1 उत्तर
1
answers
नवीन रेशनकार्डसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
4
Answer link
नवीन रेशनकार्ड काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहे
1 तुम्ही स्थलांतरीत असाल तर त्यासाठी नवीन राहण्याच्या ठिकाणसाठी रेशनकार्ड काढणे.
त्यासाठी तुम्ही आधी ज्या तहसीलच्या कार्यक्षेत्रात राहतात तिथे रेशनकार्ड रद्द करून नवीन तालुक्यात समाविष्ठ करण्यासाठी अर्ज करता येईल त्यासाठी रेशनकार्ड रद्द केल्याचा दाखला , सर्वांचे आधारकार्ड , नवीन लाईट बिल घेऊन तहसील कार्यलयात विहित नमुन्यात अर्ज सादर करा.
2. जर तुम्ही त्याच तालुक्यात रहात असाल आणि घरच्या कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नाव असेल व विभक्त करावयाचे असेल तर नाव कमी करून विहित नमुन्यात अर्ज करून विभक्त रेशनकार्डसाठी अर्ज करा.
3 जर रेशनकार्ड नसेलच तर त्यासाठी विविध पुरावे द्यावे लागतील त्यात सर्वांचे आधार कार्ड , मतदानकार्ड, रहिवाशी दाखला , घराचा उतारा, वीज बिल, मुलांचे शाळेचे दाखले किंवा बोनाफाईट, बँक पासबुक, 2 फोटो व विहित नमुन्यात अर्ज तहसीलला दयावा लागेल.