इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे

इलेक्ट्रिक बसमध्ये आपल्याला मळमळ उलटी होऊ शकते काय?

2 उत्तरे
2 answers

इलेक्ट्रिक बसमध्ये आपल्याला मळमळ उलटी होऊ शकते काय?

3
बस इलेक्ट्रिक चालणारी असो किंवा डिझेलवर चालणारी मळमळ उलटी होण्याचा आणि बसच्या प्रकाराचा काही संबंध नाही.
चालू वाहनात मळमळ उलटी होण्याचे कारण हे वैज्ञानिक आहे. ज्यात आपले शरीर एका जागेवर स्थिर असूनही आपण प्रचंड वेगाने पुढे जात असतो. अशा वेळेला मेंदूकडून एक विशिष्ट संप्रेरक पोटात सोडले जाते, ज्याने आपल्याला मळमळ झाल्यासारखे वाटते किंवा काही लोकांना उलटी देखील होते.

म्हणूनच ज्या लोकांचे मन घट्ट आहे, एकाग्र आहे किंवा आपण फार वेगाने जात आहोत अशी भीती ज्यांच्या मनात नसते, अशा लोकांना बसमध्ये काही त्रास होत नाही.
उत्तर लिहिले · 26/12/2021
कर्म · 282745
1

इलेक्ट्रिक बसमध्ये मळमळ उलटी असं काही नाही.


अनेकदा काही लोकांना प्रवास करताना मळमळ होणे, उलटी होणे यांसारख्या समस्या होता. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे आणि घाबरल्यासारखं होणे अशाही काही समस्या होतात.

प्रवासात मळमळ किंवा उलटीसारखं वाटण्याची 'ही' कारणे तुम्हाला माहीत नसतील!

अनेकदा काही लोकांना प्रवास करताना मळमळ होणे, उलटी होणे यांसारख्या समस्या होता. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे आणि घाबरल्यासारखं होणे अशाही काही समस्या होतात. अनेकांना या समस्या होतात, पण याचं कारण त्यांना माहीत नसतं. याचं मुख्य कारण असू शकतं मेंदूपर्यंत ऑक्सिजन न पोहोचणे. आज आम्ही तुम्हाला प्रवासात उलटी होणे, मळमळ होणे याची काही कारणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत.


मोशन सिकनेस




मोशन सिकनेस त्या प्रक्रियेला म्हटलं जातं जेव्हा शरीराच्या क्रिया आणि मेंदूचा ताळमेळ बसत नाही. आपल्या शरीरातील सर्वच इंद्रिये मेंदूशी कनेक्ट असतात. या इंद्रियांच्या हालचालींवर मेंदू प्रतिक्रिया देतो. पण जेव्हा बस किंवा कारमध्ये प्रवास करताना आपले डोळे, नाक आणि कान एकत्र काम करतात. अशात अनेकदा मेंदू आणि इंद्रियांमध्ये ताळमेळ होऊ शकत नाही. ज्याचा उलटा प्रभाव आपल्या शरीरावर दिसू लागतो.

मानेची नस दबणे



जेव्हा आपण बस किंवा कारमध्ये प्रवास करतो तेव्हा सीट आरामदायक असेलच असं नसतं. आपली मान बराचवेळ एकाच स्थितीत असते. ज्यामुळे मानेची नस दबली जाते. मानेची नस ही थेट मेंदूशी जोडलेली असते, त्यामुळे ही नस दबल्याने मेंदू असहज होतो आणि यामुळे अस्वस्थता जाणवू लागते.

ऑक्सिजनची कमतरता



गाडीमध्ये सामान्यपणे खिडक्यांचे काच बंद असतात त्यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. या कारणाने सुद्धा काही लोकांना उलटी होते. त्यासोबतच अनेकजण पूर्ण श्वास घेत नाहीत. जेव्हा ते मोकळ्या जागेत असतात, तेव्हा त्यांना अशी कोणतीही समस्या होत नाही. पण जसेही ते एखाद्या बंद ठिकाणावर जातात, तेव्हा त्यांना त्रास होतो.

पोटात रसायन तयार होणं



(
जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा बसल्याने आपले गुडघे फोल्ड झालेले असतात आणि जेव्हा गाडीला पुन्हा पुन्हा ब्रेक मारला जातो, तेव्हा पोटावर दबाव पडतो. याने पोटात अ‍ॅसिड तयार होऊ लागतं. जास्त वेळ अशाच स्थितीत प्रवास केला तर आंबट ढेकर, पोटात दुखणे आणि मळमळ होणे अशा समस्या होऊ लागतात.

काय कराल उपाय?

1) बस किंवा कारमधील पेट्रोल-डिझेलच्या वासाची समस्या दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे लिंबू. प्रवास करत असताना सोबत एक लिंबू ठेवा. किंवा लिंबाचा रस सोबत ठेवा. 


२) मळमळ होण्याची समस्या दूर कऱण्यासाठी आल्याचा तुकडा चघळा. ही क्रिया बसमध्ये बसण्याच्या १० मिनिटे आधी करा. प्रवासात पुन्हा त्रास होत असेल तर पुन्हा आल्याचा तुकडा चघळा. 

३) प्रवासा करण्याआधी फार जास्त तेलाचे किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच फार जास्तही काही खाऊ नका. असं केल्याने खाल्लेलं योग्यप्रकारे पचन होणार नाही. त्यामुळे तुम्हाला मळमळ वाटू शकतं. त्यामुळे प्रवासाआधी हलकं जेवण करा. 


४) प्रवास करण्याआधी मोठा श्वास घ्या. याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल. याने तुम्हाला अस्वस्थथा आणि मळमळ होणार नाही.

५) तसेच मळमळ किंवा उलटी येत असेल तर सोबत लवंग, वेलची ठेवा. 








उत्तर लिहिले · 26/12/2021
कर्म · 121725

Related Questions

इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे काय?
अनु केंद्र पासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉनिक कवच कोणते आहे?
तापमापी मध्ये पारा का वापरता?
विद्युत प्रवाह नसलेल्या ठिकाणी सुध्दा आपणास करंट का लागतो?
वीजेवर चालणारया रेल्वे समोरील काचेवर लोखंडी जाळी असते मात्र डिझेल इंजिन ला ती नसते कारण काय?
कोरडा विद्युत घट आकूती?
न्यूट्रल म्हणजे काय?