इलेक्ट्रॉनिक्स
रेल्वे
इलेक्ट्रॉनिक उपकरणे
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
1 उत्तर
1
answers
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
4
Answer link
आपण जर विद्युत रेल्वे पाहिली असेल तर आपणास त्या रेल्वे इंजिन समोरील काचेवर लोखंडी जाळी दिसली असेल,मात्र अशी लोखंडी जाळी डिझेल इंजिन असणाऱ्या रेल्वेला असत नाही.
याचे कारण की,विजेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची समोरील काच ही फारच जवळ म्हणजे इंजिन बॉडीला लागुन असते.
तसेच समोरील काचे जवळ रेल्वे ड्रायव्हर बसलेला असतो,कधीकधी समोरील काचेकडील बाजुस एखादा पक्षी धडकने,अपघाताने म्हणा किंवा जाणुनबुजुन कोणी दगड मारला तर त्याचा परिणाम ड्रायव्हर वर होऊ नये म्हणून संरक्षणासाठी काचेवर लोखंडी जाळी बसवतात.
तर डिझेल इंजिनची समोरील काच ही इंजिन बॉडीच्या फारच अंतरावर असते( फोटो पहा).ही काच फारच अंतर सोडून आत असल्याने काचेमागील ड्रायव्हरला त्याचा फारसा धोका नसतो.यामुळे डिझेल इंजिनच्या काचेला लोखंडी जाळी नसली तरी चालु शकते.
ही झाली डिझेल व विद्युत रेल्वे इंजिनची गोष्ट मात्र अत्याधुनिक सुपरफास्ट रेल्वेला मात्र काचेवर लोखंडी जाळी लावली जात नाही
कारण,सुपरफास्ट रेल्वेचा मार्ग विना अडथळा ड्रायव्हरला स्पष्ट दिसावा म्हणुन लोखंडी जाळी लावत नाहीत ,ही काच आधुनिक तंत्रज्ञान असलेली शक्तिशाली काच असते यावर मोठा आघात झाला तरी ती फुटत नाही. ती फारच महागही असते.यामुळे तिला लोखंडी जाळी लावणेची गरज पडत नाही.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव