दाढ
माझी दाढ सुजली आहे त्यावर काही उपाय आहे का ?
1 उत्तर
1
answers
माझी दाढ सुजली आहे त्यावर काही उपाय आहे का ?
2
Answer link
हिरड्यांना होणाऱ्या (पेरिओडेंटल) रोगांपैकी जिंजिव्हिटिस हा कमी तीव्रतेचा आजार सर्वसाधारणतः सगळीकडे आढळतो. ह्यामुळे हिरड्या सुजतात (इंफ्लेमेशन). जिंजिव्हिटिसचे स्वरूप तसे पुष्कळच नरम असल्याने काही वेळा आपणांस तो जाणवतदेखील नाही. मात्र ह्याकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने ह्यामधून फार गंभीर स्वरूपाचे हिरड्यांचे रोग उद्भवू शकतात. आपल्या हिरड्या सुजल्या असतील किंवा दात घासताना आपल्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर आपणांस जिंजिव्हिटिस झाला असण्याची शक्यता आहे. तोंडाचे आरोग्य नीट नसणे हे जिंजिव्हिटिसचे मुख्य कारण असते. दररोज ब्रश करणे व फ्लॉसिंग (दातांच्या फटींमधील अन्नकण दोरा वापरून काढणे) ह्यामुळे जिंजिव्हिटिस आटोक्यात राहू शकतो.
लक्षणेजिंजिव्हिटिसची लक्षणे ही असू शकतात.
सुजलेल्या हिरड्या
नरम हिरड्या
हिरड्या हुळहुळणे
ब्रशिंग किंवा फ्लॉसिंग करताना हिरड्यांतून रक्त येणे
श्वासास दुर्गंधी
हिरड्यांचा गुलाबी रंग बदलून मळकट लाल होणे
जिंजिव्हिटिसमुळे फारसे दुखत नसल्याने बर्याच व्यक्तींना आपल्याला हा आजार असल्याची माहिती देखील नसते. दात घासताना ब्रशवर रक्ताचा रंग दिसल्यावरच आपणांस जिंजिव्हिटिस झाल्याची जाणीव होते.
दातांच्या डॉक्टरचा सल्ला केव्हा घ्यावा ?चांगल्या हिरड्यांचा रंग फिका गुलाबी असतो. आपल्या हिरड्यांचा रंग मळकट लाल असेल, त्या सुजल्या असतील किंवा त्यांमधून सहजपणे रक्त येत असेल तर आपल्या दंत वैद्यास भेटावे हे उत्तम. आपण वेळेवर काळजी घेतल्यास जिंजिव्हिटिसमुळे होणार्या् आपल्या दातांच्या नुकसानीस आळा घालता येईल व आणखी गंभीर आजार त्यामधून उद्भवणार नाहीत.