1 उत्तर
1
answers
मला अॅनिमेशनमध्ये करियर करायचे आहे मला त्याबद्दल मार्गदर्शन करा?
5
Answer link
अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स हे २१व्या शतकात सर्वात अधिक मागणी असणारं असं क्षेत्र आहे. मल्टिमीडिया या नावातच म्हटल्याप्रमाणे संपर्काचे विविध (मल्टी) मार्ग वापरणारं असं हे क्षेत्र आहे. व्हर्च्युअल जगातील काम करताना या क्षेत्रात टेक्स्ट (संदेश/मजकूर), इमेजेस (चित्र/फोटो), ग्राफिक्स, अॅनिमेशन, ऑडिओ (आवाज) आणि व्हिडीओ (दृश्य) आदी माध्यमांचा वापर करावा लागतो. अॅनिमेशन हा मल्टिमीडिया क्षेत्राचा एक भाग आहे. या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तुमच्याकडे कामाचा चांगला अनुभव असायला हवा. भारतात तसंच परदेशातही या क्षेत्रात करिअर करण्याच्या भरपूर चांगल्या संधी उपलब्ध आहेत. अॅनिमेटेड फिल्म्ससाठी काम करणं, तसंच टीव्ही, अॅडव्हर्टायझिंग क्षेत्रातही तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अॅनिमेटर्सना साधारणपणे मॉडेलर्स, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कॅरेक्टर अॅनिमेटर्स, लेआउट आर्टिस्ट, कम्पोझिंग आर्टिस्ट, एडिटर्स, टेक्श्च्युअर आर्टिस्ट आदी विविध पदांवर (जॉब प्रोफाइल) काम करावं लागतं. चित्रपट आणि टीव्ही माध्यमातून मनोरंजन करणं हे या प्रोफेशनचं मुख्य काम असलं, तरी बऱ्याचदा बिझनेस, सेल्स, इंजिनीअरिंग, शिक्षण आणि अॅडव्हर्टायझिंग या क्षेत्रातही अॅनिमेशन तंत्राचा वापर केला जातो. फॅशन डिझायनिंग, इंटिरीअर डिझायनिंग, तसंच वैद्यकीय (मेडिकल), कायदा (लीगल) आणि इन्शुरन्स कंपन्यांना त्यांचे प्रेझेंटेशन आणि मॉडेल बनवण्यासाठीही याच तंत्राचा वापर करावा लागतो. मोबाइल आणि व्हिडीओ गेम इंडस्ट्रीजनाही चांगल्या अॅनिमेटरचा शोध असतो.