शेती खते व बी बियाणे खनिज

जिप्सम खत म्हणजे काय ?

2 उत्तरे
2 answers

जिप्सम खत म्हणजे काय ?

5
जिप्सम हे एक प्रकारचे खनिज आहे. म्हणजेच हा एक मातीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. बऱ्याच पिकांना जिप्समचा फायदा होतो आणि पिकाचे एकरी उत्पादन वाढते. तसेच पिकातून मिळणारे जीवनसत्वे व इतर फायदे देखील जिप्सम मार्फत होतात. म्हणून बरेच शेतीतज्ञ किंवा कृषी तज्ञ हे मातीमध्ये जिप्समचे प्रमाण योग्य असावे म्हणून सल्ला देतात. आणि ज्या खताने मातीमध्ये जिप्सम चे प्रमाण वाढते, किंवा ज्या खतात जिप्सम असते त्या खात्याला जिप्सम खत असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 22/3/2020
कर्म · 282745
4
जिप्सम म्हणजे

CaSO4....

जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट.
हे एक चांगले प्रकारचे भू-सुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो.कारण ज्या जमिनीचा ph हा 7.5 हुन जास्त झाल्याने पिकांना अन्यद्रव्य अपटेक करताना अडचणी येतात कारण त्या जमीन अल्काईन आहेत आणि जिप्सम मध्ये सलपुरीक ऍसिड असल्याने जास्त झालेला ph कमी होतो व  पिके जमिनीतील अन्यद्रव्ये सहज उचलु शकतात....
सरासरी 2 टन / एकरी चोपण जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
जमीन भुसभुशीत होते.

कॅल्शिअम सल्फेट....ज्या जमिनी मध्ये कॅल्शिअम कार्बोनेट (चुनखडी) जास्त असतो त्या जमिनी मध्ये जिप्सम वापरतात.
जिफक्त काळ्या माती मध्ये वापरणे योग्य असते.
ज्या जमिनीचा pH (सामु) हा 7.5 पेक्षा म्हणजे जास्त,पण मुरमाड भुरख्या बरड जमिनी करीत सलपुरीक ऍसिड वापरावे ...... पाणथळ,क्षारपड,खळगट....जमिनी मध्ये पाण्याचा निचरा होत नाही व जमिनी मध्ये आणि वरून दिलेल्या खतांचा पिकांना उपयोग न होता ते तसेच जमिनीत पडुन राहतात परिणामी जमिनीचे आरोग्य आणखी असंतुलित होते त्या ठिकाणी जिप्सम वापरावा.

जिप्सम मुळे जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
बियाण्याची उगवण चांगली होते.
पाण्या सोबत येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
जमिनीची धुप कमी होते कारण पिकांचे  मुळे जमिनीत खोलवर जातात.

पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.

जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियमचे प्रमाण सुधारते.
सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य  शोषण क्षमता वाढते.
जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते
जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो कारण जिप्सम जमिनीत टाकल्या नंतर तो जेंव्हा पाण्याच्या संपर्कात येतो तेंव्हा त्यातील सल्फर चे रूपांतर सलपुरीक ऍसिड मध्ये होते व जमिनीतील कार्बोनेट, बाकार्बोनेट,कॅल्शिअम कार्बोनेट हे सलफुरीक ऍसिड जाळून त्या पासून पिकांना कॅल्शियम उपलब्ध करून देते.

तो पिकांना आवश्यक असतो.
जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे.
त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत.
पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही.
कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.आणि अश्या जमिनी मध्ये शेतकरी अज्ञानपोटी किंवा कृषी सेवा केंद्र चालकाच्या अपुर्ण ज्ञाना मुळे फसतो कृषी केंद्र चालक त्यास पिकांना DAP, 10:26:26 15:15:15 00:24:24  असले रासायनिक खते टाकण्याचे सल्ले देतात.आणि शेतकरी बळी पडतो ज्या जमिनीचा ph 7.5च्या पुढे आहे तिथे DAP सारखे 8.5 ph  असलेले रासायनिक खंत काहीच काम करणार नाही .....शेतकऱ्याला भौगोलिक समाधान मिळेल आणि जमीन अजुन खराब होईल.अपेक्षे प्रमाणे परिणाम नाही आला कि शेतकरी पुन्हा अजुन काहीतरी टाकणार पुन्हा ती जमीन अजुन जास्त खराब  होणार.....जमीन आपली काळी आई आहे.तीच आरोग्य जपणे आपलं आद्य कर्तव्य आहे.शेतकरी मित्रानो प्रत्येक पिक घेण्या पुर्वी जमिनीची आणि पाण्याची तपासणी करूनच खते आणि पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे ......पीक पाणी व्यवस्थापन हा खुप महत्वाचा मुद्दा आहे कारण खराब पाण्या मधुन टनाने क्षार जमिनी मध्ये जात असतात .....अतीतिरिक्त पाणी वापरणं म्हणजे मुळांच्या कक्षेतील खते खोलवर घालवणे .....
जिप्सम कसा चेक करणे जिप्सम थोडासा घेऊन त्यावर लिंबु पिळणे जर तो जिप्सम फसफसला तर तो डुप्लिकेट  आहे समजावा...जिप्सम असिडिक पदार्थ आहे त्यावर लिंबु पिळणे म्हणजे सायट्रिक ऍसिड टाकणे होय या मध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यास त्यात कॉर्बोनेट आहे समजावा .....लिंबु पिळल्या नंतर जो जिप्सम आहे तसाच राहिल्यास तो योग्य आहे समजावा.....

धन्यवाद
उत्तर लिहिले · 3/4/2020
कर्म · 625

Related Questions

रासायनिक खतांची पाण्यात निवळी कशी करतात?
शेणखत कसे ओळखायचे?
हिरवळीचे खत माहिती?
कंपोष्ट तयार करण्याच्या पद्धती?
वेगवेगळी खते व त्यांचे उपयोग काय?
बियाणाचे वाण जतन करणारी महिला कोण?
आंब्याची लागवड कशी करावी व त्याला कोणती खते वापरावीत ?