1 उत्तर
1
answers
संसदरत्न खासदार म्हणजे काय?
1
Answer link
संसदेच्या दोन्ही सभागृहात देश आणि समाजहिताचे काम चालावे ही जनतेची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात. त्यासाठी खासदारांनी संसदेत सक्रिय असणे आवश्यक असते. संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणे असा आहे.
संसदरत्न पुरस्करासाठीचे निकष
संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पी. आर. एस. इंडिया, प्रोसेन्स प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समिती या तीनही संस्था संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करते. संसदेत केली जाणारी विविध मुद्द्यांची मांडणी, प्रश्न विचारणे, सभागृहातील चर्चांमधील सहभाग, खासगी विधयेक सादर करणे यांसह काही अधिक निकषांद्वारे संसदरत्न पुरस्कारासाठी खासदारांची नावे निश्चित केली जातात.