2 उत्तरे
2
answers
ग्रामपंचायत निवडणूक किती वर्षांनी होतात?
2
Answer link
ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच
वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापकी
एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड
करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या
अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना
प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते.
योग्य पद्धतीने
कारभार न करणाऱ्या सरपंचावर
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता
येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे
कामकाज उपसरपंच पाहताे.
ग्रामसेवक : ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव
असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी करतात. ग्रामपंचायतीचे दनंदिन कामकाज
पाहणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील
लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक
करताे.
ग्रामसभा : ग्रामीण
भागात
किंवा गावात राहणाऱ्या
मतदारांची सभा म्हणजे
्
ग्रामसभा.
हे स्थानिक
पातळीवरील लोकांचे सर्वांत महत्त्वाचे संघटन होय.
प्रत्क आर्क वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा
सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसभा बोलावण्याची
जबाबदारी सरपंचावर असतेे. प्रत्क आर्क वर्षाच्या
पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक
अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते.
ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात.
0
Answer link
ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळत नाही.