इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे

विद्युत प्रवाह नसलेल्या ठिकाणी सुद्धा आपणास करंट का लागतो?

2 उत्तरे
2 answers

विद्युत प्रवाह नसलेल्या ठिकाणी सुद्धा आपणास करंट का लागतो?

3
आठवतय का?, आपण लहानपणी एक खेळ खेळायचो ज्यात एकाला प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवून मागून खुर्चीला टॉवेलने मारायचो. त्यानंतर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला हात लावला की आपल्याला करंट लागायचा. आणि आपण ही काहीतरी जादू आहे असं समजून आश्चर्यचकित व्हायचो. आणि स्वतःला जादुगार समजायचो.

एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यावर लागणारा हा करंट आपण लहानपणीपासून अनुभवत आलो आहोत, पण हा करंट का लागतो हे जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला आहे का?
तर ह्यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे झटके किंवा करंट लागण्यामागे विज्ञान आहे.
झटके आपल्याला थंडीच्या दिवसांत जास्त लागतात. ह्याचं कारण म्हणजे वातावरणातील आर्द्रता कमी असणे.ह्या करंटमुळे कधी कधी त्रास देखील होतो. ह्याचं कारण म्हणजे स्पार्क. पण आता हा स्पार्क शरीरात कसा तयार होतो. आपल्याला शाळेत शिकविले गेले आहे की ह्या जगात जे काही बनले आहे त्यांची उत्पत्ती ही अॅटम्स म्हणजेच अणूंपासून झाली आहे. ह्या अणूंमध्ये निगेटिवली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स, पॉजिटिवली चार्ज्ड प्रोटॉन्स आणि न्यूट्रल न्यूट्रॉन्स असतात.
निगेटिवली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आणि पॉजिटिवली चार्ज्ड प्रोटॉन्स हे नेहेमी समान संख्येत असतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट ज्यामुळे अणू स्टेबल असतो. पण जेव्हा ह्या इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची संख्या एकसारखी नसते, जेव्हा त्यांच्यातला संतुलन बिघडते तेव्हा अश्या परिस्थितीत इलेक्ट्रॉन्स एक्साइट होतात आणि ते बाउन्स व्हायला लागतात.
*❗जेव्हा कुठल्याही व्यक्तीत किंवा वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते, तेव्हा ते निगेटिव चार्जने प्रभारीत होऊन जातात.*
निगेटिव्ह- पॉजिटिव्ह एकमेकांकडे आकर्षले जातात. आपल्याला हा सिद्धांत तर माहित आहेच. ह्याचं सिद्धांतानुसार जेव्हा कुठल्या वस्तूत किंवा व्यक्तीत इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते तेव्हा ते इतर वस्तूंमध्ये असलेल्या प्रोटॉन्सकडे आकर्षले जातात. आणि त्यामुळे आपल्याला हा करंट लागतो.
पण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तेव्हाच जास्त करंट तयार करते जेव्हा मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटोन्स यांच्या संख्येत फरक निर्माण होतो.
तुम्हाला हे नक्कीच कळले असेल की कुठल्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श केला की, आपल्याला अचानकपणे करंट का लागतो. आपल्या शरीरात घडणाऱ्या प्रत्येक हलीचालीमागे काही ना काही शास्त्रीय कारण नक्की असते, आपल्याला केवळ ते जाणून घेण्याची, समजून घेण्याची गरज असते.
____________________________
*WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498* ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
0
विद्युत प्रवाह नसलेल्या ठिकाणी करंट लागण्याची काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
  • स्थिर विद्युत (Static Electricity): जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर घासल्या जातात, तेव्हा स्थिर विद्युत निर्माण होते. यामुळे तुम्हालाreport current चा धक्का बसू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही कार्पेटवर चालता आणि नंतर धातूच्या वस्तूला स्पर्श करता, तेव्हा तुम्हाला करंट लागू शकतो. सायन्स जर्नल लेख
  • विद्युत चुंबकीय क्षेत्र (Electromagnetic Field): तुमच्या आजूबाजूला असलेल्या विद्युत उपकरणांमुळे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होते. या क्षेत्रामुळे तुमच्या शरीरात विद्युत प्रवाह निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला करंट लागू शकतो.
  • ग्राउंडिंगची समस्या: जर तुमच्या घरातील वायरिंगमध्ये ग्राउंडिंग व्यवस्थित नसेल, तर उपकरणांना स्पर्श केल्यावर तुम्हाला करंट लागू शकतो.
  • बॉडी व्होल्टेज (Body Voltage): आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या काही प्रमाणात विद्युत व्होल्टेज असते. जेव्हा हे व्होल्टेज वाढते, तेव्हा आपल्याला करंट लागू शकतो.
  • ओलावा: ओलावा विद्युत conductivity वाढवतो. त्यामुळे, जर तुमचे हात ओले असतील आणि तुम्ही विद्युत उपकरणाला स्पर्श केला, तर तुम्हाला करंट लागू शकतो.

जर तुम्हाला वारंवार करंट लागत असेल, तर एखाद्या qualified technician कडून तुमच्या घरातील वायरिंग आणि उपकरणे तपासा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 220

Related Questions

इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे काय?
विद्युत दाबाखाली वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या समुहास काय म्हणतात?
अणू केंद्रापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच कोणते आहे?
इलेक्ट्रिक बसमध्ये आपल्याला मळमळ किंवा उलटी होऊ शकते काय?
तापमापी मध्ये पारा का वापरतात?
विजेवर चालणाऱ्या रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते, मात्र डिझेल इंजिनला ती नसते, कारण काय?
कोरड्या विद्युत घटाची आकृती?