नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान

Chat GPT मध्ये येणाऱ्या काळात रोजगाराच्या संधी निर्माण करेल की रोजगार संपवेल?

1 उत्तर
1 answers

Chat GPT मध्ये येणाऱ्या काळात रोजगाराच्या संधी निर्माण करेल की रोजगार संपवेल?

5
माणूस अनंतकाळापासून विविध यंत्रांचा शोध लावून आपले कष्ट कमी करून आरामदायी आयुष्य जगण्याचे उद्दिष्ट ठेऊन प्रगती करत आला आहे.
आणि या प्रत्येक टप्प्यात शोधलेल्या यंत्रांनी काही लोकांच्या नोकऱ्या कमी केल्या, काहींना नोकऱ्या दिल्या आणि वाचलेल्या वेळेतून भविष्यासाठी नवीन यंत्रांचा शोध माणसाने लावला. अशीच क्रांती Chat GPT मूळे होणार यात काही शंका नाही.

मी असेच उत्तर आधी दिलेले आहे त्यातला मजकूर खाली आहे, ज्यात Chat GPT मूळे वेबसाइट्स बंद पडतील का असा प्रश्न विचारला होता:

असाच प्रश्न कॅल्क्युलेटरचा शोध लागल्यावर केला गेला होता. गणित कुणी शिकणार नाही, लोक कॅल्क्युलेटर वापरून आळशी बनतील, कॉपी करतील आणि आपली प्रगती थांबेल असा अनुमान लोक लावत होते. पण तसे झाले नाही, आपण अधिक आधुनिक गणित शिकायला लागलो, पुढे संगणकाचा शोध लागला, स्मार्टफोन आले आणि एकंदरीत आपली प्रगती झाली.

Chatgpt आणि Bard हे याच प्रकारची क्रांती आहे. मूलभूत माहिती आणि सामान्य ज्ञान यासाठी असे AI सर्व वेबसाईटची सुट्टी करतील. मात्र नवनवीन प्रकारचे शोध लागत राहतील आणि त्यासाठी हे AI ट्रेन होणार नाही, आणि अचूक माहिती पुरवू शकणार नाही, अशा वेळेस वेबसाइट्स कामी येतील.

तुम्ही तुमच्या वेबसाईट वर नेहमी अद्ययावत माहिती ठेवली तर नक्कीच तुम्हाला काही धोका नाही. मात्र तुम्ही जुन्या मजकुरावराच वेबसाईट चालवली तर कॅल्क्युलेटर प्रमाणे ती कालबाह्य होईल यात शंका नाही. म्हणून मेहनत घ्या आणि नवीन आणि अनोखा मजकूर तयार करत रहा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
उत्तर लिहिले · 6/7/2023
कर्म · 282745

Related Questions

जैवतंत्रज्ञानाचे समाजावर कोणकोणते परिणाम होत आहेत?
एखाद्याने आपल्याला मोबाईलवर (काँल व मेसेज) ब्लाँक केले असेल तर कसे ओळखावे?
नवीन रेशनकार्डसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
कबड्डीचे लहान व नवीन स्वरूप कोणते?
नवीन pan card घरपोहच किती दिवसात भेटेल?
नवीन जन्मलेल्या मुलांचे रास नाव कसे पहावे?
नवीन रेशन दुकान मिळ?