शेती शेतकरी लागवड

आले लागवड नोव्हेंबरला करतात का?

1 उत्तर
1 answers

आले लागवड नोव्हेंबरला करतात का?

3
उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते.
लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते.
वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता.
साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.
जमीन :

चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य.
नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य.
हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.
जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी.
लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात.
कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन.
जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते
उत्तर लिहिले · 20/7/2020
कर्म · 11370

Related Questions

शेतकरी गटाचे योजना काय आहे?
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?