मराठी चित्रपट मराठी भाषा झी मराठी अभिनेता

अभिनेता भाऊ कदम बद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

अभिनेता भाऊ कदम बद्दल माहिती सांगा?

6
🇦  एकेकाळी भाऊ कदम पान टपरी चालवत असतं  🇦 

🇦 भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम म्हणून लोकप्रिय आहेत. भाऊ हे मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत.त्यांची लोकप्रियता हि “फू बाई फूच्या” टीव्ही कार्यक्रमातून झाली आणि ते त्यांच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध झाले. त्यांनी लोकांच्या मनात एक विनोदी कलाकार म्हणून घर करून घेतले. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=992965524434704&id=100011637976439
फू बाई फू आणि चला हवा येवू द्या यामधील भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ९ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि ५०० हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे.

🇦 भाऊ कदम यांचा जन्म १२ जून १९७२ साली मुंबई,  वडाळ्याच्या बीपीटी कॉलनीत झाला. पुढील शिक्षणही तेथेच झाले आणि मुंबई म्हणजे नेमके काय, हे समजत गेले. वडिलांची नोकरी बिपीटीत असल्याने त्यांच्याच क्वार्टर्समध्ये बालपण गेले. त्यामुळे वीज, पाणी हा सगळा खर्च कंपनीतर्फे केला जाई. अर्थात तोपर्यंत घराची सगळीच जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर असल्याने निर्धास्तपणे जगत होतो. पण वडिलांच्या निधनानंतर अचानक परिस्थिती बदलली.
--------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
वडिलांच्या निधनानंतर ते डोंबिवलीत शिफ्ट झाले. यानंतर त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.सुरुवातीला घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम देखील भाऊ कदम यांना करावे लागले. जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली होती. माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,दरम्यान, एवढा मोठा संघर्ष सुरु असताना याकाळात देखील त्यांनी स्वतःमधील अभिनेता जिवंत ठेवला.
एकेकाळी करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता.भाऊ कदम यांचा मात्र त्याच काळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअर साठी मैलाचा दगड ठरला. पुढे भाऊ ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. चला हवा येवू द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्रभूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
भाऊ कदम यांनी घर खर्चासाठी पानाची टपरी चालू केली. त्यांच्या पत्नीचे नाव ममता आहे आणि त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
 

0

भाऊ कदम, ज्यांचे पूर्ण नाव भालचंद्र कदम आहे, ते एक लोकप्रिय मराठी विनोदी कलाकार आणि अभिनेते आहेत.

कारकीर्द:

  • भाऊ कदम यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटकं आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे.
  • त्यांच्या विनोदी शैलीमुळे ते घराघरात पोहोचले आहेत.
  • 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात ते एक महत्त्वाचे सदस्य आहेत.

चित्रपट:

  • सांघिक (२०१५)
  • टाइमपास (२०१४)
  • लय भारी (२०१४)
  • मुंबई-पुणे-मुंबई २ (२०१५)
  • नटसम्राट (२०१६)

मालिका:

  • चला हवा येऊ द्या

भाऊ कदम यांच्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे.

अधिक माहितीसाठी आपण IMDB आणि Wikipedia चा संदर्भ घेऊ शकता.

IMDB: IMDB Profile

Wikipedia: Wikipedia Profile

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 740

Related Questions

झी मराठी वरील होम मिनिस्टर या मालिकेत सहभाग घेण्यासाठी काय करावे लागेल?
आगामी काही दिवसात प्रश्नमंजुषासारखा कार्यक्रम येणार आहे का? मला अशा स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती मिळेल का?
झी 24 तास न्यूज रूम मध्ये काम मिळेल का?
"Waiting for you" चा मराठीत अर्थ काय होतो?
दहावीचे मराठी माध्यमाचे वेळापत्रक सांगा?
मला मराठी टाईप करून इंग्लिश मध्ये रूपांतर होईल असा कीबोर्ड ॲप मिळेल का?
ऑनलाईनला मराठी शब्द काय?