1.अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात
2.ग्राहक जागरूकता निर्माण
3.आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
4.अन्न सुरक्षा सुविधा
5.संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
6.व्यवसाय विस्तार एक मोठी संधी


♻FSSAI नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा ?
एफएसएसएएआय परवाना नोंदणी प्रक्रियेचा खाली उल्लेख केला आहे
-FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर FSSAI Food License Registration Portal
1.नोंदणी साठी आम्हाला 9511760650 या क्रमांकावर Whatsapp करा
2.आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायनुसार तुम्हाला FSSAI नोंदणी प्रकार आंणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी मार्गदर्शन करु.
३.आम्ही तुमचा अर्ज FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा अर्ज दाखल करु.
5. तुम्हाला 2 दिवसांमधे तुम्हाला FSSAI पावती मिळेल
6.FSSAI प्रमाणपत्र किंवा परवाना तुम्हाला तुमच्या WhatsApp किंवा ईमेल वर मिळेल
(FSSAI नोंदणी साठी 10 शासकीय कामाचे दिवस)
(FSSAI परवाना साठी 30-45 शासकीय कामाचे दिवस)

✅आमची वैशिष्ट्य
-FSSAI नोंदणी परवाना साठी संपुर्ण महाराष्ट्रात सेवा दिली जाईल.
-तत्काळ,सुलभ,वेळ वाचवा व कमी किमतीत
-कोणत्याही ऑफिसला भेट देण्याची गरज नाही.

✅लेख 

श्रीराम बनकर ( FSSAI Food Safety Mitra )

संपर्क : WhatsApp@ 9511760650 Email@ sdbankar7@gmail.com
उत्तर लिहिले · 2/2/2021
कर्म · 335
2
होटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम:

 पहिला सेमिस्टर

 अतिरिक्त भाषा 

 हॉस्पिटॅलिटी कम्युनिकेशन - I

 अन्न व पेय उत्पादन - I

 अन्न व पेय सेवा - I

 फ्रंट ऑफिस - I

 घरकाम - I

 हॉटेल वित्तीय लेखा


 दुसरा सेस्टर

 अतिरिक्त भाषा

 हॉस्पिटॅलिटी कम्युनिकेशन - II

 अन्न व पेय उत्पादन - II

 अन्न व पेय सेवा - II

 स्वच्छता आणि अन्न सुरक्षा

 व्यवस्थापन तत्त्वे आणि पद्धती

 पर्यावरण विज्ञान


 तिसरा सेमेस्टर

 अतिरिक्त भाषा

 फ्रेंच-मी

 अन्न व पेय उत्पादन - III

 अन्न व पेय सेवा - III

 फ्रंट ऑफिस - II

 घरकाम - II

 संगणक मूलतत्त्वे


 चतुर्थ सेमेस्टर

 अतिरिक्त भाषा

 फ्रेंच- II

 अन्न व पेय उत्पादन - IV

 अन्न व पेय सेवा - IV

 फ्रंट ऑफिस - III

 घरकाम - III

 भारतीय घटना


 पाचवा सेमिस्टर

 औद्योगिक प्रॅक्टिकम

 स्टार हॉटेल्सच्या ऑपरेशनल पैलूंचा प्रकल्प अहवाल


 सहावा सेमेस्टर

 अन्न व पेय उत्पादन ऑपरेशन्स *

 अन्न व पेय सेवा ऑपरेशन्स *

 फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स *

 हाऊस कीपिंग ऑपरेशन्स *

 विक्री आणि विपणन ऑपरेशन्स *

 हॉटेल अर्थशास्त्र आणि आकडेवारी

 आतिथ्य कायदा

 * व्यावसायिक निवडक


 सातवा सेमिस्टर

 अन्न आणि पेय उत्पादन व्यवस्थापन

 अन्न आणि पेय सेवा व्यवस्थापन

 प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन

 हॉटेल कॉस्टिंग

 संस्थात्मक वागणूक

 उद्योजकता विकास

 हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसमधील संगणक - I

 
 आठवा सेमेस्टर

 अलाइड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट

 निवास व्यवस्था

 हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसचे मार्केटिंग

 हॉटेल्स मध्ये आर्थिक व्यवस्थापन

 विपणन व्यवहार्यता आणि शेवट वर प्रकल्प व्यवहार्यता

 हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस मधील संगणक - II
उत्तर लिहिले · 17/1/2021
कर्म · 282915
4
कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कुठल्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही हॉटेल व्यवस्थापन पदवी करण्यास तयारी करू शकता.

हॉटेल व्यवस्थापन विषयासाठी देशभरात महाविद्यालये आहेत. यात सरकारी व खाजगी महाविद्यालये येतात.

सरकारी महाविद्यालये दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रवेश परीक्षा घेतात. एनसीएचएमसीटी जेईई(NCHMCT JEE) हे या परीक्षेचे नाव आहे.
या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करा. http://nchm.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा.

खाजगी महाविद्यालये स्वतःची वेगळी प्रवेश परीक्षा घेत असतात. ज्यात तुम्हाला प्रवेश हवा आहे त्या महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा द्या.

प्रवेशपरिक्षेसाठी अभ्यासक्रम जवळपास सारखाच असतो.

या परीक्षेनंतर अंतिम निवड करण्यासाठी सामूहिक चर्चा(ग्रुप डिस्कशन) व योग्यता परीक्षा(ऍपटिट्यूड) घेतली जाते. त्यानंतर तुमचा प्रवेश निश्चित होतो.

R Gupta या प्रकाशनाचे NCHMCT JEE पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करायला सुरवात करा. तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा 💐
उत्तर लिहिले · 15/1/2021
कर्म · 282915