मोबाईल अँप्स सुरक्षा हॅकिंग

माझ्या मोबाईलची माहिती कोणीतरी लपवून त्याच्या मोबाईलवर घेत आहे, हे कसे माहित पडेल आपल्या मोबाईलवर, त्याने कोणता तरी अँप माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल तर केला नसेल ना? कसे माहित पडेल?

1 उत्तर
1 answers

माझ्या मोबाईलची माहिती कोणीतरी लपवून त्याच्या मोबाईलवर घेत आहे, हे कसे माहित पडेल आपल्या मोबाईलवर, त्याने कोणता तरी अँप माझ्या मोबाईलमध्ये इंस्टॉल तर केला नसेल ना? कसे माहित पडेल?

10
तुमच्या मोबाईल मधून लपून कोणीतरी माहिती घेत असेल तर ती चिंतेची बाब आहे, आपल्या मोबाईल मध्ये कोणीही एखादा अँप इन्स्टल करून कॉल रेकॉर्ड, फोटो, विडिओ, आणि लाईव्ह लोकेशन अशी माहिती मोफत घेऊ शकतो, अश्या सर्व्हिस देणाऱ्या काही वेबसाईट मला माहित आहेत, व्हाट्सएप चॅट, मेसेजेस, नोटिफिकेशन अश्या गोष्टींसाठी ते पैसे आकारतात.

मुख्य म्हणजे हे अँप इन्स्टल केल्यानंतर होम स्क्रिन वर इतर अँप प्रमाणे दिसत नाहीत, त्यांचं कामच ते असत, लपून माहिती ट्रान्सफर करणे.

आता हे अँप जर कोणी इन्स्टल केले असेल, तर तुमच्या  मोबाईल च्या सेटिंग्ज मधून सर्व "तुम्ही इन्स्टल केलेल्या अँप" ची लिस्ट पहा, व जो तुम्ही इन्स्टल केला नाहीत तो सरळ विचार न करता अनइन्स्टल करा.

कोणत्याही अँप च मोडीफिकेशन करता येते, जसे की नाव, लोगो वैगरे तर कोणता अँप उगाच "Keyboard" किंवा "System" वैगरे म्हणून असेल, व तुम्ही अनइन्स्टल करणार नाहीत, अस करू नका, हे अँप मोडीफिकेशन मी स्वतः करतो म्हणून सांगतोय, तुम्ही न इन्स्टल केलेले अनोळखी अँप सरळ अनइन्स्टल करा.

सोबत व्हाट्सअँप ओपन केल्यानंतर "Whatsapp web" मध्ये जाऊन तुमचं व्हाट्सअँप कुठे लॉग इन तर नाही ना? हे चेक करा.
उत्तर लिहिले · 7/4/2020
कर्म · 85155

Related Questions

हॅकिंग कसे करतात?
फेसबूक हॅक कसे करतात?
सायबर हॅकर काय करतात?
हाईक अँप हॅक होते का होत असेल तर ते कसे ?
आधार नंबर वरून आपले बँक खाते हॅक होऊ शकते का?
आपले व्हाट्सअँप कोणी हॅक केले तर कसे बघायचे ?
आपला फोन हॅक झालाय कि नाही हे कसे ओळखावे?