राजकारण
फोडाफोडीचे राजकारण थांबवा , अन्यथा माणूस माणसात कसा राहील...एक तत्व दृढ धरी मना...असे राजकारण समाजकारण अर्थकारण जनाधार शोधण्यारे नेतृत्व हवंय .. आपलं मत मांडा आणि येत्या विधानसभेत जन हेचि जनार्दन..सिध्द व्हावे...मत मांडा?
1 उत्तर
1
answers
फोडाफोडीचे राजकारण थांबवा , अन्यथा माणूस माणसात कसा राहील...एक तत्व दृढ धरी मना...असे राजकारण समाजकारण अर्थकारण जनाधार शोधण्यारे नेतृत्व हवंय .. आपलं मत मांडा आणि येत्या विधानसभेत जन हेचि जनार्दन..सिध्द व्हावे...मत मांडा?
0
Answer link
माझं माझं उगाच म्हणसी काहीही नाही नरा तुझं...
आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी.
आपलीच माणसं आमची संस्कृती सुसंगत रहावी.
विधीची विधाने जर सत्यं शिवं सुंदरम् आहेत तर आपण आपली ओळख ही सत्यं शिवं सुंदरच ठेवावी .
विधायक कार्यक्रम आणि विकास गती योग्य जाणीवेतून व्हावी
निसर्गापुढे आपण पालापाचोळा असू तर मग अहंकारी वृत्ती व निंदानालस्ती , द्वैषवैर हा मनी का बाळगावा ..
सद् गुरूंचे एक वचन आहे,
क्या कहती है आत्मा, करें कूडेकरकटका खात्मा...
आपण संवेदनशील विवेकी विचार सत्कर्म सत्संग करतो ,
मग माणसाला माणूस प्रिय असावा...
हे विश्वचि माझे घर,ऐंसी मति जयाचि स्थिर, किंबहुना चराचरी एकचि झाला.. हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा.
आणि मग फोडाफोडीचे राजकारण थांबवा..
माणूस , संघटना,पक्ष ही एक वैचारीक बैठक आहे .
माणसाला मोडता येत नाही , काटकीला मोडता येते ,मग माणसाला मोडायचे कसे ? शेवटी माणूस टिकला पाहिजे,जगला पाहिजे...
शेवटी सर्व उत्पादने ही जर अखिल मानव जातीसाठी आहेत आणि मानव निर्मित ही आहेत...तर मग मानवी सेवा सुद्धा महान आहे , ती सर्वांसाठी समर्पित असावी
आपण संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत जायचं आहे तर मग माझं घर माझा परिवार माझी गल्ली ,माझा मोहल्ला,माझा इलाखा ,प्रांत , राज्य व माझा देश वतन एकच आहे.. सेवा सत्तेत सहभागी झाल्यानेच होते असं नाही, मत मांडा, विरोधात ही रहा , हां ते मत तम अंधार नष्ट करणारे हवे .
आपली संस्कृती खरी मैत्री,खरी ओळख, खरी भक्ती, खरी शक्ती आहे .
कशाला उद्याची बात... आजचा वर्तमान समोर आहे.. वर्तमान सुच्चारूपणे शिस्तीत नियमित कार्यप्रवण करणारा ठेवावा ..आपणचं आपली ओळख समाजपटलावर ठेवावी...
आणि विधायक कार्य अगर सहकारात सहकार्य करावे असे सुकृत कर्म उभे राहिले पाहिजे
धन्यवाद... आपली लोकशाही, संविधान ही घटना अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीली आहे ..विवेकी पालकत्व करणारी सेवाभावी वृत्ती सर्वोत्तम प्रेम कामगिरीची दखल घेणारी घटना सर्वोत्तम आहे ,आपला आवाज,आपला विश्वास स्थिरमन ठेवून माणुसकी धर्म वाढवत जाणारी विचारबद्ध मार्ग दिशा प्रकाश सामर्थ्य ताकद शक्ति ऊर्जा बळ देणारी अशी घटना संविधान आहे . कोणीही अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून मतदान करायला उत्सुक असावे असे विधान सुरक्षित रहावे व तसे बोलावे , बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले !!
सबका सबविधी हो कल्याण !!