निवडणूक
मुख्यमंत्री
मंत्री
लोकसभा
प्रधानमंत्री
राज्यसभा
खासदार
विधानसभा निवडणुकीत आपण आमदार निवडून आणतो, आमदारांच्या जागेमधून मुख्यमंत्री निवडून येतो, मग राज्यसभा आणि लोकसभा यांचं महत्व कोणत असतं, हे स्पष्ट कसे सांगाल? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कसा निवडून येतो?
2 उत्तरे
2
answers
विधानसभा निवडणुकीत आपण आमदार निवडून आणतो, आमदारांच्या जागेमधून मुख्यमंत्री निवडून येतो, मग राज्यसभा आणि लोकसभा यांचं महत्व कोणत असतं, हे स्पष्ट कसे सांगाल? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कसा निवडून येतो?
7
Answer link
एक सोपे उदाहरण देऊन सांगतो.
असे समजा की आपला देश ही मोठी संस्था आहे आणि ही संस्था चालवण्यासाठी काही कार्यालये या देशात आहेत.
त्यातले दोन प्रमुख कार्यालये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा.
लोकसभा नावाचे कार्यालय चालवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते, हे कर्मचारी लोकांमर्फत निवडून दिले जातात, त्यांना आपण खासदार म्हणतो.
लोकसभेवर अंकुश असावा म्हणून आणखी एक कार्यालय असते, ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभेवर देखील काही कर्मचारी असतात, जे लोकांच्या प्रतिनिधीमार्फत(आमदारांमार्फत) निवडून दिले जातात. आमदार म्हणजे कोण हे खाली आहे.
देश चालवणे आणखी सोयीस्कर व्हावे म्हणून त्याचे विभाग केले जातात, त्यांना आपण राज्य(उदा महाराष्ट्र) म्हणतो. हे राज्य चालवण्यासाठी परत काही कार्यालये राज्यपातळीवर असतात. त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद म्हणतात.
विधानसभा चालवण्यासाठी जे कर्मचारी लोकांमार्फत निवडून दिले जातात त्यांना आमदार म्हणतात.
आमदारांचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील त्याचा मुख्यमंत्री होतो.
खासदारांचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. ज्या पक्षाचे अधिक खासदार असतील त्याचा पंतप्रधान होतो.
आता कर्मचारी शब्दाच्या जागेवर प्रतिनिधी शब्द टाका, म्हणजे तुम्हाला आणखी समर्पक उत्तर मिळेल.