1 उत्तर
1 answers

ऑनलाईन फंड कसा पहावा?

1
EPF(प्रॉव्हिडंट फंड) ऑनलाईन कसा बघाल ? 

    *_तुमचा EPF(प्रॉव्हिडंट फंड) तुम्ही ऑनलाईनही बघू शकता. तसंच पीएफ पासबुक पीडीएफ मध्ये डाऊनलोडही करु शकता_* EPFO (Employees’
Provident Fund Organization) ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.आतापर्यंत वर्षातून एकदाच पीएफ स्लिप कंपनीतर्फे दिली जायची, तेव्हाच पीएफच्या खात्यात किती रक्कम जमा झालीय आणि त्यावर किती व्याज
मिळालं ते कळायचं. त्यानंतर
मोबईलवर SMS मिळणं सुरु झालं,पण त्यात फक्त रकमेचा एक आकडा
कळायचा; इतर डिटेल्स कळायचे नाहीत.

सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी ना आणखी एक User ID  लक्षात ठेवायची
कटकट, ना आणखी एक password आठवत
बसायची झंझट...
तुमचा पॅन नंबरही पुरेसा आहे आणि तुमचापासवर्ड असेल तुमचा मोबाईल.तेवढा मोबाईल आणि तुमचा पीएफ नंबर जवळ असायला हवाच.
1. आपला पीएफ पाहण्यासाठी
पहिल्यांदा ईपीएफच्या वेब
पोर्टलवर जा http://members.epfoservices.in/
2.पहिल्यांदा लॉग इन
करण्यापुर्वी तुम्हाला REGISTERहे बटन दाबावं लागेल. *तिथे दिलेली माहिती म्हणजे मोबाईल नंबर, जन्मतारीख, पॅन किंवा इतर वोटर कार्ड, पासपोर्ट नंबर वगैरे पैकी जे ओळखपत्र तुमच्याकडे असेल त्याची माहिती भरा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या
मोबाईलवर पिन नंबर येईल तोतिथं दिलेल्या रकान्यात भरा की तुम्ही तुमच्या होमपेजला जाऊन पोचाल.
4. तिथे वर काही
ऑपशन्स आहेत त्यात DOWNLOAD PASSBOOKसुद्धा आहे त्याला क्लिक करा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, 5. राज्यात महाराष्ट्र क्लिक करा,
6.आपल्या पीएफ ऑफिसचा कोडम्हणजे तुम्ही बांद्रा विभागात असाल तर
MH- BANDRA क्लिक
करा
7. मग तुमचा पीएफ नंबर
रकान्यात भरा.तुमचा
पीएफ नंबर MH/48620/XXXX असेल तर
त्यातील 48620 पहिल्या रकान्यात भरा, त्यानंतरचा रकाना ब्लँकसोडा आणि पीएफचे शेवटचे चार
अंक शेवटच्या रकान्यात भरा.
8.त्या खाली दिलेला कोड
सोबतच्या रकान्यात भरा.आणि
9. GET PIN क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या मोबाईलवर चार
आकडी पिन नंबर येईल,
10.साईटवरच्या रकान्यात तो पिनटाकला की तुमच्या पीएफ फाईलचं पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा आणि पाहा किती EPF
जमा झालाय ते.
दुसऱ्यांदा कधी पीएफ पाहायचा असेल तर पॅन
कार्ड किंवा तुम्ही रजिस्टर
केलेल्या ओळखपत्राचा नंबर
आणि फोन नंबर टाकून थेट साईनइन करु शकता.
__

Related Questions

नेट बँकिंग म्हणजे काय?
गुगल क्रोम(GOOGLE CHROME) PARALLEL DOWNLOAD लिंक मिळेल का?
Google Bard ला instructions द्यायचे आहे की त्याने Google Books मधून माहिती घ्यावी आणि मला द्यावी, जसे की Information about Sources of Water. पण ही माहिती फक्त Google Books मधूनच कशी मिळेल? books.google.co.in
Firefox browser आणि Google Go browser वर website खूप छान दिसते, परंतु chrome च्या बाबतीत असे नाही, font खूप मोठा दिसतो, तसेच Style सुद्धा एवढी छान दिसत नाही. माझ्या वेबसाईट मध्ये असा कोणता code जोडू की माझी वेबसाईट Firefox and Google go मध्ये जशी दिसते तशी दिसायला पाहिजे?
भुलाबाई हादगा भोंडला गाणी लिंक कुठे मिळेल?
whatsappचे संदेश ईमेल खात्यात पाठवता येतात का?
ब्राझील देश कोणत्या नृत्य प्रकार साठी प्रसिद्ध आहे?