1 उत्तर
1
answers
सायबर हॅकर काय करतात?
4
Answer link
. हॅकर जवळपास सगळ्यांच्याच मागावर!
*_सायबर गुन्हेगारी विश्वातील हॅकर हे सर्वात धोकादायक आहेत. हे हॅकर आपल्या करामतींनी जगाच्या पाठीवर कुठेही, केव्हाही आणि कोणत्याही क्षेत्रात हाहाकार माजवू शकतात. प्रामुख्याने जगभरातील आर्थिक आणि संरक्षण क्षेत्राला त्यांच्याकडून सर्वाधिक धोका असल्याचे आजपर्यंत अनेक वेळा, अनेक घटनांमधून उघडकीस आले आहे._*
*जगभरातील दहशतवादी गटसुद्धा आजकाल उघड संघर्षापेक्षा सायबर अटॅक तंत्राचा वापर करताना दिसत आहेत. तीन वर्षांपूर्वी काहीहॅकरनी रशियाच्या सिटी बँकेची वेबसाईट हॅक करून वेगवेगळ्या लोकांच्या नावावरील तब्बल दहा हजार कोटी डॉलर्सची रक्कम जगातील वेगवेगळ्या बँक खात्यातून लंपास केली होती. गेल्यावर्षी आपल्या देशातील रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संगणक प्रणालीत शिरून ती हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. एवढेच नव्हे तर मुंबई पोलिसांची अधिकृत वेबसाईटदेखील हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. आजकाल जवळपास प्रत्येक देशाचे संरक्षणविषयक तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, शत्रूच् या हल्ल्याची पूर्वसूचनाच मिळते. मात्र चार वर्षांपूवी रशियाने जॉर्जियावर केलेल्या हल्ल्याचा प्रत्यक्ष हल्ला होईपर्यंत त्यांना थांगपत्ता लागला नव्हता. त्याचप्रमाणे जॉर्जियाची प्रतिकार क्षमताही आवश्यक त्या प्रमाणात काम करू शकली नव्हती.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* याचे कारण म्हणजे रशियन इंटेलिजन्सच्या हॅकर्सनी या हल्ल्यापूर्वी जॉर्जियाच्या संरक्षण आणि दळणवळण यंत्रणेच्या संगणक प्रणालीत शिरकाव करून या यंत्रणांचा मुख्य सर्व्हर हॅक करून ती यंत्रणाच बिघडवून टाकली होती. अशाच पद्धतीने अल कायदा या दहशतवादी संघटनेने इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणेत व्हायरस डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला होता. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर इराणची बहुतेक सगळी क्षेपणास्त्रे या दहशतवाद्यांच्या हाती लागली असती आणि त्यानंतर जगभर दहशतवादाचे काय थैमान माजले असते, त्याची कल्पना येण्यास हरकत नाही. हे दोन्ही प्रकार छुपा हल्ला स्वरूपाचे होते. मात्र कधी कधी अजाणतेपणीसुद्धा जग विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याचा प्रकारही होऊ शकतो. अमेरिकेतील एका केवळ बारा वर्षांच्या मुलाने अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या संगणक प्रणालीत शिरकाव करून क्षेपणास्त्रांची दिशा बदलण्याची ‘कर्तबगारी’ दाखवली होती. या घटना विचारात घेता केवळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जगालाच संगणक हॅकरचा किती मोठा धोका आहे ते लक्षात येते.
आज संपूर्ण जगालाच दहशतवादाचा विळखा पडला आहे. अशावेळी या दहशतवादी संघटनांच्या हॅकरनी एखाद्या देशाची क्षेपणास्त्रे लंपास केली किंवा उपलब्ध क्षेपणास्त्रे त्यांना हव्या त्या ठिकाणी डागायला सुरुवात केली तर काय विनाश माजेल, हे सांगण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे देशाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या बँकांमधील रक्कम या माध्यमातून हातोहात लंपास झाली किंवा दहशतवाद्यांच्या हाताला लागली तर केवढ्या मोठ्या प्रमाणात ‘अर्थाचा अनर्थ’ होऊ शकतो, हेही समजून येण्यास हरकत नाही.
असे प्रकार जसे देशाच्या किंवा संस्थात्मक पातळीवर होऊ शकतात, तसे ते व्यक्तिगत पातळीवरही होणे अशक्य नाही. काही मुलांच्याकडे जरी स्मार्ट फोन अथवा स्वतंत्र संगणक नसले तरी अशी मुले आपल्या पालकांचे स्मार्टफोन अनेकवेळा वापरताना दिसतात. त्यामुळे त्यांना पालकांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या पासवर्डसह इतरही अनेक स्वरूपाची माहिती असते. अशावेळी कुणा त्रयस्थ व्यक्तींकडून या मुलांमार्फत पालकांची किंवा संपूर्ण कुटुंबाची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती ‘हॅक’ केली जाऊ शकते. त्याचा वापर करून सायबर गुन्हेगार कोणत्याही प्रकारचे गुन्हे करू शकतात. त्यामुळे मुलांच्या स्मार्टफोन आणि संगणक वापराबाबत पालकांनी अत्यंत दक्षता घेण्याची गरज आहे.
*🔹हॅकरचा माग काढणे कठीण!*
कोण हॅकर जगाच्या कुठल्या कानाकोपर्यातून कोणत्या संगणक प्रणालीत हॅकिंगच्या माध्यमातून घुसखोरी करेल ते सांगता येत नाही. दुसरी बाब म्हणजे आजकाल संगणक क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे हॅकरचा मागोवा घेणे, संबंधिताचा शोध लावणे काहीसे सोपे झाले असले तरी जगभरात कोट्यवधी बनावट इंटरनेट अकौंटसुद्धा कार्यरत आहेत. अनेकवेळा हॅकर अशा बनावट अकाऊंटचाच वापर करतात आणि आपला कार्यभाग साधला की ती वेबसाईट बंद करून टाकतात. त्यामुळे अशा बनावट आणि अज्ञात शत्रूरूपी हॅकरचा शोध घेणे महामुश्कील बनते. त्यामुळे हा लढा केवळ अज्ञातच नव्हे तर अदृश्य
शत्रूंशी आहे