राजकारण
प्रादेशिक पक्ष व दबाव गटांचे महत्त्व कसे स्पष्ट कराल?
1 उत्तर
1
answers
प्रादेशिक पक्ष व दबाव गटांचे महत्त्व कसे स्पष्ट कराल?
0
Answer link
प्रादेशिक पक्ष व दबाव गटांचे महत्त्व स्पष्ट करा.?
प्रादेशिक पक्ष
विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्य व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना " प्रादेशिक पक्ष " असे म्हणतात.या पक्षांचा आपल्या प्रदेशा पुरता मर्यादित प्रभाव असतो.आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी,असा या पक्षांचा आग्रह असतो.आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातील आपला प्रभाव टाकू लागले आहेत.प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता,स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून होत आहेत.दबाव गट म्हणजे समान हितसंबंध आणि संघटित असलेला असा समूह, जो सार्वजनिक धोरणनिर्मितीवर प्रभाव पाडून आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो. दबाव गट हे प्रत्यक्ष सत्ता स्पर्धेत भाग न घेता विविध मार्गांनी सदस्यांच्या हितसंबंधांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. उदा. कामगार संघटना, शेतकरी संघटना, उद्योजकांच्या संघटना आदि संस्था या दबाव गट म्हणून काम करतात.दबाव गटांना हितसंबंधी गट असेही म्हणतात.आपल्या सदस्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे हे दबाव गटाचे मुख्य कार्य असते.सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दबाव गट शासनाच्या धोरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात.उदा. शेतकरी संघटना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी किंवा शेतमालावर अनुदान द्यावे ही मागणी शासनाकडे करतात.