अध्यात्म शिवाजी महाराज दारू

ओम नमः शिवाय मंत्र म्हणणे योग्य आहे का कारण शिवजीचे भक्त हे दारु किंवा इतर व्यसन करणारे असतात तर प्लिज सांगा योग्य राहील का?

1 उत्तर
1 answers

ओम नमः शिवाय मंत्र म्हणणे योग्य आहे का कारण शिवजीचे भक्त हे दारु किंवा इतर व्यसन करणारे असतात तर प्लिज सांगा योग्य राहील का?

15
बरेच शोधकर्ते, तत्वज्ञ, तज्ञ-विशेषज्ञ, लेखक, लेखिका आपल्या  डिग्री डिप्लोमा तर तत्सम विषयाची पीएचडी केल्याच्या आधाराने तसेच अनुभवाने एखाद्या घटनेस्थळी पोहोचतात.. अनेक अभ्यास करतात.. त्यासाठी वेळ पैसे अश्या बऱ्याच गोष्टी खर्च करतात.. बऱ्याच गोष्टींची साम्यता पडताळतात.. त्यानंतर कुठे जाऊन एक पुस्तक लिहितात-छापतात.. मग प्रकाशित करतात.. आणि मग काही लोकं टिका करतात..
पण,
एखादी एफबी/इंस्टा वर फुकटची पोस्ट कुणीही करतं तेव्हा मात्र भराभर लाईक्स मिळतात आणि समर्थन तर विचारूच नये.. आपल्याला चार गोष्टी माहीत नसतात पण एखाद्या पोस्टची चार वाक्य काय वाचली तर समर्थक आणि विरोधक बनण्यास तयारीतच असतो.. दुनियेभरची माहिती फक्त मलाच आहे असे वाटायला लागते.. खरे आहे ना!! मात्र अभ्यासक बनण्यास कुणालाच वेळ नाही..

एक चांगलंच उदाहरण घ्या ना!!
ग्राहम बेल यांचं..
हे टेलिफोनचे जनक तसेच अनेक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रांतील निर्माते आहेत..
यांची एक चुकीच्या पद्धतीने पोस्ट व्हायरल होत होती..
त्या पोस्ट मध्ये असे लिहिले होत,
"हॅलो हा शब्द कुठून आला तर
हॅलो हा शब्द एक नाव आहे..
जी ग्राहम बेल यांची प्रेयसी होती..
जिचं नाव मार्गारेट हेलो असून तिला बेल प्रेमाने हॅलो म्हणत..
आणि हाच शब्द पुढे प्रचलित होऊन आज प्रत्येकजण  टेलिफोन मोबाईल वर हॅलो म्हणत.."
         अश्या प्रकारे चुकीच्या पोस्ट टाकून लोकं कुठलाही अभ्यास नसताना सरळसकट फॉरवर्ड करतात.. आणि समाजाला चुकीचा संदेश पसरविण्यास मदत करतात.. बेल यांची मार्गारेट हॅलो नावाची कुणीही प्रेयसी नसून मेबल ह्युबर्ड या बेल यांची पत्नी होत्या तर त्यांची पत्नी देखील मूकबधिर होत्या.

याच प्रकारे महादेव यांचे चित्रफीतेही गांजा ओढताना दाखविलेत.. तर कुठे त्यांचे भक्त ड्रग्जसी दाखविलेत..
असे चुकीचे पोस्ट ट्रेंड म्हणून देवांवरच विश्वास ठेवणारे अनेक युवा पिढी स्टेटस-स्टोरीवर पोस्ट करते.. मित्र परिवारात फॉरवर्ड करते.. त्यावर कॅप्शन असतो.. हरहर महादेव...!
               एक विचार करा जरा.. आपले आई वडील आपल्याला लहान पणापासून घरातील देव्हाऱ्यात असणाऱ्या देवाला नतमस्तक व्हायला शिकविते.. तुपाचे निरंजन लावायला दाखवते.. देवाचे निरागस आंनदी फोटो प्रत्येकाच्या घरी असतील.. कधी आई बाबांनी सांगितले का देव दारू पितो का त्यांचे भक्त दारू पितात.. एखादं तरुण दारू पिऊन जर घरी आला तर आई चपलीने-झाडूने मारेल.. याचा अर्थ काय तर ती तुमच्या दारू पिण्याला विरोध करते.. ती त्या अमली पदार्थाचे तिरस्कार करते.. आपण सर्व लहान नाही आहोत.. आपल्याला माहीत आहे, कोणती गोष्ट योग्य की अयोग्य.. देवाच्या नावाने अनेक लोकांनी अंधश्रद्धा निर्माण केल्या.. कुणा मुक्या प्राण्यांचा तर मानवी व्यक्तीचाही बळी देत.. तर कुठे संतान प्राप्ती साठी भक्तीने येणाऱ्या स्त्रीवर साधू संत बनून बलात्कार करीत.. कुणाच्या मनावर मस्तिकावर मनोविद्याने भूल पाडून संपत्ती लुटत.. हेच कारणं पाहून बरीच लोकं नास्तिक होतात.. निदान फसवणूक तरी होणार नाही.. प्रत्येक नास्तिक हा ईश्वराच्या विरोधात नसतो.. तो ईश्वराच्या नावावर केलेल्या चुकीच्या कृतीला विरोध करतो...

तुमचे आराध्य कुणीही असो, ज्यात तुम्हाला निर्मळता वाटते.. स्वच्छंदी पणा वाटतो त्यातच आंनद माना.. आपण निदान कुणाचं वाईट तरी केलं नाही ना अश्या चांगल्या कर्मावर प्रेम करा.. विश्वास ठेवा.. आणि आनंदी रहा..

कोणतेही देव धर्म हे कोणत्या घातक गोष्टींसाठी आवाहन करत नाही.. प्रत्येक देवाचे फुले प्राणी आपापल्या आवडीने असतात.. पण ते त्यांच्यावर आवडीचे फुले वाहिले तर ते प्रसन्न होतात असे नाही.. तर त्या फुलांची निगा राखली, त्यांचे महात्म्य समजले, त्या फुला पानांचे गुणधर्म समजले तर ते खऱ्या अर्थी प्रसन्न होतात..
कृष्णाला तुळशीचं पान वाहतात..
पण ते आपण प्रसाद म्हणूनही वापरात आणतो..
तुळस ही अनेक रोगांपासून मुक्त करते..
दिवाळीत तर गुढीपाडवा दिवशी आपण कडुनिंब साखर यांचे प्रसाद बनवून सर्वांना वाटतो..
गोकुळाष्टमी ला सुंठाचा प्रसाद बनवितात..
संक्रातला तीळ गुळाचे पौष्टीक उष्णवर्धिय लाडू तर भोगीला हरभरा, गाजर, वाटाणा, वांगी, वालपापडी सारखी भाजी बनवून ज्वारी बाजरीची तीळ लावून भाकरी बनवितात..
तर श्रावणात अनेक विविध पालेभाज्या(गावठी) बनवितात..
नागपंचमीच्या ज्वारीच्या लाह्या खातात..
दिवाळीत तिळाच्या तेलाने मालिश करतात..
दही, डाळी, हळद, मुलतानी माती, अश्या विविध जिन्नस घेऊन उठणं तयार करून शरीरावर वर्षातून एकदा तरी स्क्रबिंग होते..
हे सर्व देवाच्या सणासुदीच्या संगतीने घडत असलं तरीही या गोष्टींना विविध कारणं आहेत..
आपलं मन शरीर मातीशी पुन्हा जुळविण्यासाठी हे एक गोड निमित्त आहे.. ह्याने बाह्य सुंदरते पेक्षा आपलं शरीर सदृढ आणि निरोगी राहते..
तर काही फळं फुले भाज्या त्या त्या हंगामात बहरलेली असतात.. त्यांचं उत्पादन व्हावं म्हणून हे देवांचे सणोत्सव निमित्त ठरतात..
जसे संक्रातीला वांगी, वावटे, गाजर, यांची बहर येते.. याचे अधिक उत्पादन व्हावे म्हणून हे सणांचे निमित्त..


देव धर्म आवडत असेल तर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका.. आपलं कल्याण देव धर्म केल्याने नाही होणार.. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्याने आपले कल्याण होते.. आजचं मन असं झालं आहे की, देवावर विश्वास ठेवायचं,मनातील इच्छा मागायची.. पूर्ण नाही झालं तर देव खोटा म्हणून स्वतःच ठरवायचं.. देव खरा की खोटा हे तुम्हीच ठरविता तर मग स्वतःवर विश्वास कसा ठेवणार..
स्वतःवर प्रेम करा पण अहंकारी नको..
सर्वांचा आदर करा..
आपली परिस्थिती किती चांगली वाईट आहे हे कुणा वर दोष म्हणून थोपू नका..
याला पळवाट म्हणतात..
जी परिस्थिती आहे ती चांगली सुयोग्य बनविण्याचा प्रयत्न करा..

ओम नमः शिवाय हे जप तथा एक मंत्र आहे..
प्राणायम तसेच अनेक मानसिक स्वास्थ्य साठी ओम याचे उच्चारण वापरले जाते.. हे मन मस्तिक एकाग्र करण्यासाठी एक प्रकार आहे.. दीर्घ श्वास हळुवारपणे घेऊन हळुवारपणे सोडून याचा उच्चार करता.. आणि हे उच्चारत असताना शरीरा अंतर्गत वायब्रेट झाल्यासारखे जाणवते.. यामुळे नसांचे ब्लॉकेज खुले होऊन सक्रिय होतात.. आपलं शरीर आपल्या चांगल्या वाईट विचारांवर कार्य करते.. वाईट विचारात असल्यावर शरीरही डिस्टर्ब होते.. म्हणून हे मंत्र एकाग्रता टिकविण्यासाठी उत्तम पर्याय आहे..
कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करू नये..
ओम नमः शिवाय यांचे कोणतेही भक्त अंमली पदार्थाचा सेवन करत नाही..
एखादे सोमरसही देवाचे सोमरस हे भांगसारखे मादक पदार्थ म्हणून संबोधले जाते..
पण ते मादक नसून सोमची औषधी वनस्पती पासून घेतलेली जी दुधात मिसळून सोमरस तयार केले जाते..
कालांतराने सोमरसची जागा तीर्थ पंचामृताने घेतली..
अनेक गोष्टी आहेत ज्यांची संभ्रम आजही जीवित आहेत..

माझी बरीच उत्तरे एखाद्या वर्तमानपत्राच्या बातमी सारखी असेल.. आधी बरीच सारवासारव आणि शेवटी मूळ उत्तर असतं.. पण ती सारवासारव हे स्पष्टीकरण आहे.. ज्या एका प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले असतात..
                       
उत्तर लिहिले · 8/9/2020
कर्म · 458520

Related Questions

माझे पती रोज दारू पिऊन माझा खुप राग राग करतात त्यावर उपाय काय?
सर माझा भाऊ खूप दिवसापासून दारू पितो कोणतही मेहनतीच काम करतो आणि पैसे लगेच उडवून टाकतो त्याला खुप बोललो काही फ़ार पडत नाही.?
मला माझे वडील खूप छळतात दारू पिवून मला पैसे दे म्हणून माझ्यावर त्यांना मारले म्हणून खोटे आरोप टाकतात, लोकांमध्ये नातेवाईकांमध्ये उगाच ओरडून सांगतात,खरं मी मुलगा म्हणून प्रेत्येक कार्य मी चांगल्या रीतीने पर पाडतोय काय करू आत्महत्या करू वाटते?
भारतातील मद्य(दारू) बनवणारी जात कोणती?
दारू पिल्यावर चक्कर का येते?
मला दारू पिणे बंद करण्यासाठी काय करावे लागले?
अल्कोहोल ( दारू ) का चढते ?