नवीन तंत्रज्ञान चेतापेशी विज्ञान प्राणी तंत्रज्ञान विज्ञान

वैज्ञानिक मनुष्य आणि प्राणी यांच्या पासून शक्तिशाली व बुद्धिमान जीव निर्माण का करत नाही ?

1 उत्तर
1 answers

वैज्ञानिक मनुष्य आणि प्राणी यांच्या पासून शक्तिशाली व बुद्धिमान जीव निर्माण का करत नाही ?

17
असे करण्यासाठी अजून तरी विज्ञान इतके प्रगत झालेले नाही.  काही शास्त्रज्ञांनी माणसाचा डीएनए आणि प्राण्यांचा डीएनए एकत्र करून एक वेगळ्या प्राण्याचा गर्भ तयार करण्यापर्यंत शोध लावला आहे. परंतु हा शोध ब्रीडिंग म्हणजेच संकर किंवा जन्म देण्याच्या पुढे गेलेला नाही. २०१७ साली केलेल्या प्रयोगात माणसाच्या पेशी डुकराच्या गर्भात सोडल्या गेल्या. हा गर्भ जवळपास चार आठवडे काही अडचण न येता वाढला. नंतर मात्र हा प्रयोग थांबवण्यात आला.
या कामात शास्त्रज्ञांना बरेच पैसे लागतात, जे की कुणी त्यांना द्यायला सध्यातरी तयार नाहीत, कारण या गोष्टीत कुठेही व्यवसाय किंवा व्यापार करण्यासारख्या नाहीत. तसेच समाजातील बऱ्याच लोकांचा अशा प्रयोगांना विरोध आहे, कारण हे निसर्गाच्या विरोधात आहे असे त्यांना वाटते.

त्यामुळे अर्धा माणूस व अर्धा घोडा, किंवा सिंह हे पाहण्यासाठी अजून शेकडो वर्षे जातील. शेवटी म्हणतात ना विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरू होते. म्हणून अशा गोष्टी सध्या तरी फक्त देवाच्या हातात आहेत.
उत्तर लिहिले · 24/2/2019
कर्म · 282915

Related Questions

Chat GPT मध्ये येणाऱ्या काळात रोजगाराच्या संधी निर्माण करेल की रोजगार संपवेल?
जैवतंत्रज्ञानाचे समाजावर कोणकोणते परिणाम होत आहेत?
एखाद्याने आपल्याला मोबाईलवर (काँल व मेसेज) ब्लाँक केले असेल तर कसे ओळखावे?
नवीन रेशनकार्डसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
कबड्डीचे लहान व नवीन स्वरूप कोणते?
नवीन pan card घरपोहच किती दिवसात भेटेल?
नवीन जन्मलेल्या मुलांचे रास नाव कसे पहावे?