राजकारण राजकारणी खासदार

कोल्हापुरचे माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या बद्दल काही आठवणी?

1 उत्तर
1 answers

कोल्हापुरचे माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या बद्दल काही आठवणी?

4
_*‼ कोल्हापूरच्या खासदारांनी डॉ. मनमोहनसिंग यांना खोट्या नोटा ओळखायला लावलं होतं.   ‼*_

*☒ गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. डॉ.मनमोहन सिंग तेव्हा देशाचे अर्थमंत्री होते. शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणा म्हणून ते कोल्हापूरला आले होते.* तिथे सर्किट हाऊसवर त्यांना उतरण्यात आलं होत.
कोल्हापूरचे तेव्हाचे खासदार उदयसिंह गायकवाड यांच्याशी त्यांची जुनी ओळख होती. त्यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या घरी कार्यक्रमापूर्वी चहापानासाठी बोलावले होते. खासदार गायकवाड आपल्या घरी डॉ.सिंग यांची वाट बघत होते इतक्यात सर्किट हाउस वरून फोन आला की ,
*“मनमोहनसिंग यांना अस्वस्थ वाटत आहे, लवकर या.”*
धावतपळत उदयसिंग गायकवाड सर्किट हाउस वर जाऊन पोहचले.          

*☒ त्यांनी कोल्हापुरातील सुप्रसिध्द डॉक्टर वझेना सोबत घेतलं होतं.* डॉक्टरांनी मनमोहनसिंग यांची तपासणी केली. ते म्हणाले,
*“त्यांना विश्रांतीची गरज आहे. साहेबांचे या पुढील सगळे कार्यक्रम रद्द करा.”*
गायकवाड म्हणाले,
*“अर्थमंत्री खास शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीहून आलेत, त्याना हजर रहावेच लागेल ना. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. “*
पण डॉ. वझेनी त्यांना स्पष्ट बजावलं.
*” तब्येत चांगलीच बिघडली आहे. त्यांना  एकत्र इथ थांबवा अथवा दिल्लीला पाठवा पण विश्रांती घेऊ द्या.”*
अखेर गायकवाडांनी विद्यापीठाचा पदवीदानाचा कार्यक्रम रद्द केला. मनमोहन सिंग यांना तातडीने दिल्लीला पाठवण्यासाठी मुंबईहून खास मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मागवले. हे हेलिकॉप्टर पोहचण्यास थोडा वेळ होता. तेवढ्यात मनमोहनसिंग यांचं मन रमाव म्हणून खासदार गायकवाड त्यांच्याशी गप्पा मारत बसले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट बोलता बोलता विषय नकली नोटांचा निघाला. डॉ. सिंग हे सध्या अर्थमंत्री होतेच पण यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा राहिले होते. गायकवाड त्यांना म्हणाले,
“नुकतेच कर्नाटकातील बेळगावात नकली नोटा छापण्याचे मशीन , लाखो नकली नोटा सापडल्या आहेत. कोल्हापूरच्या डी.एस.पी.सुरज मोरे यांनी त्या जप्त करून आणल्या आहेत. आता वेळ आहे तर तुम्हाला दाखवू का?”
त्यांनी समंती दिली. लगेच डीएसपी मोरे यांना बोलवण्यात आलं. खासदारांनी खऱ्या व खोट्या नोटा मनमोहनसिंग यांच्या पुढे मांडण्यास सांगितल्या आणि त्यांना आव्हान दिले,
“यातील असली नोटा कोणत्या आणि नकली नोटा कोणत्या, ओळख पाहू”
डॉ.मनमोहन सिंग यांनी नेहमीप्रमाणे एक छानशी स्माईल केली. त्या नोटांचं बंडल हातात घेतलं. योगायोगाने त्यानोटांवर मनमोहन सिंग यांचीची सही होती. कोणी तरी मनमोहन सिंग आरबीआयचे गव्हर्नर असतानाच्या नोटांच्या नकली नोटा बनवल्या होत्या.
मनमोहन सिंग यांनी सगळ्या नोटा काळजीपूर्वक पाहिल्या, त्यावरून हळूवारपण हात फिरवला. आणि बंडल मधून बरोबर दोन खोट्या नोटा शोधून काढल्या. खासदार गायकवाड यांना आश्चर्य वाटले. एवढया मोठ्या पदावरचा माणूस पण एवढ्या वर्षांनी देखील आपल्या सही असलेल्या नोटांची कॉपी बरोबर पकडतो. मनमोहन सिंग यांनी पोलिसांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
तेव्हा उदयसिंह गायकवाड म्हणाले,
“साहेब, शासनाकडून त्यांचा सत्कार व्हायला हवा व मानपत्र मिळायला पाहिजे. “काही वेळाने मुंबईहून हेलिकॉप्टर आले आणि मनमोहनसिंग त्यात बसून परत दिल्लीला निघून गेले. गायकवाडांन वाटले की अर्थमंत्र्यांना कामाच्या गडबडीत एवढी छोटी गोष्ट कुठे लक्षात राहते. पण काही दिवसांनी कोल्हापुरात बातमी आली की “डीएसपी सुरज मोरे यांना आणि त्यांच्या हाताखालच्या पोलीस शिपायांना राज्य शासनाचा पोलीस सेवा मेडल प्रदान करण्यात येणार आहे.”
हा किस्सा उदयसिंह गायकवाड यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलेला आहे.
बोलभिडु वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_
✳💥✅💥✅💥✅💥✅    _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*

Related Questions

लोग तंत्रज्ञान राजकारण गो का राजधानी सहन है?
द्वैषवैर आणि मनात अंहकारी वृत्ती ठेवणारे अगर जोपासणारे राजकारण नसावे तसेच चांगल्याला चांगलं म्हणण्याची रीत सोडू नये याबाबत कारण मीमांसा अनुभव सादर करा अगर उत्तर या अॅपवर नमूद करा.. झाली तर सुधारणाच होईल... म्हणणं मांडा .आता तरी जागा नाही तर पुढे आहे दगा ?
फोडाफोडीचे राजकारण थांबवा , अन्यथा माणूस माणसात कसा राहील...एक तत्व दृढ धरी मना...असे राजकारण समाजकारण अर्थकारण जनाधार शोधण्यारे नेतृत्व हवंय .. आपलं मत मांडा आणि येत्या विधानसभेत जन हेचि जनार्दन..सिध्द व्हावे...मत मांडा?
गुरुजींना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता हे त्यांच्या कोण कोणत्या वाक्यातून लक्षात येते?
प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या ‘राजकारणातील भाषा’ या लेखाच्या आधारे राजकीय कार्यक्षेत्रातील भाषेचे स्वरूप स्पष्ट करा.?
प्रादेशिक पक्ष व दबाव गटांचे महत्त्व कसे स्पष्ट कराल?
स्त्री प्रश्नांची दखल राजकारणात कशी घेतली जाते.?