पगार खासदार

खासदार ला किती पगार असतो ?

1 उत्तर
1 answers

खासदार ला किती पगार असतो ?

5
खासदार आणि आमदारांच्या वेतनाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. खासदार-आमदारांना मिळणारे वेतन व भत्ते हे जास्त असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप असतो. त्याच वेळी लोकप्रतिनिधींना मात्र हे वेतन व भत्ते कमीच वाटतात. प्रत्येक अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांकडून भत्ते आणि आमदार निधीत वाढ करण्याची मागणी केली जाते. राज्यात सध्या मिळणारे वेतन व भत्ते हे ऑगस्ट २०१६ पासून लागू झाले आहेत. पुढील सोमवारपासून सुरू होणारे विद्यमान विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

राज्य सरकारमधील प्रधान सचिवाला अनुज्ञेय असलेले वेतन व भत्ते आमदारांना देण्याची तरतूद आहे. अर्थात प्रधान सचिवाला सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणाऱ्या वेतन व भत्त्यांनुसार सदस्यांना तेवढी रक्कम दिली जाते. केंद्रात व राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्याने प्रधान सचिवांच्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ झाली असणार. नव्याने निवडून येणाऱ्या आमदारांकडून वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होऊ शकते.

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना दरमहा १ लाख ८३ हजार ४४० रुपये एवढे वेतन व भत्ते मिळतात. याशिवाय आणखी काही सोयीसुविधा मिळतात. दरमहा दोन लाखांपेक्षा जास्त वेतन, भत्ते व अन्य सुविधांच्या माध्यमातून आमदारांना मिळत असतात.
उत्तर लिहिले · 29/11/2019
कर्म · 9405

Related Questions

विधानसभा निवडणुकीत आपण आमदार निवडून आणतो, आमदारांच्या जागेमधून मुख्यमंत्री निवडून येतो, मग राज्यसभा आणि लोकसभा यांचं महत्व कोणत असतं, हे स्पष्ट कसे सांगाल? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कसा निवडून येतो?
मंत्री होण्याआधी काय बनाव लागत आमदार की खासदार?
संसदरत्न खासदार म्हणजे काय?
बारामती जिल्हा नसून पण तिथे खासदार कसा ?
कोल्हापुरचे माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या बद्दल काही आठवणी?
खासदार के एल मोरे यांच्या बद्दल काही माहिती दया?