1 उत्तर
1
answers
न्यूट्रल म्हणजे काय?
0
Answer link
न्यूट्रल व अर्थिंग मधला फरक जाणुन घेण्याअगोदर आपण न्यूट्रल आणि अर्थिंग म्हणजे काय हे थोडक्यात समजुन घेऊ.
न्यूट्रल- डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंग स्टार मध्ये जोडलेली असता त्या स्टार जोडणीतुन न्यूट्रल वायर बाहेर काढली जाते आणि त्याच ठिकाणी अर्थ केली जाते. पॉलीफेज सिस्टिम मध्ये तीन फेज आर, वाय, बी आणि एक न्यूट्रल वायर खांबावरून किंवा जमिनीमधुन टाकुन आपल्याला वीज पुरवठा केला जाते. घरगुती वापरासाठी सिंगल फेज सप्लाय हा आर, वाय, किंवा बी मधील कोणताही एक फेज आणि न्यूट्रल मध्ये जोडुन दोन वायर द्वारे घरातील मीटरला द्वारे सप्लाय दिला जातो. प्रत्येक फेज वर सामान लोड असला पाहिजे आणि न्यूट्रल हा सर्वांसाठी कॉमन असतो. त्यामुळे न्यूट्रल हा करंट साठी परतीचा मार्ग असतो. थेरॉटिकली न्यूट्रल आणि अर्थ मध्ये व्होल्टेज शून्य असले पाहिजे पण ते 5 व्होल्ट पर्यंत असु शकते त्यामुळे न्यूट्रल वायरला स्पर्श झाल्यास शॉक लागत नाही. न्यूट्रल वायरचा कलर कोड हा काळा असतो
Related Questions
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
1 उत्तर